Skip to main content

रानवट

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 03/02/2022 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
वार्‍याची लहर फडफडणारा पदर उधळले रंग विभोर चालत होते रानवट|| उषेचे स्मित ओठांवर दवांची माळली धार अणू रेणूचे नुपूर चालत होते रानवट|| कोमल स्पर्श अवनी विखुरलेल्या दिशा वेचुनी लाटांचे नीरज तोडूनी चालत होते रानवट|| डोहाच्या तळाशी आठवणी सुरूंग त्यावर पेरुनी राखेचा घट उचलूनी चालत होते रानवट|| अज्ञानाचे सुख त्यागुनी ज्ञानाची ठेच लागली ठसे उमटली आरसपानी चालले ....रानवट|| -भक्ती

आणखी एक किस्सा

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 03/02/2022 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक किस्सा काल माझ्याकडे एक सद्गृहस्थ आले होते. वय वर्षे ४३ हे एका प्रथितयश आय टी कंपनीत सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काम करत असतात. त्यांना आम्लपित्त होत होतं त्यासाठी. व्यायाम शून्य, एका जागी बसून सकाळी ९ ते रात्री ९ काम, वेळी अवेळी जेवण, मसालेदार तेलकट जेवण रोजचंच. (आय टी मध्ये भरपूर पगार मिळणाऱ्या टिपिकल माणसाची कथा) सोनोग्राफी केली. बाहेर खाल्ल्यामुळे पोट बिघडून आतड्याला सूज आलेली होती. आणि यकृतात चरबी ठासुन भरलेली दिसत होती. मी त्यांना विचारलं, वजन किती आहे? त्यावर ते म्हणाले ९८ किलो. त्यांची उंची ५ फूट ७ इंच आहे. त्यांना विचारलं घरी कुणाला मधुमेह आहे का?

शोध

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 03/02/2022 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
निर्झरातून वाहणारे सागरातून लहरणारे खोल आतून उमलणारे मी पणाशी झुंजणारे वास्तवाच्या वाळवंटी मृगजळे साकारणारे जाणतो मी स्वल्प काही जाणिवेला छेदणारे नेणिवा ओलांडणारे भोवताला व्यापणारे व्यापुनी हुलकावणारे नश्वराच्या चौकटीतून शाश्वताशी बोलणारे शोधतो मी गूढ काही

दोन पैश्याचं ऊन !

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 03/02/2022 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
सीन १: मुंबईतला पावसाळी दिवस, धो धो पाऊस कोसळतोय. तो पावसात चिंब भिजून आंतर्बाह्य निथळतोय ! समोर काही सेकंद थांबलेल्या टॅक्सीचे दार उघडून तो आत घुसतो. टॅक्सीत एक तरुणी आधीच बसलीय. ती त्याला उतरायला सांगतेय. धो धो पावसामुळे तो टॅक्सीतच थांबायचे आहे. तिला वाटतेय हा आपला "ग्राहक" म्हणून बसू इच्छितो ! "मी रस्त्यात एके ठिकाणी थांबणार आहे, अर्धा तास लागेल." पुढच्या दृष्यात ती एका फ्लॅटची बेल दाबते, फ्लॅटवाला दरवाजा उघडतो. ती थेट त्याच्या बेडवर जाऊन बसते. "कॉण्डोम लाया ना? " सॅण्डल काढता-काढता तिचा प्रश्न. "मी काय पैसे देत नसतो का?" तो. त्यानं कॉण्डोम आणलेला नाहीय हे ती ओळखते.

