"छ्या! यंदाच्या "मिस अर्थ'मध्ये काहीच अर्थ नाही! कुठल्याही ब्यूटी कॉंटेस्टमध्ये पहिल्या आलेल्या मुली कशा एसटीत बसून पोटात ढवळल्यावर उलटी दाबल्यासारखे हात तोंडावर ठेवतात....तसे हिनं का नाही ठेवले?'' चि. कुरकुरे सक्काळी सक्काळी टीव्ही बघताना चेष्टेच्या मूडमध्ये होता.
""ईईईई...काय काहितरी घाणेरडं बोलतोस रे?'' कु. किरकिरेनं त्याच्या डोक्यात एक टप्पल मारली.
""घाणेरडं काय? दर वेळी तसेच नाही का फोटो येत? पण ही निकोल का कोण, तिनं चक्क संपूर्ण चेहरा दाखवणारे फोटो दिलेत, म्हणून जरा शंका आली, एवढंच!''
""बरं. कळली हा तुमची अक्कल! आता गप्प बसा.'' कु.