(महावीर पांडू)
प्रेरणा
पोथी न पंचांग हाती मिरवत
पांडू फिरतो डोलत डोलत
दे आव्हाने येता-जाता -
"काय कुणाची आहे हिंमत?"
शुक्रावरुनी चंद्रावरती
चंद्रावरुनी राहूवरती
कधी कधी पण पुरता फसतो
पराक्रमी तो पांडू असतो!
प्रति-आव्हाने जर का येती
पांडोबाचे पद लटपटती
होराशास्त्री पांडू अमुचे
रिंगण सोडून पळून जाती!!
मिसळपाव