....... नरें निर्मिले
जेपर्डी ह्या प्रश्नोत्तराच्या (खरे तर उत्तर-प्रश्नाच्या) कार्यक्रमात कालपासून एक आगळा-वेगळा प्रयोग सुरू झाला आहे. एरवी ह्या कार्यक्रमात तीन स्पर्धक व्यक्ती भाग घेतात. परंतु, १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी होणार्या कार्यक्रमांत दोन व्यक्तींसमवेत IBM ने बनवेली WATSON नावाची संगणक प्रणाली भाग घेणार आहे.
जगातील विविध विषयांवरील अब्जावधी बाईट्सचा विदा ह्यात भरलेला आहे. प्रश्न समोर येताच त्याचे पृथःकरण करून, विदा धुंडाळून उत्तर काढण्याचे काम ही प्रणाली करील.
कालच्या अपूर्ण राहिलेल्या कर्यक्रमाच्या अखेरीस, ही प्रणाली आणि एक स्पर्धक ५००० डॉलरची रक्कम मिळवून आघाडीवर होते.
क्रांती ~ आणि क्रांतीमधील एका 'आयकॉन' च्या फोटोची जादू...!!
" alt="CheA" />
इजिप्तमध्ये अखेर "क्रांती" झाली आणि एक सत्ता उलथवून टाकण्याची एकजुटीची शक्ती जनतेत कशी आणि केव्हा एकवटते याचे पुनश्च एकदा जगभरातील क्रांतीप्रेमींना प्रत्यंतर आले. अर्थात हा लेख त्या क्रांतीवर नसून एका क्रांतिवीरावर आहे.(पारावरचं आत्मचरित्र)
ही प्रेरणा.
पारावरचं आत्मचरित्र
वाचताना टोचलेले खडे
काही उगाच गमजा मारताना टाकलेले
तर काही असेच
निष्कारण अजाणतेपणी सुटलेले
चुकार फ्रेंड्स मधूनच
लाईक करत हवेत चढवत
आणि
चेहेर्याची पुस्तकं टाकताना,
लिहीताना वेळेचे भान नसे
चुचकारताना डबके झालेल्या,
जाहीर लिहीताना
हवेत मारलेल्या उड्या अन्
अंगावर उडवलेला
चिखल भिंतभर पसरवत बसे.
आता काम साधल्यावर
दारं बंद करून घेताना
उगाचच जीव कसानुसा होतो
काहीतरी टोचतं
आणि
अडगळीत पडल्याचा भास
जाता जात नाही.
माझ्यासकट सर्व attention hogs ना समर्पित.
काव्यरस
आकाशातील मी घन काळा
आकाशातील मी घन काळा
रोज शृंगारीत होतो मी
लेऊन रंग शलाका
नाही सीमा नाही बंधन
नभात स्वैर फिरणारा
मी मेघ-राजा
पण लोभ असा मज जडला
प्रवास संपून गार हवेच्या
प्रेमात जीव अडखळला
प्रीतीत तिच्या मी
जग विसरून गेलो
अस्तित्वास मुकून मी
आज बरसून गेलो
आसवांच्या झाल्या जलधारा
जीवनाचा हा खेळ सारा
जन्मण्यास पुनश्च देह माझा
नदीसागरात विलीन झाला
--------- शब्दमेघ ( २००७)
डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ५
मागील भाग - http://misalpav.com/node/16785
***
उन्हाळातल्या लाहा लाहा होणार्या दिवसांत अचानक कुठुन तरी चुळुक चुळुक आवाज येतो. घूंगरांचा तो परिचित आवाज येताच मनाला जवळच रसवंती असेल असे समजते आणि कोरड्या झालेल्या घशाला अन तापलेल्या डोक्याला थंड करण्यासाठी पाय आपोआप त्या आवाजाच्या दिशेने चालू लागतात. कधी जोरजोरात आवाज करणारा टेपच जवळच्या रसवंतीची सूचना देत असतो. गेल्याबरोबर हाफ नाही तर फुल्ल ची ऑर्डर देत आपण हाश्श हुश्श करत बसतो. समोर रस येताच पटकन ते अमृत घेत, तृप्त होत परत आपल्या मार्गाने निघुन जातो.
एक सर्व्हे- आय.टी. कामगारांचा !
(मला आलेल्या एका इ-पत्राचा मराठी अनुवाद)
* १०% आय.टी. कामगार हृदयविकार,मणक्याचे आजार,सांधेदुखी इ. ने त्रस्त असतात.
* २०% आय.टी. कामगार त्यांच्या सहकार्यान्शीच लग्न करतात.(च्या मायला)
* ३०% आय.टी. कामगार हे 'लिव इन रिलेशन' मध्ये राहण्यात उत्सुक असतात .कारण त्यांना ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणी जबाबदारी घ्यायला आवडत नाही. ;)
* ४०% आय.टी. कामगार हे गोंधळलेले असतात कि सेटल कुठे व्हावं.(भारतात कि भारताबाहेर ???)
* ५०% आय.टी. कामगारांची बँकेत काहीच बचत नसते. :(
* ६०% आय.टी. कामगार त्यांच्या चालू पगाराबद्दल नाखूष असतात.
* ७०% आय.टी.
<< प्रेमदिनाच्या खस्ता >>
प्रेमदिनाच्या रस्त्यावर
असलेले अनेक वेडे
काही यंगेजपणी चोरट्या नजरेने पाहिलेले
गुलाबांचे झेंडे लावतांना काही
तर काही असेच
खिशाला चाट पाडुन घेण्यासाठी तयार झालेले.
टुकार पाखरं मधुनच
समोर येत मनाला टोचत
आणि
फाट्यावरती अम्हास्नि उडवत
मोठे होताना लज्जा-भावनांचेही भान नसे.
कॉलेजपणात नंतर आल्यावर
कट्ट्यावर मुसमुसुन भरलेल्या त्या,
मित्रांच्या जिवावर मारलेल्या उड्या अन
मनात आठवणींनी गंधलेला
सुगंध शहरभर पसरत असे.
आता नव-शहरीकरण झाल्यावर
व्यक्ती-स्वातंत्र्याच्या खुलेपणात चालतांना
उगाचच मन कुठेतरी ठेचकाळते
काहीतरी टोचतं
आणि मॉनिटर समोर बसुनही
आठवणींच्या सुगंधाचा भास
जाता जात नाही.
मिसळपाव