'तार्यांचे बेट' - प्रसन्न करणारा अनुभव
कामाच्या व्यापात बर्याच गोष्टी करायचे राहून जाते. सकाळी निवांत बसून वर्तमानपत्र वाचणे असो किंवा सहजच मारलेला एखादा फेरफटका असो; मोठ्या आनंदाच्या मागे दमछाक करणारी दौड करतांना छोट्या-छोट्या गोष्टींमधून विनासायास मिळणार्या आनंदाचा आपण नेहमीच बळी देत असतो. नंतर 'माझ्याच वाट्याला का अशी पळापळ' असे गळा काढून ओरडण्यात ही आपण मागे हटत नाही.
मिसळपाव
आमचे आहो: म्हणजे 'बटाट्याच्या भाजलेल्या काचऱ्या'.
मी: काय हे? अगदी कचरा केलास रे वेजेस चा! पोटॅटो वेजेस म्हंटल की कसा मस्त भारदस्त स्टायलिश आयटम वाटतो!
पण खरं ते इथे मान्य करायला हरकत नाही (आमचे आहो अजून मिपा वर नाहीयेत तोवर हि सुट घेता येतीये हो!) - पोटॅटो वेजेस म्हणजे भाजलेल्या बटाट्याच्या काचऱ्या. ह्यांनी जरी त्याचं देसी नामकरण केलं असलं तरी पदार्थ असतो लई फक्कड! आणि करायला कित्ती कित्ती सोपा! फक्त बटाटे, लाल तिखट, मीठ आणि थोडं तेल- एवढाच जिन्नस सुद्धा पुरतो.