जात्या मधले दाणे रडती सुपातले हसती......
जात्या मधले दाणे रडती सुपातले हसती.
" वृद्धांचे फालतू लाड बंद करा" ,लेख मिसळपाव ब्लॉग वर वाचला. आवडला, भरपूर प्रतिसाद मिळाले. लेखक यशस्वी झाले.
एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यावर असे वाटू लागले आहे की वृद्धत्व शाप की वरदान. अर्थात तो एक वेगळा धागा होऊ शकतो.
प्रत्येकाचा अनुभव, दृष्टिकोन वेगळा अगदी पंचतत्रांतल्या गोष्टी सारखा.
आमची खेळातली पहिली पारी खेळून झाली. एक्स्ट्रा ओव्हर्स पण संपल्यात. आता पँव्हेलियन मधे बसलोय सामना संपण्याची वाट बघत.
संत साहित्य विषेशतः कबीरदासजी आणी कवी बोरकर यांच्या साहित्या मधे सूर गवसला.
कबीरदासजी म्हणतात ,
जो उग्या सो अन्तबै, फूल्या सो कुमलाहीं।
जो चिनिया सो ढही पड़े, जो आया सो जाहीं।
म्हणून सामना संपण्याची भीती वाटत नाही.
" तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे
स्वप्न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे "
- बोरकर
जेव्हां तार गरम होती तेव्हां, "जपानी रमलाची रात्र" मनसोक्त भोगली. ती निळी चांदरात पण अनुभवली.
"तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात"
- बोरकर
आता आयुष्याची कांचनसध्या....
पिलांस फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे,
आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.
,"विसाव्याच्या क्षणी" सौभाग्यवतीला म्हणालो ,
" कशास नसत्या चिंता-खंती
वेचू पळती सौम्य उन्हे,
सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,
शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं."
- बोरकर
पण तीची अवस्था सोंगी भारूडा सारखी,
" आवा चालली पंढरपूरा
वेशीपासून आली घरा
परिसें घे सुनबाई
नको वेचू दूध आणि दही
ऐक गोष्टी सादर
बाळी करी जतन फुटकी पाळी।"
- सुमन विठ्ठल आवा
बाल भारती भारूड
मुलं आपापल्या क्षेत्रात मशगुल, आम्ही सूर्यवंशी त्यांचा सुर्य घराचे पडदे बाजुला सरकतात तेव्हाच उगवतो. हल्लीची पिढी आपल्या पेक्षा जास्त हुशार आहे याचा साक्षात्कार झाल्याने काळजी करत नाही.शेजारी डोकवावे इतपतच मुलांना सल्ले. फारसे लक्ष देत नाही कारण आपलं गाठोड आपणच वहायचं ना!
शिस्तबद्ध जीवन, कालच हिशोब करत होतो गेल्या दहा वर्षांत जवळपास २८००० किलोमीटर चाललोय. दिवेकर नाही, दिक्षीत नाही, हिरवा चहा सुद्धा नाही. चारी ठाव जेवणे आणी आठ तास घोरणे हाच दैनंदिन नित्यक्रम. वजन ९० खालीच यायला तयार नाही. "डबल हाडाचा ", " मट्टी भारी " आसा स्वताःचा गोड गैरसमज करून घेत काळजी करत नाही. उरला सुरला वेळ वाचन,संगीत मालीनी राजूरकर ते कौशीकी पं भीमसेन ते जयतिर्थ मेवूंडी, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप ,वडाळी बंधू गुलाम अली,नुसरत फतेह कोणिही, आम्ही फक्त कानसेन. OTT ने एक चांगली सोय केली आहे. " मिपा ", सोने पे सुहागा.
कबीरदासजी च्या सांगण्या प्रमाणे योग्य वेळी योग्य आणी स्पष्ट बोलणे अन्यथा आपण बरे आणी आपलं काम भले.
" अति का भला न बोलना, अति की भली न चूप ,
अति का भला न बरसना , अति की भली न धूप "
कबीरदासजीच्यां म्हणण्यानुसार जे काय आहे ते इथेच स्वर्ग आणी नर्क त्यामुळे जे काही भोगायच ते इथेच. तेव्हा आपण गेल्यानंतर मागे काय होईल याची चितां नाही.
