Skip to main content

कोलावरी गोदावरी

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 28/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कोलावरी डी गाण्याने कहर केलाय हे नक्की. लाखो बघे त्या गाण्याला मिळाले ही कमाल आहे. लाखो म्हंजे चाळीस पन्नास लाख वगैरे. गाणे खरेतर शून्य आहे. पण तरी एवढे बघे म्हंजे हल्लीच्या सांस्कृतिक चवीचा ही अंदाज बांधता येईल. असो. मी मात्र ते गाणे कानावर आल्या आल्या आणि त्याच्या प्रसिद्धीची बातमी समजताच एक फायदा करून घेतला. आमच्या गोदेची हेळसांड मला अगदी पाहवत नाई. नाशिकला उगम पावणारी गोदावरी नदी. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे समाजबांधव आणि भक्त आणि अन्य जन तिचा बरं महिने छळ करत असतात. तिची कधी एकदा "मिठी" करावी असे काहीसे जनतेला झाले की काय कुणास ठाऊक. त्या धार्मिक विधीचे तर काय करावे असे मला कधी कधी होते. अहो, काहीही थेर, नवनवीन थेर काढत असतात. छळ पाण्याचा, फुकटच्या भांडवलावर पैसे मिळविणारे नामानिराळे होतात. यात मेले कसले समाधान आणि कुठची शांती भक्तांना मिळते कोण जाणे. गमतीने मला कधी कधी वाटते की माझी जी ही चीड चीड होते ते मी इतरे जणांसारखी शांती करत नाही ना त्यामुळे होते. जाऊ द्या. तसली शांती मला नकोच. नदीचा, पाण्याचा छळ करून मेली कसली शांती. असो.तर मी त्या कोलावारीचा फायदा करून घेतला बरं का, खरे तर गैर फायदा. त्या कोलावारीच्या संगीतावर मी एक गाणं तयार केलं. मराठीतून लिहीलं. मराठीतून म्हटलं. मीच म्हटलं. एक साधी फिल्म बनवली. त्या फिल्म मध्ये आपले नेहमीचेच गोदेचे छळाचे प्रकार दाखवले. आणि ठेऊन दिले यु ट्यूब वरती. अहो, हळहळणाऱ्या अपरिचित जनांनी ते गाणे आणि ती फिल्म त्यांच्या फेसबुकाला चिकटवून इतकं गरागरा फिरवलंय म्हणुन सांगू ! बाप रे, बाप रे !! कुठ्ठून कुठ्ठून मेल आले, फोन आले. मी तर कुणी समाजसेवक आहे असेच वाटले जनांना. तसे काही नाही. मला गोदा आवडते. माझे तिच्यावर घट्ट प्रेम आहे. तिच्याशी मैत्री करावी ना. कुणीही करावी. पण तिची हेळसांड केली की मला राग येतो. मूर्खाना हे ही कळत नाही की तिला दुखावणे आपल्याला परवडणार नाही. पण येडोबांचे काय कराचे मला कळत नाही. त्यामुळे चान्स मिळाला की मी लगेच विषय काढतो. तुम्ही सुद्धा ही फिल्म बघा. त्या फिल्म च्या तांत्रिक बाबी कडे फार जाऊ नका. मी काय कुणी निष्णात नव्हे. विषय महत्त्वाचा आहे. शोधणे सोप्पे आहे. यु ट्यूब वर " Kolaveri Godavari " शोधा. लगेच सापडेल. मित्र मैत्रीणीना सांगा. फेसबुकावर चिकटवून फिरवा. त्यातून काही जणांना वाटेल नक्की ही गोदेला जरा सांभाळले पाहिजे. हीच तिच्यावर कृपा !! अनिल अवचटाना ( बाबांना ) कोलावरी गोदावरी आवडली. बाबा मला म्हणाले " असे आमच्या मुळा मुठे साठी कुणीतरी केलं पाहिजे." बहुदा ही लिंक व्हावी : (
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5671
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

=)) =)) =)) उचला रे मला. नाही म्हणजे तुमचा उद्देश उत्तम आहे त्याबद्दल कौतुक आहे. पण तरीही....

