Skip to main content

जर्मनी आणि पोटगी

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 19/08/2011 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
काल DW-TV वर एक माहितीपट बघताना असे कळले जर्मनीत पोटगी आणि घटस्फोटाच्या कायद्यामध्ये स्त्रीयाना दिलेले झुकते माप कमी केले आहे. सक्षम असेल तर कोर्ट स्त्रीला सरळ स्वत:च्या पायावर उभे राहायचा सल्ला देते. भारतातल्याप्रंमाणे ऊर बडवून सहानुभूती मागणा-या स्त्रीयाना उत्तेजन दिले जात नाही. स्त्री स्वत: का कमवू शकत नाही, याचे खुलासेवार स्पष्टीकरण तेथिल कोर्ट मागते (आपल्याकडे उलट परिस्थिती आहे, ऊर बडवला की आपल्याकडे न्यायदेवतेला पाझर फुटतो). हा माहितीपट बघून मला पृथ्वीवर कुठेतरी उजाडते आहे याचा मनापासून आनंद झाला. स्त्रीयांच्या आत्मसन्मानाचे वारे भारतातपण लवकरात लवकर पोहोचोत.

आता केजरीवाल आणि सिसोदिया लक्ष्य?

लेखक अनंत छंदी यांनी शुक्रवार, 19/08/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
आता केजरीवाल आणि सिसोदिया यांना सरकारने लक्ष्य करण्याचे ठरविले आहे. म्हणे अण्णा आणि इतर सहकारी सामोपचाराची भूमिका घेत असताना हे दोघे अडवणुकीची भूमिका घेतात त्यामुळे सरकारने त्यांच्या प्रकरणांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. केजरीवाल यांच्या काही आर्थिक प्रकरणांची माहिती सरकारला मिळाली आहे. या स्वरुपाचा आशय असलेली
कळते समजते
छाप बातमी आज दैनिक सकाळने प्रसिद्ध केली आहे. हा सरकारचा फोडा आणि झोडा असा प्रयत्न आहे असे मला वाटते. सकाळसारख्या वृत्तपत्रातून ही बातमी प्रसिद्ध झाल्याने आश्चर्य वाटले. तुम्हाला काय वाटते?

धन्यवाद....

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 19/08/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझा सदस्यंता कालावधी, १ year 12 तास , आत्ताच वाचले...आणी विचार आला .पहात पहाता एक वर्ष गेले..या एक वर्षात मि.पा. वर असंख्य मित्र-मैत्रीणी मिळाल्या, जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी इथेच आधी येते.मग ओर्कुट वगैरे.... माझे सर्वात आवडते...मिसळपाव.. धन्यवाद सगळयांना ..!!!!!!!!!!! :)

उपोषण, कायदेभंग, सरकार इत्यादी

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 19/08/2011 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक संभाषणः "अरे संध्याकाळी काय करतोयस?" "काहि विषेश नाही." "मग, चल येतोयस का?" "कुठे?" "अरे इतके लोक निदर्शनं करताहेत तुलाही वाटतं की नाहि हे सरकार चुकीचं वागतंय. तिथे जाऊ निषेध व्यक्त करू. हे बघ मी घोषणा लिहिलेले शर्टपण आणले आहेत" "अरे पण का? बहुसंख्यांनी सरकारला ५ वर्षे निवडले आहे. जर त्यांचा कारभार नाहि आवडला तर त्यांना मी मत देणार नाही" "अरे ५ वर्षे थांबलास तर उपयोग नाहि. सरकारने आता हा निर्णय घेतला तर तो पुन्हा फिरवणे फार कठीण आहे. जनमत आत्ताच तयार करून ही कृती न होणंच श्रेयस्कर आहे. शिवाय आपल्या नेत्याने निवडलेला मार्ग अहिंसक आहे. सामान्य जनतेला वेठीस न धरता हे आंदोलन चालु आहे.

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 19/08/2011 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१
.
                   

ह्या परदेशात.....!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 19/08/2011 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
खूप पायवाट चालून आलो खूप चढण चढून झाली मागे वळून बघतो तेव्हा आम्ही खूप सुखी होतो असे खरेच वाटून जाते असे मनात अलगद येते कठीण होते सगळे जगणे तरी खूप सुख होते एक खांबी तंबू होता तरी मनगटात जोर होता तसा शप्पत घोर नव्हता पाठीवरती हात होता भक्कम असा आधार होता हे शप्पत खरे होते .....!! !
काव्यरस

...

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 19/08/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.

धिक्कार हो!

लेखक दैत्य यांनी शुक्रवार, 19/08/2011 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
धिक्कार हो तुझ्या जिण्याचा धिक्कार हो तुझ्या जिण्याचा तू एक पणती मिणमिणती भिकार ते दिवाळीतले फटाके जे ऊजळती राहून तुझ्या संगती भावना तुझ्या बुळबुळीत अश्रू लेखणी सुतकी रडू लागली वासना तुझ्या विनोदी झुरळ ते वहाणही कच खाऊ लागली जोहार हे जगणे तुझे अन न मागताच तू मुंडके दिले सशाचे फुकाचे हृदय तुझे अन ढगाने मदाने हसूं पाहिले पाटच्या पाण्यातसुद्धा रंग तुजला दिसला खूनाचा वारही तूच केलेस अन खर्चही मागशी आता वेदनांचा प्रेम जे केलेस तेही चोरट्यांना भरपूर दिसले मद्य जे प्यालेस तेही शंभरांना आधीच प्याले प्रार्थना जशी तुझी ती भज्यांवरची माशीच की कंटाळूनी तो हाकली देवही शिळे लपविण्या त्यासही यत्न की अ
काव्यरस

क्रांती -- काही असे काही तसे ,,, पुन्हा पुन्हा जगावेसे

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 18/08/2011 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली असे क्षण फार कमी येतात आपल्या आयुष्यात की जे पुन्हा पुन्हा जगावे वाटतात, म्हणजे मागच्या पिढितल्यांना त्यांचे सगळं आयुष्य पुन्हा जगावसं वाटत असेल असं नाही, पण म्हणुनच हा लेखनप्रपंच तायडीच्या म्हणजे क्रांतीच्या जीवनातल्या अनेकोत्तम सुखी क्षणांपैकी काही क्षण पुन्हा जगवण्यासाठी.(अशी जड जड वाक्यं सुरुवातीला टाकली म्हणजे आता उशिर झाल्याबद्दल शिव्या नको खायला). मा.