अरे देवा मी काही सुखी नाही
अरे देवा मी काही सुखी नाही
नवरा आहे मुलं आहेत
घरदार भरलेलं आहे
तरीही मन रमत नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
अंधेरीला प्लॅट आहे पाली हिलला बंगला आहे
सजवलेला एसी बेडरूम आहे
वॉटरबेडशिवाय मला झोप येतच नाही
अरे देवा मी काही सुखी नाही ||
नोकर आहे चाकर आहे
स्वयंपाकासाठी मावशी आहे
नावाला भाजीची फोडणी मी देई
अरे देवा मी काही सुखी नाही ||
टिव्ही आहे डिव्हीडी आहे
झालंच तर मल्टीफ्लेक्स मुव्ही आहे
तरीही करमणूक कशी नाही
अरे देवा मी काही सुखी नाही
मिसळपाव
एक लहान मुलगी वय वर्षे कदाचित पाच. शाळेत अत्यंत अस्थीर . वर्गात येणार्या चिमण्याशीच बोलणे, वारंवार डेस्क उघडणे, वर्गाच्या खीडकीतून रस्त्यावरून जाणार्या बॅन्डवाल्यांशी बोलणे वगैरे वगैरे.... हे तिचे सततचे उद्योग. तिच्या या उद्योगाना कंटाळून शाळेतून मुलीचे नाव काढून टाकले.