In reply to by गणपा

पण तरीही.... काय हे जर दिलखुलास पणे बोल्ला राजे, तर आम्हाला सुधारायचा चान्स मिळेल.

In reply to by सुहास..

सुहास राव, इथे चित्रफित चिकटवायची मला अजुन जमलेले नाहि. तसा मी प्रयत्न ही केला नाही. पण तुम्ही काम सोप्प केले. आभार.

कहर ! कहर ! कहर आहे अगदी.

In reply to by गणेशा

मुतालिक साहेब, विडीओ बघितला. मनातल्या भावना प्रत्यक्ष भेटल्यावर सांगेन. एक छोटीशी कृती. पण त्याचा किती मोठा परीणाम. हॅट्स ऑफ टू यू बॉस.

वा वा मुतालिक साहेब..फार जबरदस्त कामगिरी केलीयेत तुंम्ही हे गाणं करुन.मी तर याला एक चांगली अत्यावश्यक कलाकृतीच म्हणेन... काहीही करुन हे काम मिडियात पोहोचवा हो भाऊ,उडू दे जरा काही दिवस वाद/चर्चा..कारण काही सकारात्मक घडवायला हल्ली तो ही एक मार्ग आहेच...मग भले त्यांनी टिआरपी वाढवण्यासाठी केला थोडा हंगामा...तरी चालेल.

खुप खुप आभार. लढायची उमेद आणि उर्जा वाढते अशा प्रतिक्रीयानी !

मूळ गाण्याच्या प्रसिद्धीचा चांगला उपयोग करून घेतलाय! यालाही किती हिट्स येतात आकडेवारी प्रसिद्ध करत चला!

गोदावरीच नव्हे तर भारतातील बर्‍याचशा नद्यांची असलीच अवस्था आहे. नदीत मैलपाणी सोडणे, धूणी भांडी वाहने पशू धुणे आदी प्रकार सर्रास चालतात. आपल्याकडच्या खुळ्या प्रथा नदीच्या अनावस्थेसाठी जबाबदार आहेत. प्रशासन, शासन त्याचप्रमाणे नियमांची अंमलबजावणी करणारे हे देखील तितकेच जबाबदार आहेत. बाकी नदी अन त्याबाजूचे स्वप्नात असलेले वातावरण हळवे करून सोडते हे नक्की. नदी ही नदी नसते तर ती जीवनवाहीनी असते. तिच्या काठावरच माणसाची संस्कृती फुलली वाढली बहरली. फक्त नष्ट झाली हे म्हणणे होवू नये ही आंतरीक इच्छा. व्हिडीओ गाणे छान आहे.

In reply to by पाषाणभेद

>> आपल्याकडच्या खुळ्या प्रथा नदीच्या अनावस्थेसाठी जबाबदार आहेत. प्रशासन, शासन त्याचप्रमाणे नियमांची अंमलबजावणी करणारे हे देखील तितकेच जबाबदार आहेत. वाचून अंमळ मौज वाटली. नव्याने निर्माण होणार्‍या महानगरातले सांडपाणी कुठे जाते हो? येवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या इंडस्ट्रीचे सांडपाणी (हां थोडेसे शुद्धीकरण वगैरे नाटकं करत असतील) कुठे जाते हो ? मग काही झाले की धर्म, प्रथा वगैरे बोंबा कशाला मारायच्या?

खरय अगदी ! नद्यांची वाट माणूस अगदी मालकी हक्क सांगुन लावतो, सर्वदूर, सगळी कडे तीच तऱ्हा आहे. सगळ्या नद्यांना जनता गंगा मानते. आणि एकदा का गंगा मानलं की झाले धार्मिक विधी सुरु. अलीकडे कुठलासा रिपोर्ट वाचला होता. त्यात आकडेवारीसह दिलं होतं की भारतातल्या नद्यांचे प्रदूषण हे धार्मिक कार्यक्रमामुळेच मोठ्या प्रमाणात होतं. त्या मानाने औद्योगिक कारण छोटं आहे. म्हंजे आम जनताच जबाबदार आहे. आता इथे कुठचा लोकपाल वा तत्सम पाल आणून कुणाला शिक्षा देणार ?

