Skip to main content

दिपावली २०११ : आवाहन.

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 20/10/2011 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार कलाकार मित्र मैत्रिणींनो! दिवाळी जवळ आली की पणत्या, आकाशदिवे, रांगोळ्या, भेटकार्डे अशा गोष्टीं नजरेसमोर येतात. लहानपणी फटाके उडवताना मजा वाटायची तर मोठे झाल्यावर तोच प्रकाश कॅमेर्‍यात बंद करायची हौस असते. ठिपक्यांच्या रांगोळीत रंग भरायला आवडत असते, पण त्याचे कौतुक घरातल्यांबरोबरच लांब राहणार्‍या मित्रमंडळींनीही करावे असे वाटत असते. शेजारच्या बंडू, पिंटूने किंवा सॅमी, पॅमीने किल्ला करताना विनोदी प्रसंग घडलेले असतात. कधी बाजारातली चकमक भूलवून टाकत असते तर कधी आई, आजीची लक्ष्मीपूजन करणारी सोज्वळ प्रतिमा आठवत असते. घरचा फराळ हा काहीजणांसाठी आठवणीतच राहिला असेल.

दिपावली विशेष !!!

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 20/10/2011 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बघता बघता दिवाळी चार दिवसांवर आली आहे. या निमित्ताने मनात अनेक विचार रुंजी घालत असतील. आपण मायदेशात असा किंवा परदेशात, मागल्या दिवाळीला केलेली मजा, घडलेले (मजेदार) किस्से, नवगृहिणींची उडालेली धांदल, फराळाच्या पदार्थांना मिळालेली दाद, अशा गोष्टी आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर कराव्यात असे वाटत आहे ना? चला तर मग! हा धागा आपल्याचसाठी आहे. इथे आपण आठवणी लिहू शकता, सध्या तुम्ही दिवाळीची कोणती तयारी करण्यात मग्न आहात तेही नमूद करू शकता.

एक रम्य संध्याकाळ!!

लेखक मोहनराव यांनी गुरुवार, 20/10/2011 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो!! मी इथे (संकेतस्थळावर) खुप दिवस असलो तरी आज लिहीता झालो. हा माझा पहिला धागा आहे. तरी कृपया सांभाळुन घेणे ही विनंती. तर एका रम्य परंतु थंड अशा रविवार संध्याकाळी रुमवर आराम करत पडलो होतो. इकडचा (जर्मनी) उन्हाळा संपुन फॉल (मराठीत शब्द माहित नाही... पानगळती का?) चालु झालाय. थंडी चालु झाल्यामुळे बाहेर जास्त पडावेसे वाटत नाही. पण थोडेसे ऊन असल्यामुळे लोक बाहेर पडले होते. तसेही इकडचे लोक थोडेसे जरी सुर्याचे दर्शन झाले की बाहेर पडायला उत्सुक असतात. आपल्याला त्याचे जास्त कौतुक नाही. पण शेवटी लोळण्याचापण कंटाळा आला...मग पडलो बाहेर कॅमेरा काढुन.

रंगांच्या रेषा - ३

लेखक प्रभो यांनी बुधवार, 19/10/2011 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
रंगांच्या रेषा रंगांच्या रेषा - २ गेल्या विकांती फॉल कलर्स बघायला व्हाईट माउंटन्स, न्यु हँपशायर इथे गेलो होतो. आमच्या इथून साधारण ३५० मैलाच्या अंतरावर आहे हे ठिकाण. पहिल्या दिवशी डोंगराच्या पायथ्याला पोहोचून रेल्वेने (माउंट वॉशिंग्टन कॉग रेल्वे) माउंट वॉशिंग्टन या अमेरिकन उत्तरपुर्वेच्या सर्वात उंच शिखरावर जायचे ठरवले होते. पण शिखरावर जोरदार वारा चालू असल्याने वरपर्यंत जायला बंदी होती. रेल्वे ३/४ उंचीपर्यंत जाऊन परत येणार असे सांगण्यात आहे.

कॅरमलाईज्ड चिकन

लेखक गणपा यांनी बुधवार, 19/10/2011 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
कालच विजुभौंनी एक खरड केली होती की नॉन व्हेज मध्ये गोड पदार्थ नसतात का? तर त्यांच्या या शंकेच निरसन करण्यासाठी म्हटल आपणच आधी एखादा पदार्थ बनवुन पहावा. झाला बरा तर मग कळवाव. तस चिकन मटण म्हटलं की ते जर झणझणीत, मसालेदार नसेल तर मी फारसा त्याच्या वाटे जात नाही. मी मधात घोळवुन रोस्ट केलेली कोंबडी नुसती बघितली आहे. पण ती चाखायची तेव्हा हिंमत झाली नव्हती. चिकन आणि ते ही गोड??? नोऽऽऽऽऽ वे. पुढेमागे जालावर फिरताना, काही टिव्ही वरचे कुकिंगचे कार्यक्रम पहाताना त्यात फळांच्या रसात मुरवुन वा शिजवताना फळांचे रस वापरुन केलेले काही नॉनव्हेज पदार्थही पाहिलेही.

ऑन लाइन शॉपिंग

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 19/10/2011 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऑन लाइन शॉपिंग च्या व्यवसायाने चांगलेच बाळसे धरल्याचे दिसते. स्टार सी.जे.एन्डीटी,व्ही..टाईम्स..रेडिफ..एक ना दोन अनेक वेब साईत्स अनेक नावीन्य पूर्णं वस्तुंनी सजलेल्या दिसत आहेत.. इतर वेब साईट्स प्रमाणे ह्या वेब साईट्स पाहणे हा पण एक छान टी.पी आहे पूर्वी क्रेडिट कार्ड हे मस्ट असायचे पण आता कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय बहुतेक साईट्स वर उपलब्ध असल्याने खरेदी सोपी झाली आहे...शिवाय डेलिव्हरी घरपोच..मोफत किचन..संगणक..टी.व्ही..पादत्राणे...साड्या..

सोप्पा लेमन केक

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 19/10/2011 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ वाटी मैदा १२ टेस्पून साखर २ अंडी (फ्रिजमधून थोडे आधी काढून ठेवावी) ४ टेस्पून तेल ४ टेस्पून दुध ११/२ टेस्पून लिंबाचे किसलेले साल (फक्त पिवळा भाग, पांढरा नको नाहीतर कडवट होईल) १ टेस्पून लिंबाचा रस २ टीस्पून बेकिंग पावडर १/२ टेस्पून व्हॅनिला इसेन्स मीठ जरासे चवीपुरते . पाकृ: प्रथम मैदा, मीठ व बेकिंग पावडर एकत्र करुन दोन-तीनदा चाळून घेणे. एका भां

"मराठी रंगभूमीच्या तीस रात्री" - मकरंद साठे

लेखक yeda यांनी बुधवार, 19/10/2011 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
आधुनिक मराठी रंगभूमीला साधारणपणे गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षांचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे. या कालखंडात महाराष्ट्रातील -आणि भारतातील - सामाजिक राजकीय वास्तवात जेवढे मूलभूत बदल झाले तेवढे त्याआधीच्या काही हजार वर्षांत झाले नव्हते. मराठी रंगभूमी या बदलांची साक्षी होती आणि आपल्या परीने त्यांचे अर्थ लावत- कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता- तिने काही सक्रीय भूमिकाही निभावली. 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा अशा रंगभूमीचा विलक्षण इतिहास तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन, एका प्रकारे तो या कालखंडातील सामाजिक वास्तवाचाच मांडलेला एक लेखाजोगा आहे. या ग्रंथात एक प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे.