Skip to main content

मिपा मोबाईलवर.?

लेखक भारतीय यांनी शनिवार, 24/07/2010 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
समस्या अशी आहे की, माझ्याजवळ 'विण्डोज ६.१' मोबाईल आहे.. त्याद्वारेही मी आंतरजालाचा वापर करीत असतो.. परंतु त्यात मराठी फाँट नसल्याने मला आपली मिपाची साईट बघताच येत नाही..(सगळे चौकोन चौकोन येतात).. तरी संबंधीत तज्ञ लोकांनी मिपाची साईट ईंग्रजी फाँटमध्ये उपलब्ध आहे कि नाही याबद्द्ल मार्गदर्शन करावे..

वाचने 3475
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

इंग्रजी फाँन्ट कसा असतो? आम्हाला रोमन, देवनागरी फाँन्ट माहित आहेत ब्वा. --अवलिया

तुमच्या मोबाईमधे opera mini असेलच.त्यात जाउन address bar मधे opera:config type करा,नंतर आलेल्या settings(Power-User settings)मधे अगदी शेवटचा पर्याय(Use bitmap fonts for complex scripts menu) on करा. You are done - उमजायला लागल तेव्हापासुन अर्ध आयुष्य mobileच्या internet browser मधे घालवणारा. ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

In reply to by शानबा५१२

शानबा भाऊ धन्यवाद.. पण तुम्ही सुचविल्याप्रमाणे adress bar मधे opera:config type असे केले असता no such file असे उत्तर येते आहे.. http://anildaily.blogspot.com

In reply to by भारतीय

adress bar मधे opera:config type असे केले असता no such file असे उत्तर येते आहे..
TYPE हा वर्ड सोडुन द्या. नुसतेच opera:config असे टाका. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

समस्या अशी आहे की, माझ्याजवळ 'विण्डोज ६.१' मोबाईल आहे.. त्याद्वारेही मी आंतरजालाचा वापर करीत असतो.. परंतु त्यात मराठी फाँट नसल्याने मला आपली मिपाची साईट बघताच येत नाही..(सगळे चौकोन चौकोन येतात).. तरी संबंधीत तज्ञ लोकांनी मिपाची साईट ईंग्रजी फाँटमध्ये उपलब्ध आहे कि नाही याबद्द्ल मार्गदर्शन करावे..
तुमच्याकडे १)'विण्डोज ६.१' मोबाईल आहे.. २)त्याद्वारेही तुम्ही आंतरजालाचा वापर करीत असता .. ३)परंतु त्यात मराठी फाँट नसल्याने तुम्हाला आपली मिपाची साईट बघताच येत नाही..(सगळे चौकोन चौकोन येतात).. ह्यातली नक्की समस्या काय आहे ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

श्री. भारतीय, नमस्कार आपल्या मागणीनुसार व अनेकांच्या सुचवणीनुसार मिपाचे 'मोबाईल लाईट व्हर्शन' आणायचे प्रयत्न चालु आहेत. इमेजेस वगैरे डिसेबल करुन कमीत कमी 'टेक्स्ट ओन्ली' व्हर्शन आणयचे असे ठरते आहे. जेव्हा येत्या काही दिवसातच मिपाचे नवनिर्माण होईल तेव्हा त्यात 'मिपा मोबाईल व्हर्शन' आणण्याचा प्रयत्न राहिल असे सांगतो. धन्यवाद ... ------ (माहितगार)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

>>इमेजेस वगैरे डिसेबल करुन कमीत कमी 'टेक्स्ट ओन्ली' व्हर्शन आणयचे असे ठरते आहे. @ डॉण्राव : आरारारा म्हणजे आम्च्या पाकृ वर संकट्च म्हणायच की वो हे ;) @भारतिय : धन्यवाद. हा मुद्दा इथे चर्चेस आणल्या बद्दल. @शानबा५१२ धन्यवाद. उपाय सुचवल्या बद्दल. करुन पहातो. मागे पण एकदा असाच धागा चर्चेस आला होता. पण मिपाची 'शोध' प्रक्रिया भलतीच शोध लावते, त्यामुळे तो धागा सापडला नाही.

माझ्या N900 वर मि.पा. सुरेख दिसते... खादाडमाऊ

प्र.का.टा.आ. (मी स्वतःच काढला आहे, संपादकांनी नाही ! उगाच "तुमचा उडालेला प्रतिसाद कुठे वाचायला मिळेल ?" असे वर तोंड करुन खरडवहीत विचारायला येउ नये.) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुम्ही दिलेल्या प्रतिसादामूळे मी मि.पा.वर फोटो कसा चढवावा ते शिकलो..तुमचा प्रतिसाद तुम्ही उगाच कापला...!!! खादाडमाऊ

मला ही पडला होता. शानबा५२ ध्न्यवाद रे फक्त जरा अजुन स्पेसिफीकली सांग की नक्की कोणत सेटींग ऑन करायच ते ? cell *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

माझ्या मते सर्वच ईंटरनेट सुविधा असणार्‍या मोबाईलवर मराठी साईट दिसत असाव्यात. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

ड्रॉईड फोन मध्ये हे कसं करायचं? माझ्या (अत्यल्प!) माहितीप्रमाणे ड्रॉइड प्लॅटफॉर्मवर अजून युनिकोड ची व्यवस्था नाही...नेमकं काय करावं लागेल मराठी फाँट्स वाचण्यासाठी? गूगल मध्ये यावर विचार-प्रक्रिया चालू आहे असं दिसतं.

तुम्ही तुमच्या मोबाइल वर Eyron.net वरून MUI-Hindi.CAB हि फाईल download करून घ्या मी माझ्या मोबाइल मध्ये (O2 xda ) मध्ये हे लोड केलेय

माझ्या HTC Touch वर पण चौकोनच दिसतात. :(

शानबा चा विजय असो !! ओपेराचे हे सेटिंग माहितीच नव्हते .. या आमच्या अर्धवट राहिलेल्या ब्लॉगवर विंडोज मोबाईल युजर्ससाठी थोडी मदत अव्हेलेबल आहे. http://prasad-muley.blogspot.com/