अवास्तव वास्तव

लेखक भागो यांनी गुरुवार, 03/02/2022 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
अवास्तव वास्तव आज रविवार होता. कदाचित शनिवारही असेल. काय फरक पडणार होता? काही वाटेल ते झालेतरी तरी तो आज काम करणार नव्हता. उठून चहा करून घ्यावा असं वाटलं होतं पण नाही उठला. अंथरुणात लोळत पडण्यातली मजा काही औरच. अर्धवट झोपेत अर्धवट..... तेवढ्यात टेलिफोन वाजला. त्याने घड्याळात पाहिले. जवळ जवळ दहा वाजत होते. आता कोण फोन करत होतं? टेलेफोन वाजायचा थांबला. चला सुंठीवाचून खोकला गे ... पुन्हा घंटी वाजायला सुरुवात झाली. आता घ्यायलाच पाहिजे. त्याने आळसटलेल्या हाताने फोन उचलला. “हॅलो साहेबगारू, चला लवकर ऑफिसला या. मी पण येतोय. चांगली बातमी आहे. फंडिंग मिळणार अशी चिन्हं आहेत.

कळते जगत जाताना

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 01/02/2022 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
युगायुगांचे असते एकटेपण लाखोंच्या सोबतीने जगताना खोल खोल भासते आयुष्य रितेपन भरून काढताना अनामिक नात्याची वीण दिसते कधी घट्ट बसताना नकळत मग तुटते काही तिथे मनापासून गुंफताना डोळ्यादेखत ढळते, ज्यात वेचले आयुष्य रचताना हे असे घडू नये वाटते नेमके तेच घडत असताना पतंग विसरतो दाहकता पिंगा घालून जळताना आयुष्यही असते असेच कळते जगत जाताना - संदीप चांदणे

गुजरात सहल २०२१_भाग ६-जुनागड

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 01/02/2022 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग येथे वाचा गुजरात सहल २०२१_भाग ५- सासन गीर सहलीचा सातवा दिवस पुढे सुरु साडे अकराला गीर रिसॉर्ट सोडले आणि जुनागडकडे रवाना झालो. अंतर जास्त नाही फक्त दीड तासाचा प्रवास (५७किमी). सहलीच्या आधी काही गोष्टींचा विचार केला होता. गीरहुन निघून थेट गिरनारला जायचे का? दुपार होणार होती. सगळ्यांना शक्य नसले तरी काहींची गिरनार चढाईची तयारी होती. दुपारनंतर उन्हाचा त्रास होऊ शकतो या कारणाने आज जुनागड स्थानिक स्थळे पाहणे व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच गिरनारला जायचे ठरवले होते. गेले दोन दिवस गीर विहार रिसॉर्टला खूप मजेत गेले होते.

दोन किस्से

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 31/01/2022 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोन किस्से १) परवा शनिवारी माझ्याकडे एक २७ वर्षाची गरोदर मुलगी सोनोग्राफीसाठी आली होती. तिला (अंगावर जात होते) रक्तस्त्राव होत होता. सोनोग्राफी केली त्यावेळेस गर्भ ९ आठवड्याचा असायला हवा होता, तो केवळ ६ च आठवड्याचा होता आणि जन्मजात विकलांग( MALFORMED) होता. अर्थात हृदयाचे ठोके चालू नव्हतेच. त्यामुळेच रक्तस्त्राव होत होता. म्हणजेच नैसर्गिक रित्या गर्भपात होणार होता. मी त्या रडत असलेल्या मुलीला समजावत होतो कि हि एक निसर्गाची करणी आहे. तुम्ही सडका आंबा झाडाला चिकटवू शकत नाही.

या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं!

लेखक nemake_va_mojake यांनी रविवार, 30/01/2022 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
हेमंत दिवटे हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, प्रकाशक, आणि एकूणच काव्योत्तेजक वल्ली. "या रूममध्ये आलं की लाईफ सुरू होतं" ही त्यांची एक प्रसिद्ध कविता. आणि कुठल्याही वाहत्या व्हॉट्सॅप ग्रूपसाठी हे त्या कवितेचं विडंबन - अर्थातच मूळ कवितेच्या मानाने अगदीच थिल्लर. या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं... दूरवरून आलेल्या या पोस्ट्स एकटक माझ्याकडे पाहू लागतात यापैकी कुठल्या पोस्टचा मी टारगेट अॉडिअन्स असेन? असेनच का? कसकसल्या आठवणी देतात मला या पोस्ट्स. जसं की मी चाललोय भर संध्याकाळी उपनगरीय स्टेशनातून बाहेर या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होत
काव्यरस