मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजवंशी

राहत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
राजवंशी वणव्यात भार गवताचे ते टाकुन गेले वाहत्या गंगेत कसे हात धुऊन गेले अंधार शोधण्या ते दीप घेऊन आले आसवांच्या गावाला हुल देऊन गेले रिक्त तर्कांची मते हाती घेऊन आले भाट अर्थहीन शब्दांचा ढोल बडवुन गेले घेऊनी विजय मनीषा हात जोडून आले आणीबाणीत सारे कसे पांगुन गेले उदकाहूनी निराळे तरंग मानून गेले राजवंशी थाटात दिंडित राहुन गेले - राहत

वाचने 2312 वाचनखूण प्रतिक्रिया 5

राहत Tue, 11/30/2021 - 16:43
सर्व वाचकांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.