या गडे नाचूया..नागडे नाचूया
आपल्या टीमने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर भारतीयांचा उत्साह शिगेला पोचणे स्वाभाविक आहे, पण हा क्रिकेटचा ज्वर आता कुठल्या पातळीपर्यंत चाललाय त्याची एक झलक सध्या माध्यमांत पाहायला मिळतीय.
पूनम पांडे नावाच्या मॉडेलने भारताने कप जिंकल्यास आपण संघासमोर कपडे काढणार असल्याचे जाहीर केले आहे. नुसते जाहीर करुन ती थांबली नाही तर तिने यासाठी बीसीसीआयकडे परवानगीही मागितली आहे. पूर्वी निर्लज्जपणाच्या कृतीचे वर्णन करताना 'कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे' असा वाक्प्रचार केला जाई. आता मात्र कमरेचे डोक्यालाही गुंडाळण्याची गरज राहिलेली दिसत नाही.
मिसळपाव