In reply to by सुधीर मुतालीक

तो कुठलासा रिपोर्ट वाचण्यात फार रस आहे बॉ आम्हाला. कारण गंगेचे प्रदूषणही सर्वात जास्त टॅनरीज नी सोडलेल्या सांडपाण्यामुले होते असे आम्हीही पूर्वी एका कुठल्याश्या रीपोर्ट मधे वाचले होते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

औद्योगिक सान्ड्पाणी नदीत सोडणे या देशात आता इतके सोपे नाही, पेशवे. दरबारच्या माणसाला चिरीमिरी देउन सान्डपाणी नदीच्या घशात ओतण्याचे दिवस कदाचित पेशवेकालीन! असा एखादा उद्योग माहिती असल्यास पर्यावरण विभागाला कळवा, उद्योग बन्द होण्याची खात्री बाळगा. अहो एवढ्या मोठ्या साहेबाची लवासा रखडली तिथे छोटे मोठे धंदे कसे वेडेपणा करतील ? मुद्दा आहे तो अंध श्रद्धे मुळे नदीची वाट लागण्याचा. त्याच्या वरती कंट्रोल कुणाचा ?

तुमच्या नाशकात अगदी दहीपुला जवळ काही वर्ष राहीलो आहे . सगळं एकदम खरंखुरं चित्रण केलंत . तिथे यात्रेला आलेल्या अगदी गरीब पोरांना अक्षरशः काळ्याकुट्ट पाण्यात मजेत पोहतांना बघितलं आहे . जर तसा एखादा शॉट मिळाल्यास ह्यात नक्की जोडा , दहीपुलाच्या खाली जिथे एक पाण्याची टाकी आहे तिथे कोप-यात अगदी काळे कुट्ट पाणी असते . ( पिवळी लोखंडाची टाकी दहा वर्षा पूर्वी होती आता असेल का माहीत नाही ) खुपच चांगला व्हीडीओ . पुढील उपक्रमास शुभेच्छा.................

In reply to by जयनीत

धन्यवाद, जयनीत, आपण नाशकात कधी होता ? कुठे काम करत होता ? बाकी तुमची मेमरी अगदी घट्ट आहे, हा.

गाणं आणि त्याप्रमाणे केलेली चित्रफीत आवडली. यामुळे अगदी चार लोकांनी जरी काही धडा घेतला तरी तुमचे प्रयत्न सार्थकी लागले म्हणायचे. पाण्यात आडवा पडलेला माणूस मेलाय की काय?

गाणं आणि त्याप्रमाणे केलेली चित्रफीत आवडली. यामुळे अगदी चार लोकांनी जरी काही धडा घेतला तरी तुमचे प्रयत्न सार्थकी लागले म्हणायचे. रेवतीसारखेच म्हणते. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

स्वाती, धन्यवाद.

सुधीर . तुझा प्रयत्न मस्त जमलाय. फक्त हे गाणं मूळ गाण्याइतकेच शब्द मोजून केले असतेस तर परफेक्ट झालं असतं म्हणजे यांनी केली गोदावरी, गोदावरी, गोदावरी घाणेरडी यात थोडी काटछाट करुन यांनी केली गोदावरी, गोदावरी, नदी घाणेरडी हे जमतंय बघ. ठेक्याला धरुन राहतंय. (अनाहूत सल्ल्याबद्दल माफ करा) :)

In reply to by योगप्रभू

प्रभू , असे स्पेसिफिक सल्ले मला खूप आवडतात. त्यातून नेमकं कुठे सुधरायचं आहे ते कळत. नुसतेच " उचालारे मला " वगैरे मला काय ठो कळत नाही. त्यामुळे तुमचे खास आभार.