Skip to main content

गुजरात सहल २०२१_भाग ३-भूज, द्वारका

लेखक गोरगावलेकर यांनी रविवार, 09/01/2022 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ येथे वाचा ------------------------ आज सहलीचा तिसरा दिवस. अर्धा दिवस भूजमध्ये भटकंती करून द्वारकेसाठी प्रवास करावयाचा होता. पण अंतर जास्त असल्याने वाटेत जामनगरलाच मुक्काम करणार होतो. ठरल्याप्रमाणे सकाळी नऊला नाश्ता आटोपून भुजकडे निघालो. वाटेत एका ढाब्यावर चहा घेतला. ढाब्यासमोर खाटा टाकलेल्या होत्या. माणसे येऊन बसली की लगेच प्रत्येकाच्या हातात बशी दिली जात होती व किटलीतून थेट बशीत चहा दिला जात होता. हीच पद्धत नंतर अनेक ठिकाणी दिसली. (चहा रु.१०/-प्रति बशी) चहा मात्र सर्व ठिकाणी उत्तम मिळाला.

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/01/2022 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले अजूनी होते हवे ते परी न आता उरले उबदार किती ते वाटे गारठ्यामधे लेवून अंगी जणू चिलखत ते भासे कितीही संकटे आली जरी घाव वर्मी ते सोसतसे किती निगूतीने वस्त्र निर्माण केले उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले शिलाई नाजूक टाके अचूक रंग तयाचे भरदार असले या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण कुणी न विणकर आता न विणणार भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला पुन्हा कधी न उमटे आधार होता किती नाही म्हटले तरी आठव तयाची राहील कायमची उरी न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले माझे बाबा देवाघरी गेले - पाषाणभेद ०९/०१/२०२२

माझी शाळा, निसर्ग शाळा - भाग २

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 08/01/2022 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
(याआधीचा भाग इथे लिहिला होता -- माझी शाळा, निसर्ग शाळा) तोरणा विद्यालय साधारण जुलै २०२१ मधे आम्हां माजी विद्यार्थ्यांनी खूप वर्षांनी ऑनलाईन एकत्र येऊन, प्रत्यक्ष भेट वगैरे खर्च टाळून, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का यावर चर्चा सुरू केली आणि पहिल्या टप्प्यात गरजू विद्यार्थांसाठी अवांतर वाचनासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य यावर एकमत झालं. एकत्र येऊन काम करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने असेल कदाचित, उपक्रमातील पहिला टप्पा थोडा उशिराने, पण व्यवस्थितपणे

तापोळा - महाराष्ट्राचे मिनी काश्मीर

लेखक MipaPremiYogesh यांनी शनिवार, 08/01/2022 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
"तापोळा - महाराष्ट्राचे मिनी काश्मीर" घरी बसून कंटाळा आलेला आणि त्यातून लग्नाचा वाढदिवस जवळ आलेला म्हटलं काहीतरी जवळपास पण कधी न गेलेलो ठिकाण पाहू. मग नोव्हेंबर च्या शेवटी प्लॅन केला , शक्यतो वीकएंड टाळून (म्हणजेच गर्दी टाळून ) जाता येईल असं ठरवून गुरुवार शुक्रवार सुट्टी हाणली आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या "तापोळा" ह्या ठिकाणी जाण्याचं ठरवले. बुकिंग साठी बरेच ठिकाणं शोधली आणि "शिवसृष्टी ऍग्रो टुरिसम " इकडे बुकिंग करून निवांत झालो. ह्या वेळेस ठरवले होते कि जास्त फिराफिर न करता निवांत राहायचे.

धोखेबाज

लेखक srahul यांनी शनिवार, 08/01/2022 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
धोखेबाज राज कपूर च्या मनातील कलाकार सदा सर्वदा जागा असे , याची साक्ष देणारे बरेच किस्से आहेत , त्यातील आठवलेला आणि मी ऐकलेला किस्सा शेअर करतो . ख्वाजा अहमद अब्बास पटकथे वर आधारित सिनेमाच्या गडबडीत राज कपूर होता . कथेचा नायक परिस्थिती वश होऊन म्हणा किंवा आपल्या अडचणी मुळे हताश होऊन थोडी लांडी लबाडी करतो , आणि नंतर त्याची सद्सद्विवेक बुद्धी जागी होते आणि तो परत नेहमीच्या चांगल्या मार्गावर येतो. असं कथानक होतं. राज कपूर ने या सिनेमाचं नाव ठरवलं होतं , “ धोखेबाज “. पण का कुणास ठाऊक , त्याला स्वत: ला हे नाव खटकत होतं. नकारात्मक वाटत होतं .

