Skip to main content

आग्निपरीक्षा

लेखक गार्गी_नचिकेत यांनी सोमवार, 14/11/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
जगी एकटेच येणे अन एकटेच जणे, नत्यान्चे हे कच्चे धागे मग कशास बान्धावे, बाल्य, तारुण्य, वर्धक्य तीन अन्कन्चा हा खेळ, कोणा द्यावा किती वेळ हे तो ठरवतो काळ. देह सोडुन जाताना प्राण क्षणार्धात जातो, मागे राह्णारा मात्र दु:ख आजन्म भोगतो. का ही अग्निपरीक्षा चान्गल्याच्या माथी येई, तरण्याला आता देवा सीतेचेच बळ देई.
काव्यरस

एक स्वप्न आहे

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 14/11/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक स्वप्न आहे एक स्वप्न आहे तुला खळखळून हसताना पाहणार तुझ्या डोळ्यातील आनंदाश्रू बनून गालावर वाहणार एक स्वप्न आहे तुला हळुवार कवेत घेणार सोबतीने तुझ्या मला प्रीतीत चिंब भिजवणार एक स्वप्न आहे तुझ्या भविष्यात हरवणार तू दूर असताना मात्र आयुष्य शून्य जाणवणार एक स्वप्न आहे तूच सार जीवन बनून संगतीने तुझ्या जगणार तुझ्याच डोळ्यांनी स्वप्न पाहणारं एक स्वप्न आहे ...... यशवंत

बौद्धांचे त्रिरत्न: उगम: नक्की कसा, कोठे?

लेखक चित्रा यांनी सोमवार, 14/11/2011 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
वल्ली यांच्या शैलगृहावरील चित्रमय लेखामुळे या लेखास प्रेरणा मिळाली आहे. संशोधन पूर्णपणे जालीय माहितीवर आधारित आणि अर्धवट आहे, म्हणून जास्त लिहीण्यापेक्षा चित्रे देऊन काही विचार मांडण्याचा प्रयत्न करते आहे. फक्त एक टीपः माझ्या मते असे लिहीलेले असेल तेथे माझ्या "सध्याच्या" मते असे आहे असे धरून वाचावे (माझे पूर्वीचे मत थोडे वेगळे होते, हे आलेच). उपलब्ध माहिती प्रचंड आहे आणि वाचन त्रोटक आहे. घाईत लेख टाकल्याने त्यात बर्‍याच उणिवा आहेत. तेव्हा हे मत खरेच मान्य करण्यासारखे आहे का यावरून चर्चा व्हावी.

...खरच जमलंय !!

लेखक फिझा यांनी सोमवार, 14/11/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
जमलंय मला सावरायला उसने अवसान आणायला.. आणि उगीचच हसायला... ...खरच जमलंय.... नात्यांच्या ह्या गोत्यातून स्वताचे भावविश्व आकारायला सगळ्यांमध्ये असूनहि सगळ्यांपासून दूर जायला ---खरच जमलंय... जमलंय डोळ्यांना खरंच पाणी अडवायला ... जमलंय शब्दांना खरंच अर्थ बदलायला .... त्या पाण्याचे, शब्दांचे कौतुक करायला ... ...खरच जमलंय मला..... अर्थातली निरर्थकता ...... निरर्थकतेतला अर्थ सांगायला खरच जमलंय या शब्दांना कविता सजवायला ..... निखळलेले शब्द मांडायला आणि वाह वाह मिळवायला .....खरच जमलंय

युगलगीतः आज पाहणार आहे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 14/11/2011 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः आज पाहणार आहे
(सदर युगलगीत एकाच व्यक्तीने गायले आहे अशीही कल्पना करता येवू शकते.) तो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ|| ती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ|| तो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली ती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१|| ती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले तो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२|| तो: आलो, भेटलो, बोल बोललो; रमलो, हसलो, कधीतरी रडलो ती:
काव्यरस

