Skip to main content

पाळीव प्राणी.....

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/08/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
पाळीव प्राणी..... ब~याच लोकांना प्राणी पाळण्याची हौस असते..कुत्रे..मांजरी..पोपट..कबुतर..काकाकुआ..लॅव्ह बर्ड..कासव..ससा..एक ना अनेक असे अनेक प्राणी पाळणारे महाभाग आपणास माहित असतिल... काहि लोकांचे तर या प्राण्यावर इतके प्रेम असते कि तो त्यांच्या परीवाराचा एक सदस्य झालेला असतो..त्याची अंघोळ..शी..शु ते सारे आवडीने करीत असतात... घरी आलेल्या पाहुण्या समोर त्याचे किति लाड व कौतुक करु असे त्यांना होत असते.... एकदा चितळे बंधु [डेक्कन शाखा] च्या दुकानात श्रीखंड खरेदी करणारा मित्र भेटला..आज काय वहिनिचा वाढदिवस दिसतोय..हातातला डबा पहात त्याला विचारले..नाहि रे टॉमीला श्रीखंड फार आवडते...आठवड्यातुन एकदा

मैद्याच्या साध्या आणि सोप्या चकल्या......

लेखक शरयुप्रितम२०१० यांनी मंगळवार, 03/08/2010 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- मैदा - २ वाट्या तिखट:- चवीनुसार हळद:- १ छोटा चमचा. तीळ :- १ छोटा चमचा ओवा:- आवडीप्रमाणे धनेजिरे पूड :- २ छोटे चमचे वाटलेलं लसून:- १ छोटा चमचा मीठ:- चवीनुसार तळणासाठी तेल, आणि एक मऊ कापड कृती:- पहिले कोरडा मैदा एका मऊ कापडामध्ये बांधून घ्यावा. कुकर मध्ये पाणी टाकून बांधलेले मैदा एका भांड्यात ठेवावा आणि वरून झाकण ठेवाव. तीन शिट्या झाल्या कि मैदा काढुन घ्यावा... कुकर मध्ये वाफ दिल्याने मैदा छान मऊसर होतो. मग त्यात सगळे जिन्नस आवडी प्रमाणे एकत्र करावे...

आयटीतल्या बायका

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 03/08/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेखनाची प्रेरणा एका वाक्यात सांगायची, तरः च्यायला, मग आम्हीच काय पाप केलं ? असे म्हणता येईल.) प्रविन्भप्कर आणि सुजय कुलकर्णींच्या लेखनाने आमचे डोळे खाडकन उघडले. आज जगातले सर्वात महत्वाचे प्रश्न, म्हणजे इंचाइंचाने मागे सरणारे कश्मीर (आणि वर सरकणारा हिमालय), ग्लोबल वॉर्मिंग, मेक्सिको खाडीतील तेल गळती, पुण्यातील परप्रांतीय मुलींची नशाखोरी, पॅराग्लायडिंगच्या छायाचित्रांमुळे वाढलेला इनोचा खप, ह्या सगळ्यांसाठी आयटीतल्या बायका जबाबदार आहेत, अशा आमच्या संशयावर जणू शिक्कामोर्तब झाले. आमचा हा संशय फार जुना आहे.

तंगड्यांवर तंगडे

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 03/08/2010 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई, आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही, येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही। विचार करुन होते मनाची लाही लाही, किती सोसणार घाव आता माझी आई, किती अजुन २६/११, आपले म्हणुन सोसायचे। तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे? राष्ट्रर्पण

पराक्रमी असा मी : हझल

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 03/08/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
पराक्रमी असा मी : हझल माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो त्याच्या खुजेपणावर, त्यानेच मात केली टुणकण उडून गजरा, वेणीत खोचते तो आधार लेखनीला खंबीर मेज आहे सोडून मेज केवळ खुर्चीस का लढे तो? प्रेमात सावलीच्या सुर्यास पारखा मी अंधार ही अताशा संगे मलाच नेतो उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला, तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते नावात एक धागा का अभय आढळे तो?
काव्यरस

" दि थर्टी फर्स्ट नाईट......

