पद्याव्हान १ - लिमरिक्
लेखनविषय:
लिमरिक् हा इंग्रजीतला प्रख्यात विनोदी आकृतिबंध पाचच ओळींचा असतो म्हणून पहिल्यांदा घेतला.
हा बऱ्याचदा भलताच चावट असतो, पण एक साधं उदा:
There was a young woman named Bright, (A)
Whose speed was much faster than light.(A)
She set out one day, (B)
In a relative way, (B)
And returned on the previous night. (A)
इंग्रजीतल्या शब्दांत साघात आणि निराघात syllables असल्यामुळे लिमरिकची एक विशिष्ट लय असते. ती मराठीमध्ये आणणं कठीण आहे, पण आवश्यक काही बदल करून खाली लक्षणं देतोय:
१. पहिल्या ओळी मध्ये एखाद्या व्यक्तीचं किंवा गावाचं नाव असतं. उदा पुण्याचा, विनीता इ.; किंवा व्यक्तिविशेष - आपले नायक/नायिका पुढारी असतील, शाळकरी असतील,अमुक, तमुक. वरच्या उदाहरणात Bright हे मुलीचं नाव.
२. वृत्त (प्रायोगिक तत्वावर): लगागा लगागा लगागा लगागा. पण गुरुच्या ठिकाणी दोन लघु अक्षरं वापरण्याची मोकळीक. म्हणजेच लगागा च्या ठिकाणी लललगा चालेल.
हे काटेकोरपणे पाळलंच पाहिजे असं काही नाही, पण वृत्ताचा बट्ट्याबोळ करू नका. वेगळी लगावली भावली तर तीही चालेल. सैल असला तरी काही वृत्तसदृश ठेका विनोदनिर्मितीला उपयोगी होतो.
३. महत्वाचं हे: पहिली, दुसरी आणि पाचवी ओळ मोठी असते; तिसरी आणि चौथी लहान असते.
४. पहिल्या, दुसऱ्या आणि पाचव्या ओळीमध्ये अन्त्ययमक असतं (वरच्या उदाहरणात A).
तिसर्या आणि चौथ्या ओळीमध्येही अन्त्ययमक असतं, पण वेगळ्या अक्षराचं (वरच्या उदाहरणात B). यालाच AABBA rhyme scheme म्हणतात.
थोडक्यात, लिमरिक् अशी दिसते
XxxxXxxxxXxxxA
XxxxXxxxxXxxxA
XxxxXxxxB
XxxxXxxxB
XxxxXxxxxXxxxA
स्वरचित (भंगार) उदाहरण:
सुगंधा प्रवासा निघाली म्हमयला (A)
उतरली कि नाकास दुर्गंध आला (A)
म्हणाली कुठे नाक वळवू? (B)
कुण्या सायबाला हे कळवू? (B)
कि सोडून सगळे हे परतू पुण्याला? (A)
होऊन जाऊद्या!
वाचने
6179
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
पहिले नमन...
In reply to पहिले नमन... by अनन्त्_यात्री
हा हा हा
हे जमलंय?
In reply to हे जमलंय? by प्राची अश्विनी
:)
In reply to हे जमलंय? by प्राची अश्विनी
वृत्त
वाडीमधला नाना बापट
In reply to वाडीमधला नाना बापट by गवि
आवडली.
_/\_
(एका जुन्या इनोदाचे रूपांतर.)कोपऱ्यावरचे सान इस्पितळ, गोंधळलेले डॉक्टर जोशी; रुग्ण बिचारा हतोत्साहाने वर्णवुनी सांगितो त्याची शी "पडते ती जशी शेवई" मुरडत नाक, उचलत भिवई, वदती जोशी "बसण्याआधी बनियान उचलुनी पहा खाशी."रघुपति मति माझी आपुली शी करावी!
उदाहरणावरच प्रयोग
In reply to उदाहरणावरच प्रयोग by विनायक पाटील
:)
बहुयत्ने मिपावरती एक प्रसवला
In reply to बहुयत्ने मिपावरती एक प्रसवला by कानडाऊ योगेशु
धन्यवादु
मस्त प्रकार,
In reply to मस्त प्रकार, by ज्ञानोबाचे पैजार
ओमि-गॉड!
अजून एक
वाह, मस्तच प्रकार आहे.
In reply to वाह, मस्तच प्रकार आहे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
खरंय