Skip to main content

समीकरणे

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 22/12/2011 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
सोडवत आहे एकरेषीय समीकरणे प्रतलावरती मांडुनी सुखदु:खाचे अक्ष स्थापिला बिंदू स्वःतचा सोबतिला जरी असतिल अनेक बिंदूमधील अंतरे नात्याची काही जवळ तर काही दूरची निघाल्या रेषा कापण्यास ही अंतरे सुखदु:खाच्या अक्षांना छेदीत बदलत्या नशीबासोबत बिंदूही सरकत आहे कधी पुढे-मागे कधी वरती-खालती असेच करता करता सुटतील समीकरणे उरतील हाती सुखदु:खाच्या किंमती यशवंत

काही गमतीदार किस्से .......

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 22/12/2011 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
काही गमतीदार किस्से ....... आपल्या आयुष्यात अशा काही गमतीदार ,मजेशीर घटना घडतात कि त्या बरयाच काळापर्यंत आठवणीच्या कोपरयात घर करून बसतात .कधी काळी आपण निवांत क्षणी त्या गोष्टी स्मरतो अन अलगद ,नकळत आपले आपल्यालाच हसू येत , भलेही लोकाना वाटेल ह्याच्या /हिच्या डोक्याला शॉट लागला आहे का ? एकटाच / एकटीच का हसत आहे ?

सल्ला हवाय

लेखक वाटी यांनी गुरुवार, 22/12/2011 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, काल मला केलेल्या मदती बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असो सध्या १ समस्या घेउन मी तुमच्याशी सल्लामसलत करण्यासाठी येत आहे.
अर्धवट मिळालेली माहीती
त्याचं झालं असं की माझा शाळेत असल्यापासूनचा मित्र मागच्या आठवड्यात माझ्या ऑफीसच्या येथे भेटला. काही कामानिमित्त तो तेथे आला होता आणि आमची भेट झाली. तो भेटल्यावर आमच्या ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पण त्या गप्पा चालू असतांना तो पहिल्या सारखा मनमोकळेपणाने माझ्याशी गप्पा मारत नाही हे मी ओळखले. त्याला म्हण्टले काय रे काही प्रॉब्लेम आहे का? तर आधी काहीच बोलला नाही. मग आम्ही जरा एका हॉटेलात गेलो.

उद्दामपणा

लेखक चिंतामणी यांनी गुरुवार, 22/12/2011 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा आणि राजकीय पाठबळ असले की काय काय होउ शकते याचे उदाहरण काल बघायला मिळाले. एक्सप्रेस हायवे जवळ बांधण्यात आलेल्या गहुंजे येथील क्रिकेट स्टेडीयमचे काल उद्घाटन करण्यात आले. वाहतुकीसाठी एक्स्प्रेस वेला कोठेही छेद न देण्याचा नियम स्टेडियमसाठी मात्र वाकविण्यात आला आहे . एव्हढ्यावरच हे थांबले नाही. गहुंजे गावाजवळ एक्स्प्रेस वे वरील दुभाजक फोडण्यात आला . तेथून खासगी बस व मोटारी स्टेडियमच्या बाजूला राँग साईडने नेण्यात आल्या . एक्सप्रेस वे वरील वाहतुक ही वेगाने होत असते. यात जर काही दुर्घटना झाली तर जबाबदार कोण?? यासाठी कुठल्या अधीका-यांनी परवानगी दिली होती?

मुक्तछंद म्हणजे नक्की काय?

लेखक चित्रा यांनी बुधवार, 21/12/2011 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्तछंद म्हणजे नक्की काय? या एवढ्या ओळीवर माझी ही चर्चा खरे तर संपायला हवी. पण एकोळी धाग्यांविषयी कल्पना असल्याने थोड्या अधिक ओळी लिहीते :) कविता म्हणजे थोडेसे लय असलेले गद्यही असू शकते, असा माझा एक समज होता. उदा. कुणी घर देता का घर? नटसम्राटमधील हे नक्की काय आहे? कविता का गद्य? का मधलेच काही तरी?

साहेबाचे, "गर्वसे कहो हम..."

लेखक विकास यांनी बुधवार, 21/12/2011 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
"पवित्र बायबल" हा ख्रिस्ती धर्मग्रंथ मुळचा हिब्रू आणि त्याहूनही अधिक ग्रंथस्वरूपात कोऑइन (Koine) ग्रीक भाषेत लिहीला गेला होता. ख्रिस्ती धर्माच्या युरोपातील प्रचाराप्रमाणे तो विविध भाषांमधे देखील अनुवादीत होऊ लागला. ब्रिटनमधे त्याचे राजमान्य भाषांतर १६११ साली केले गेले, त्याला कालपरत्वे "किंग जेम्सचे बायबल" असे अधिकृत नाव मिळाले. या किंग जेम्स बायबलच्या लेखनपुर्तीस ४०० वर्षे पूर्ण झाली म्हणून ऑक्सफर्ड विद्यापिठात १६ डिसेंबरला सोहळा साजरा करण्यात आला. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन ह्यांचे तेथे भाषण झाले.

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (बेल्लुर) भाग - ३

लेखक दशानन यांनी बुधवार, 21/12/2011 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात आपण होयसाळ / होयसाल साम्राजाची राजधानी द्वारसमुद्र (हैलेबिडु) बद्दल माहिती व छायाचित्रे पाहिली आता त्रिकोणातील २रा कोन. बेल्लुर. मंदिराचे प्रवेशद्वार द्वारसमुद्र पासून १२-१३ किलोमीटर बेल्लुर वसलेले आहे, एकेकाळी ही जुळी शहरे संपन्न व पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून समजली जात. राजाचा वरदहस्त व राजकोष मुक्त हस्ताने वितरीत करण्याची उदारता यामुळे अनेक कलांचा प्रसार होयसाळ साम्राज्यात झाला.

भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 21/12/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
अजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले.