Skip to main content

उद्याची बात का करु मी

लेखक santosh waghmare यांनी गुरुवार, 29/12/2011 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
ओन्जळीत पानी असताना, म्रुगजळाला का फसु मी, तहान तर भागत आहे, मग उद्याची बात का करु मी. दिवसा उजेड असताना, अंधारात का चाचपडू मी, रात्र होन्यास उशिर आहे मग उद्याची बात का करु मी. ताटात अन्न असताना, आनंदाने का नाही खाऊ मी, खाल्लेला घास हि न पचन्यास, उद्याची बात का करु मी. परिक्षा तर दिली आहे, परिणामांची भीती का बाळगु मी, परिक्षा ते परिणाम ह्या मधील दिन व्यर्थ जाण्या, मग उद्याची बात का करु मी. म्रुत्युची वेळ माहित नसताना, म्रुत्यु समोर असल्याप्रमाणे का वागू मी, जिवनही जगता न येण्यास, मग उद्याची बात का करु मी. येणार भविष्य हे वर्तमान होत असत, मग प्रत्येक क्षण वर्तमानात का नाही जगू मी, पण आ

मदत पाहिजे - जीवनशाळांच्या रेकॉर्ड्सचे संगणकीकरण

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 29/12/2011 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, जीवनशाळांच्या गेल्या वीस वर्षातील रेकॉर्ड्सचे संगणकीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. आज पर्यंत शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड व्यवस्थितपणे पण लेखी चोपड्यांमधून जतन केले गेले आहे. हे सगळे आता संगणकावर घेतले जात आहे. यासाठी, आम्हाला, युनिकोड मराठी टंकन करणार्‍यांकडून काही मदत मिळाल्यास हवी आहे. प्रत्येकजण आपापल्या उपलब्धतेनुसार यात भाग घेऊ शकतो. मात्र सध्या फक्त पुणे अथवा मुंबईत राहणार्‍या लोकांनाच यात सहभागी करून घेता येईल. कामाचे स्वरूप साधारण असे असेल ...

जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... एल. आय. सी. चे घोषवाक्य कि निव्वळ फसवेगिरी..???

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी गुरुवार, 29/12/2011 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... हे आहे एल. आय. सी. चे प्रसिद्ध घोषवाक्य..!!! .... खरेच एल. आय. सी. या घोषवाक्याप्रमाणे सर्वच बाबतीत प्रामाणिक आहे का..? की निव्वळ फसवेगिरी आहे..??? चला पाहू..! पण त्या आधी काही इतर खरी माहिती घेऊयात..!!!! जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन) ने सांगितल्यानुसार जगातील एकूण हृदयरुग्णांपैकी ६०% लोक हे भारतात आहेत..

मी आणि आमची गाडी

लेखक चाफा यांनी गुरुवार, 29/12/2011 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
"आहो, आज चार दिवस झाले, निदान आजतरी गाडी बाहेर काढाल की नाही?" एव्हाना चैत्राचा पारा थर्मामीटर फोडायच्या प्रयत्नात होता. हा असा त्रागा गेले पंधरा दिवस माझ्या मागे चालू होता. म्हणजे गाडी घेतली त्या दिवसापासून. तो कुठला अशुभदिन होता कुणास ठाऊक हिच्या आग्रहाला बळी पडून मी नवीकोरी इंडीका घरी आणली. गाडी घरी आणली खरी पण इथे ड्रायव्हिंग येत कुणाला होतं! ड्रायव्हर ठेवणं हे माझ्या आवाक्याबाहेरचं आणि एकदा गाडी घरी सोडायला म्हणून आलेल्या मित्राला रोज रोज कसला हैराण करणार? मग गाडी तशीच पार्किंग मध्ये पडून होती.

