चार ओळी मनापासुन...
दूर कोठेतरी कोण तो छेडी मारवा
साद आर्त घालुनी आठवितो प्रियेला
ओढ वेडी का अशी लागते जीवाला
चांदण्यांच्या फेरयात चंद्र शोधतो कुणाला??
बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला.
येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी.
वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत.विविध प्रकाशकांच्या कहाण्या व लेखकांची व्यथा वाचून मी खरोखर सुदैवी असे म्हणायला हवे.