किसमिस

लेखक लीलाधर यांनी रविवार, 13/11/2011 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक तीने घेतला माझ्या हाताचा किस, त्यानंतर येणार्‍या प्रत्येक दिवशी आणि रात्री आम्ही खाऊ लागलो प्रेमाचे किसमिस, दीवस गेले भूरभूर लागली लग्नाची हूरहूर, खरं म्हणजे माझ्या लग्नाची बाबाच काढणार होते छानशी वरात, पण मीच आणली हट्ट करून हीला घरात, आता मात्र खरंच दिवस गेले आणि आमच्या सौंच्या बुद्धीमत्तेचे दीवे घरभर पेटू लागले, एक दीवस तीने मागितली आमच्या ईस्टेटीची परात, मी मात्र बुडून गेलो दारू सोबत अंधारात, मरून गेलेल्या बाबांचा मागून यायचा आवाज, बाळा यालाच म्हणतात- बीन बुडाची आणि बीन घोडयाची वरात, म्हणूनच आपण रहावे आपल्या रीतीभातींच्या घरात आपल्या रीतीभातींच्या घरात.
काव्यरस

रॉकस्टार

लेखक समीरसूर यांनी रविवार, 13/11/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
रॉकस्टारचे पोस्टर्स बघून हा चित्रपट बघायचाच असे ठरवले होते. गाणी आणि संगीत आधीच सुपरहीट आहे; शिवाय इम्तियाझ अलीचा चित्रपट म्हणून उत्सुकता होतीच. त्याचा 'जब वुई मेट' छान वाटला होता. 'रॉकस्टार'चे पोस्टर खरोखरच खूप उत्सुकता निर्माण करणारे वाटले होते. लांबलचक केस वाढलेला आणि टोपी घातलेला रणबीर कपूर पोस्टरवर बघून चित्रपटात काहीतरी वेगळे असेल असे वाटले होते आणि काही प्रमाणात ही अपेक्षा पूर्ण झाली देखील. एका रॉकस्टारच्या ओपन एअर कॉन्सर्टमध्ये त्याच्या संगीतावर थिरकणार्‍या आणि मदहोश होणार्‍या तरण्या पोरांच्या बेधुंद मस्तीला अगदी उत्कृष्ट पद्धतीने पकडणार्‍या प्रसंगाने चित्रपट सुरु होतो.

घूंघटके पट खोल

लेखक शरद यांनी रविवार, 13/11/2011 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
घूंघटके पट खोल संत कबीर यांच्या काव्याचा परिचय करून देतांना पहिली अडचण ही येते की सुरुवात कोठून करावी हेच कळत नाही. भजन की दोहे ? सकाळी रेडिओवर एखाददुसरे भजन ऐकावयास मिळते, रात्री कुमारांच्या निर्गुण भजनांची कॅसेट आठवड्यातून दोन-तीनदा तरी लागतेच.पण वाचावयाचे म्हटले की समोर येते दोहे-साकी यांचे पुस्तकच. कुठलेही पान उघडा, दोन ओळीत एखादा सुंदर विचार मन लुभावून टाकतो. आणि मुख्य म्हणजे या दोन ओळीत पाठभेदाची कटकट फार त्रास देत नाही. भजनांचे तसे नाही. रुचकर बिर्याणी खातांना कचकन खडा लागावा तसा हा पाठभेद सर्व मूड घालवून टाकतो.

दुखरी बाजू का खुपते?

लेखक आशु जोग यांनी रविवार, 13/11/2011 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख जरूर वाचावा http://tinyurl.com/lokanna लोकसत्तेने उगाचच नि:पक्षपणाचा आव आणून अण्णांच्या आंदोलनावर टीका सुरु केली होती जणू ए राजा, कनिमोळी, कलमाडी आणि टीम मनिमोहनचे सदस्य धुतल्या तांदळासारखे आहेत.