एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 3 (400 किमी)
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 3 (400 किमी)
300 ची BRM तर पूर्ण झाली, आता 400. लगेच 4 डिसेंबरला मुंबई क्लबची मुलुंड - चिखली - मुलुंड अशी BRM होती. दापोलीच्या खानविलकर आणि पालवणकर ने नाव दाखलही केलं. पण 300 च्या BRM ने माझी खूपच वाईट अवस्था केली होती. हात आणि बोट दुखत होती. करंगळी आणि अनामिका बधिर अवस्थेत होत्या. खांदे दुखत होते. मी जराही उत्सुक नव्हते.श्रीनिवास चा देखील 300 च्या वेळेस पाय दुखायला लागला होता.IT बँड दुखावला अस काहीसं कळलं. अशा वेळी आठवडा पण पूर्ण विश्रांती नसताना 400 ची रिस्क घ्यायची का? तर उत्तर नाही असाच आलं. आम्ही मनोज दादाला दापोलिकरांबरोबर जायला सांगत होतो.
मिसळपाव