एक अपरिचित प्रकाशन - सैनिक समाचार

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 08/01/2022 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणाऱ्या सैनिक समाचार या पक्षिकाचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला. सुरुवातीला 16 पानांचे ते साप्ताहिक केवळ उर्दू भाषेतून प्रकाशित होत असे. त्यावेळी या साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत होती एक आणा. कालांतराने इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांमधून फौजी अखबार प्रकाशित होऊ लागला. आज इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमधून हे प्रकाशन प्रकाशित होत आहे. सुरुवातीला फौजी अखबारचे मुख्य कार्यालय सिमल्यात असले तरी त्याचे प्रकाशन अलाहाबादहून होत असे. भारतीय लष्करातील घडामोडींची माहिती जवानांना करून देता यावी या हेतूने फौजी अखबार सुरू करण्यात आले होते.

जेथोनि सुरुवात होते..

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 07/01/2022 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
तर तेव्हा समजा शाळेत वगैरे जावं लागत असलं आणि अभ्यास वगैरे असला तरीही आम्हाला अगदीच काही कंदीलाच्या वगैरे उजेडात अभ्यास करायची गरज पडली नाही, कारण दुर्दैवाने त्या गावात आधीच लाईट आली होती..! त्यामुळे "आम्ही कंदीलाच्या उजेडात अभ्यास करून आयुष्यात असे असे झेंडे लावले!" ह्याप्रकारचे चमकदार डायलॉग वेळप्रसंगी मारता येत नाहीत, याची आज मोठीच हळहळ वाटते. तर जन्मदाते म्हणाले की,''सगळीच पोरं जातेत तर तू बी जात जा शाळेला. उगा पांदीवगळीतनं खेकडी हुडकत फिरण्याबगर हितं बसून तरी दुसरं काय करनार हैस तू ?'' सवाल बिनतोड होता. आणि माझ्याकडे ठोस असं उत्तर नव्हतं.

ध्रांगध्रा - ८

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 07/01/2022 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या अगदी सीमेवर खंदक असावा तसा एक छोटासा नाला ,ओढा दिसतोय. वात तिथे संपतेय. आणि तो ओढा ओलांडल्यावर नवीन वाट दिसतेय.ओढ्याच्या काठाशी वाट संपतेय तिथे महेश उभा आहे.. दिसला बाबा एकदाचा. मी झपझप पावले उचलत महेशपर्यंत पोहोचतो. मागील दुवा ध्रांगध्रा - ७ http://misalpav.com/node/49747 बरं झालं बाबा. इथे थांबलास.तुला थाम्ब थांब म्हणत होतो. पण तू आपला बुंगाट." महेश दिसल्यामुळे माझी काळजी कमी झाली पण मघाची नाराजी पुन्हा वर आली. " तू हाक मारलीस? मला काहीच ऐकू आले नाही! उलट मलाच काळजी वाटत होती की तू त्या धुक्यात वाट चुकतोस की काय म्हणून.

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ३

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 07/01/2022 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
.container1 { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; } आधीचे भाग : कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - १ कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - २

धावपटू- शतशब्दकथा

लेखक निओ यांनी गुरुवार, 06/01/2022 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटेची मॅरेथॉन साठी जमलेली गर्दी. बंदुकीचा इशारा झाला आणि त्याने सर्वांसह दुडकी चाल धरली. श्वासाचा आणि धावण्याचा मेळ बसल्यावर त्याने वेग वाढविला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी अचंबित होऊन त्याच्याकडे पाहत होती. पण त्याला सवय होती. शर्यतीत राबणारे स्वयंसेवक त्याला मदत द्यायला उत्सुक होते. अर्धं अंतर कापल्यावर त्यानं वेग वाढविला. अजूनही आपल्यात ऊर्जा शिल्लक आहे हे पाहून जोरात धावू लागला. शेवटच्या टप्य्यात तर त्याने कमाल केली. उरले सुरले सगळे स्पर्धक मागे टाकले. दुसऱ्या दिवशीचं वर्तमानपत्र त्याने अपेक्षेने उघडले. क्रिडाविभागात, धावत असतानाचा त्याचा पूर्ण फोटो छापून आला होता.