" वहाँ न दोजख, बहिस्त मुकामा।
यहाँही राम, यहॉँही रहमाना।।"
सुत सपुत तो क्या धन सिंचे। सुत कपूत तो क्या धन सिंचे।
पुत्र सुपुत्र आसेल तर तो स्वताःच संपत्ती तर कुपात्र आसेल तर कितीही ठेवा काही उपयोग नाही. आशी उदाहरणे आपल्या आवती भवती पुष्कळ सापडतील.
म्हणून म्हणतो आयुष्याची संध्याकाळ जर सुखकर करायची असेल अर्थात आसेल त्या परिस्थितीत तर स्वतः करता जगा. माझीच मराठी रचना विचारार्थ......
म्हणून म्हणतो.......
जीव आहे तोवर जगून घ्या
डोळे आहेत तोवर बघून घ्या
काय माहिती.......
तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल
म्हणून म्हणतो
तुझं माझं करू नका
एकमेकाचे हात सोडू नका
मेल्यावर काय होईल त्याच उत्तर
मेल्या शिवाय कळणार नाही
म्हणून म्हणतो.....
इहलोकीचा स्वर्ग पुन्हा मिळणार नाही
काय माहिती....
देवदूत येतील का यमदूत नेतील
पुनर्जन्म देतील का तिथचं ठेवून घेतील
म्हणून म्हणतो.......
आजच्या करता जगा
उद्यासाठी काही करू नका
म्हणून म्हणतो.......
रात्रीच स्वागत, दुःखाचा उत्सव करून बघा
दुसऱ्या च्या दुःख आपलं मानुन जगा
काय माहिती......
मनाचा गाभारा कदाचित उजळेल
माणसातला देव तुम्हाला ही भेटेल
- कसरत
२२-५-२०२१
एकदा का गाडी उतारावर आली की आपल्या मनासारखं वागून घ्या. प्रत्येक जण स्वयंभू त्यात आपली भागिदारी जवळपास नाहीच.
मिपाकरांची माफी मागून माझीच एक हिन्दी रचना खाली देतोय , गोड मानून घ्या .
बोनस......
चलते चलते सुबह से शाम हो गयी।
जीदंगी यूँ ही तमाम हो गयी।
"बुढा हो गया है, अब तो सम्हल जा। "
बिना मांगे नसिहत मील गयी ।
मै भी मस्त मलंग ठैरा ।
कह देता हूँ नही मै कोई
ऐरा गैरा नथ्यू खैरा
जीता हूँ अपने तरीके से आखीर
आने वाला हर दिन, " बोनस ", जो ठैरा।
बडी मुद्दत्त से पता ढुंढ रहा था ।
जो हर मोड पर धोका देती थी
बडी शिद्दत से मुलाकात हुयी है।
ऐ जीदंगी अब मेरी बारी आयी है।
ना फाईल है ना लाईन है।
अब जीदंगी शाईन ही शाईन है।
भर भर के जी रहा हूँ।
कुदरत के जाम पी रहा हूँ।
ना जाने का डर ना खोने का गम
बांटो खुशीयौं बटोरो गम
यही है जिंदगी जीयो ठाठसे
मत सोचो चले जानेसे
किस कीस की आँखे होगी नम।
-कसरत....
२४-११-२१
वाचने
5776
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सुंदर, मननीय, वाचनीय.
आशादायक प्रकटन आवडले.
छान!!!
क्या बात!
धन्यवाद
In reply to धन्यवाद by कर्नलतपस्वी
सध्या तरी 3 पिढ्या आहेत
In reply to धन्यवाद by कर्नलतपस्वी
विचार आवडले
खुप छान
जीते है शानसे मरते है शानसे|
@ प्रकाशः घाटपांडे: तरीही संध्याछाया भिवविती हृदया
चोला माटी के हे राम......
तुमचं नाव तपस्वी कर्नल असं
धन्यवाद
In reply to धन्यवाद by कर्नलतपस्वी
अहो, खूप साधे आहे...
लई भारी