मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं # माझं हे सारं सामान गं सखू...
घासू गुरुजींनी सुरु केलेल्या कविता रसग्रहणाच्या उपक्रमाने प्रभावीत होवून आपणही तिथे एखाद फुल सोडाव असं बरेच दिवस वाटत होत, पण योग्य फुल गवसत नव्हत, इतक्यात मिपाचे ताज्या दमाचे, नव्या रक्ताचे तरुण ताठर कवी श्री धनाजीराव वाकडे यांची माझं हे सारं सामान गं सखू... ही कविता वाचनात आली आणी योग्य फुलं गवसल्याचा आनंद झाला.
खरतर ही कविता इतकी रसरशीत आहे, की मधमाशीच्या मकरंद गोळा करण्याच्या कौशल्याऐवजी लहान व्रात्य मुलाच्या बर्फगोल्यातून रस ओढायच्या कौशल्याचीच येथे गरज पडावी..
काव्यरस
मिसळपाव
अखेर आम्ही खरोखरच निघालो! अनेक बेत अनेकदा ठरतात आणि विरतात. तर आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालो. नेहेमीप्रमाणे निघायला उशीर झालाच. त्यात भर म्हणजे खंडाळा घाटात ऐन बोगद्याच्या तोंडावर रेडीएटर मधुन भसाभस वाफ निघु लागली आणि आमची मिनीबस बघता बघता वाफेने भरली. तेवढाच फुकटात वाफेचे स्नान घेण्याचा विचार होता, पण पाणी भरेपर्यंत सर्वांनी खाली उतरायचे ठरले. पाणी आणायला तशी १०-१५ मिनिटे लागणारच होती. उतरून समोर पाहतो तर डोंगरमाथा धुक्यात शिरला होता.