नुकताच तारुण्याच्या उंबरठयावर
प्रवेश केलेला मी.
सळसळतं रक्त,ओहटी न येणारं
अविरत उधाण.
सतत खळखळणारं मन
स्वप्नांचे ढिगभर मनोरे, तरी पण
का बरं वाटतं एवढं बोअर
कुठून येत असेल ही अस्वस्थता
जग भन्नाट वेगानं बदलतय
मीच मागे पडतोय काय?
का छळतेय ही बेचैनी ?
का गुदमरतो जीव?
का मोकळा श्वास घेताच येत नाही ?
असेल प्रेम भंगाचा विरह?
प्रेम तरी का म्हणावं त्याला?
की असेल उतुंग भरारी घेतांनाच झालेला संधीपात?
नि मग वाटते मरून जावसं...
का बरं वाटत असावं असं..का?
का हाच माझ्या जन्माचा हेतू?
नाही नाही नाही ....
आई बाबांना सांग,
अर्धवट सोडून जाणार नाही हा गेम.
नवं वर्षाच्या पूर्व संध्येला....