टीन एजर्स आणि एस टी डी

लेखक स्वाती२ यांनी गुरुवार, 29/12/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. गेल्या महिन्यात माझ्या मुलाच्या टीमने टीन एजर्स आणि एसटीडी या विषयावर वाय प्रेस साठी स्टोरी केली. इंडियानापोलिस स्टार या न्युज पेपरच्या ब्लॉग मधे ही स्टोरी उपलब्ध आहे. http://blogs.indystar.com/ypress/2011/12/17/in-battle-against-stds-deni… इथे शाळेत सेक्स एज्युकेशन अगदी सुरुवातीपासून आहे तरीही एकंदरीत समज गैरसमज थक्क करणारे! आकडेवारीही काळजी करायला लावणारी. भारतातही मॉर्निंग आफ्टर पिल्सचा वाढता वापर बघता एस टी डी चा धोका लक्षात घेतलाच जात नाहिये असे वाटले.

ती येते आणिक जाते

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 29/12/2011 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
गालावर येणारी अवखळ लट मानेला हिसका देऊन बाजुला सारण्याची तुझी जीवघेणी लकब... त्याचवेळी तुझ्या डोळ्याचे कोपरे हळूच बघून घेतात समोरचा तडफडणारा जीव अजून जिवंत आहे किंवा कसे? काळ्याभोर लटेचा तो हिसका बसताच खोलवर दडलेले कुठलेसे बीज तरारून थरथरते आणि वरवर यायला बघते ते धुमारे काळ्या डोहात कसलासा आकार घेत आहेत असे वाटू लागते तोच टिक टॉक सॅंडल्स उडवित तू निघून देखील जातेस समोरचा पाचोळा बेफिकीरीने उधळीत उडालेली धूळ काळ्या डोहात धुमार्‍यान्ना गुदमरून टाकीत पाण्यात विलीन होते अस्वस्थ तरंग देखील नि:शब्द होतात शब्दावाचून कुठली कविता? तू येते आणिक जाते......

ईर्शाळा !

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 29/12/2011 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
आता पर्यंत ईर्शाळ्याला तीनवेळा गेलो.. एक :: दर गणपतीला,मोहरमला,दिवाळीत आणी नववर्षाला आमच्याईकडं "उचलाउचली" व्हायची.ती नावापुरती असली तरी ते लॉक-अप मधले दोन तास लै जिवावर यायचे,आणी वर पोलीसांना दिवाळी किंवा ईतर सणाबद्दल फुकटचा बोनस भेटायचा तो वेगळाच.पण काही वर्षापुर्वी नागपुरचाळीतल्या सामान्य गुंडानी ह्या परंपरेला तडा द्यायच ठरवल आणी मग पळापळ झाली.कोणी गावाकडे तर कोणी पाहुण्यांकडे पळाल.पण आम्ही सगळीकडेच तोंड काळं केल्याने काय कराव ह्या विवंचनेत होतो.कातकरी समाजच्या प्रदीपदादांचे वडील येरवडा जेलमध्ये चतुर्थ श्रेणीतील कामगार होते आणी आमचे शेजारी होते.त्यांच्या गावी जायचे ठरले,ते गाव म्हणजे ईर्शा

मी काढलेली काही निसर्गाची छायाचित्रे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 29/12/2011 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
नाखव्याचा ह्रदयभंग........ शहरी उदास पाऊस....... ही वाट दूर जाते..............कोकणातील गावा... क्षितिज आणि मी...

रोज मरतो

लेखक निश यांनी गुरुवार, 29/12/2011 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
रोज मरतो रोज मरतो रोज मरतो सकाळी कामावर निघालो की कचरा कुनडीवर कचरा वेचणारी भुकेने रडणारी ति अनाथ मुल बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो स्टेशनवर येतो तिथे दिसत एक म्हातार जोडप व ते अडचण आहेत नविन घरात अस मानुन त्याना गावाला पाठवणार तरुण जोडप,ते बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो लोकल येते फलाटावर नेहमिसारखी डब्ब्यानमध्ये गुरानसारखी घुसलेली मानस बघुन. रोज मरतो रोज मरतो रोज मरतो दुपारी जेवणात येणारी आकार लहान झालेलि वाढणार्‍या महागाईने बिनतेलाची असलेलि रोजच असलेलि बटाटा भाजी व पोळी ,ते बघुन रोज मरतो रोज मरतो रोज मरतो तरी पण ह्या मरण्यातुनच रोज येते नवि उभारी जगण्याची जेव्हा घरी ये