(जखमी वाचकांची रिपु)
जळजळीत प्रेरणा
अंतर्जालावर मराठीची भुक भागवण्यासाठी आलेल्या वाचकाला,
नखुरडे ठसठसत प्रतिसाद टंकणार्या रसिकाला,
वास येतोय सटरफटर कुजलेल्या कवितांचा,
स्टोन स्टोन स्टोन (फेकुन मारा)
काव्यप्रतिभेचे अंतर्गत वस्त्रहरण आणी धिंडवडे
लेखन/ साहित्य दारूण विनाशाकडे
लोचट ओशट कविताकरती
त्यावर खंडीभर प्रतिसादभरती
कविताथैमान प्रतीक कॅत्रिना
अघोरी मळमळ गप्प बसवेना
तुटतो संयम कर्रम कुर्रम
कविता पडिती गर्रम गर्रम
वाटावाटा कायमचुर्ण वाटा
महाअजीर्णाची ही वरदेवता
नाहीतर मरमर बधिरसंचिता
यातुन वाचव रे वल्लभा
कवितावाचनी होता चलबिचल
विडंबन करिती मन हे घायल
स्टोन स्
मिसळपाव