Skip to main content

कवि भुषण कविता क्र. ४ : आग्याहून सुटका

लेखक नितिनकरमरकर यांनी गुरुवार, 25/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और, साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की । कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे, एकलिए एक जात जात चले देवा की । भेंस को उतारी डार्‍यो डम्बर निवारी डार्‍यो, धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की । पौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो, देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥ अर्थ : चारी बाजूला या चुग़ताई (वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या) प्राणघातक चौक्या दिवसरात्र लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, (आरामात) देवाकडे निघालेले आहेत. (अशा वेळी त्यांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी आपला) वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे अवडंबर किंवा सोंग माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्‍याबरोबर ते निघाले आणि पळून गेले. (शिवाजी महाराजांची ही करामत बघून आग्र्याचे लोक थक्क झाले, त्यांना कळेना की (शिवाजी महाराज) वार्‍याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. टीप : १. येथे जो गुटख्याचा उल्लेख आला आहे तो म्हणजे आज जो गुट्खा आपल्याला माहित आहे तो नव्हे तर गुप्त होण्याचे औषध या अर्थी आला आहे. २. कवितेत असे अभिप्रेत आहे की महाराज पेटार्‍यात बसून नाही तर पेटारा वाहून घेऊन गेले आणि मग पसार झाले.
लेखनविषय:

वाचने 1309
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया