Skip to main content

माझा देव

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 27/11/2021 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
हातातल्या चावीचा जुडगा सावरत त्यातली नेहमीची चावी वेगळी केली आणि समोरच्या कुलुपाला लावली. बराचवेळा चावी फिरवूनही कुलूप काही उघडेना. शेवटी कुलुपाला धरून जोरात ओढले. कुजलेल्या बिजागरीने कुलपाची साथ सोडली आणि कुलूप हातात आले. कडीही निघून खाली पडली. आत काय असणार याचा मला पुरेपुर अंदाज होता. तरीही मनाची खात्री करून घेण्यासाठी आत डोकावून बघितले. दहा रुपयाच्या दोन नोटा एका कोप-यात पडून होत्या. दुस-या कोप-यात एक कोळी आपले जाळे मांडून बसला होता. त्या दोन नोटा बाहेर काढून मी खिशात टाकल्या आणि देव्हा-याकडे निघालो.समोरची गणेशची मुर्ती माझ्याकडे रोखून बघत होती.

आठवण एका साथीदाराची...

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 27/11/2021 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice of Russia ची हिंदी सेवा ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित झालो.

पद्याव्हान १ - लिमरिक्

लेखक धष्टपुष्ट यांनी शुक्रवार, 26/11/2021 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
लिमरिक् हा इंग्रजीतला प्रख्यात विनोदी आकृतिबंध पाचच ओळींचा असतो म्हणून पहिल्यांदा घेतला.

लालपरी काही रम्य आठवणी

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 26/11/2021 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याचे संप आणि त्यातील राजकारण जरा बाजूल ठेवून महाराष्ट्राच्या एस टी चाय रम्य आठवणीना उजाळा देणे हा या दहंग्यामागचाच शुद्ध हेतू आहे कृपया सहकार्य करावे - याआधी सातारा स्थानक आणि ठेवील कँटीन बद्दल लिहिले आहेच , पुण्यातल्या किंवा कोहापुरातल्या स्ट्यांड पेक्षा शुद्ध या त्यामानाने छोटी असलेली गावात असा भारी स्टॅन्ड कसा काय हे कळायचं नाही ! मुंबईत तर एस तो चा स्टॅन्ड असा कुठे आहे हे कुतूहल होते ... नंतर कळले मुख्यालय कुठे ते.. तिथे गेल्यावर असा विचार आला कि एस ती ने मुंबई नागपूर किंवा इंदूर कोण जात असेल का?

ध्यानधारणा ....ज्याची त्याची....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 26/11/2021 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ... विपश्यना आणि रॅन्डम मी ... https://www.misalpav.com/node/49591 ... -------- मुळात, ध्यानधारणा ही आवश्यक आहे का? माझ्या अनुभवा नुसार, ध्यानधारणा ही अत्यावश्यक आहे... मला जाणवलेले काही मुद्दे म्हणजे, आपणच आपली उन्नती करत जातो. हळूहळू का होईना पण, निश्र्चितच आपण आपल्याला ओळखायला लागतो. मनाचा मनाशी मनापासून संवाद होणे, म्हणजेच ध्यानधारणा.

पद्याव्हान - आकृतिबद्ध पद्य

लेखक धष्टपुष्ट यांनी शुक्रवार, 26/11/2021 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
सहज डोक्यात विचार आला. मिसळपाववर अनेकांनी वृत्तविषयक लेख लिहिले आहेत. पण साधारणत: वृत्त हे पद्याच्या ओळीशी निगडीत असतं, पूर्ण कवितेच्या आकृतिबंधाशी नाही. . गझलचा आकृतिबंध (poetic form) बर्‍यापैकी परिचयाचा आहे. हायकू आहे. पूर्वी लोक सुनीत लिहायचे (मुख्यत्वे शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये). पण याव्यतिरिक्त आकृतिबद्ध कविता मराठीत विशेष दिसत नाहीत. जगातील साहित्य परंपरांमध्ये अनेक रोचक आकृतिबंध आहेत. मला वाटलं आपण मिसळपाववर आव्हानमाला चालू करायला हवी.

राजवंशी

लेखक राहत यांनी गुरुवार, 25/11/2021 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
राजवंशी वणव्यात भार गवताचे ते टाकुन गेले वाहत्या गंगेत कसे हात धुऊन गेले अंधार शोधण्या ते दीप घेऊन आले आसवांच्या गावाला हुल देऊन गेले रिक्त तर्कांची मते हाती घेऊन आले भाट अर्थहीन शब्दांचा ढोल बडवुन गेले घेऊनी विजय मनीषा हात जोडून आले आणीबाणीत सारे कसे पांगुन गेले उदकाहूनी निराळे तरंग मानून गेले राजवंशी थाटात दिंडित राहुन गेले - राहत

जात्या मधले दाणे रडती सुपातले हसती......

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 24/11/2021 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
जात्या मधले दाणे रडती सुपातले हसती. " वृद्धांचे फालतू लाड बंद करा" ,लेख मिसळपाव ब्लॉग वर वाचला. आवडला, भरपूर प्रतिसाद मिळाले. लेखक यशस्वी झाले. एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यावर असे वाटू लागले आहे की वृद्धत्व शाप की वरदान. अर्थात तो एक वेगळा धागा होऊ शकतो. प्रत्येकाचा अनुभव, दृष्टिकोन वेगळा अगदी पंचतत्रांतल्या गोष्टी सारखा. आमची खेळातली पहिली पारी खेळून झाली. एक्स्ट्रा ओव्हर्स पण संपल्यात. आता पँव्हेलियन मधे बसलोय सामना संपण्याची वाट बघत.

हे डोंगरकड्या

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 23/11/2021 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
हे डोंगरकड्या --------------------------------------------- हे डोंगरकड्या , गड्या , काय डौलात उभा आहेस तू ! छाती पुढे काढून हे डोंगरकड्या , तुझ्या उन्नत छातीवर बरसत असतील मेघ अन त्यांच्या मोतियांची माळही रुळत असेल तिच्यावर अन तूही ते मोती अलगद सोडत असशील तुझ्या पायागती भरभरून हे डोंगरकड्या , हिवाळ्यात धुक्याची शाल लपेटत असशील तुझ्या त्या छातीभोवती तरुणीच्या धवल अवगुंठनासारखी अन गार वारंही गपगुमान बाजूबाजूने वाहून निघून जात असेल तुझ्या पोलादी छातीला नमून हे डोंगरकड्या , ग्रीष्मात तुझ्या कड्यावरचं गवत पिवळं - पिवळं पडत असेल एखाद्या बुजुर्गाच्या छातीवरचे केस न केस पांढरे झाल्य

तिथे कोणी नि:शब्द

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 21/11/2021 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी जसा झेप घेण्यास सरसावतो... ....खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी चिदाकाश व्यापून झंकारतो ...स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा उगा विरघळावा तसा भासतो .....जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम तिथे कोणी नि:शब्द झंकारतो