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 03/08/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
" सामाजिक जाणीवेला,सुधारणेच्या नावाखाली ,एका मर्यादित वर्गापुरत्या,संकुचित ठेवणार्‍या सुधारकांना समर्पित..... " " दि थर्टी फर्स्ट नाईट......" सध्या काही लोकांशी परिचय आणी स्नेह वाढला आहे.. १_ पी.एस्.आय निकम ...मी पोलीसमित्र असल्याने संपर्क वाढला आणी त्यानंतर कळाले,शेतमजुरांच हे पोर मिसरुड फुटायच्या वयात हवालदार झाल नंतर परीक्षा देत-देत फौजदार झाल. पाच वर्षाच्या खात्यातल्या प्रवासात अजुन नीटस पोलीसी वारं न लागलेला मी पाहिलेला पहिला फौजदार !! २_ बापु ...आडनावात खांदवे-पाटील असला तरी गुंठेमत्र्यांचा माज चेहर्‍यावर अजिबात नाय.

पंछी बनू उडता फिरू...

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 03/08/2010 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
गरमागरम धिरडी हाणली तोवर १०:४५ झाले होते. ११ ला निघायचे म्हणजे सगळ्यांना १०:४५ पासून हल्या करायला सुरू केले (पीएम ची खोड.... )शेवटी ११:०५ मिनिटांनी ७ जवानांनी साओ कॉन्राडो बीच कडे कुच केली.. तिथे पॅराग्लायडींचे कार्यालय कुठे आहे ही माहिती एप्रिल मध्ये किंमत विचारून हिंमत न झाल्याने आधीच झाली होती. तरी एकदा गुगलबाबाला शरण गेलो पेद्रो बोनीतो रँप इथे माहिती वाचली. बिगफ्लाय ह्या कंपनीची साईट बघून घेतली..

इयत्ता सहावीमधे आय आय टी परीक्षातयारी

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 03/08/2010 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज एका हैद्राबादकडल्या सहकार्‍याबरोबर गप्पा मारत होतो. विषय होता शिक्षणपद्धती वगैरे वगैरेचा. त्याने बोलता बोलता असे सांगितले की त्यांच्या शहरात काही शाळांमधून (की क्लासेस मधून ?) इयत्ता सहावीच्या मुलांना आय-आय-टी च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी वर्ग चालवले जातात. एकंदर स्पर्धा वाढलेली आहे हे तत्वतः माहिती असूनसुद्धा प्रस्तुत बातमीने थोडा धक्का बसलाच. थोडे कुतुहलही वाटले. आपल्यापैकी कुणी महाराष्ट्रातल्या कुठल्या गावी/शहरी अशा प्रकारच्या वर्गांसंबंधातले काही ऐकलेले आहे काय ? असल्यास त्याबद्दल ऐकायला जरूर आवडेल. आय-आय-टीचे वर्ग असतील नसतील.

घरातील ज्येष्ठ व्यक्ती

लेखक शुचि यांनी मंगळवार, 03/08/2010 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारची गोष्ट आहे. १० वर्षाच्या माझ्या मुलीची मैत्रिण आमच्याकडे माझ्या मुलीशी खेळायला म्हणून आली होती. आई म्हणजे माझ्या सासूबाई नेहेमीप्रमाणे लोकरीचा स्वेटर वीणत बसल्या होत्या. या चिमुरडीचा आल्या आल्या चिवचिवाट सुरु झाला. तिनी आल्या आल्या स्वेटरचं कौतुक केलं, तो शिकून घेण्यात रस दाखवला. आई फक्त शांतपणे म्हणाल्या "बघ, म्हणजे येईल." : ) आणि वीणू लागल्या. मैत्रिणीचा उत्साह बघून आमच्या पिल्लाला कंठ फुटला नसेल तर नवल - "आज्जी खूप छान वीणते. तिनी ऑलरेडी अर्धा स्वेटर वीणला आहे. ती मला शिकवणार आहे" मला ते सगळं ऐकून खूप लाज वाटली.