Skip to main content

ती येते आणिक जाते

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 29/12/2011 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
गालावर येणारी अवखळ लट मानेला हिसका देऊन बाजुला सारण्याची तुझी जीवघेणी लकब... त्याचवेळी तुझ्या डोळ्याचे कोपरे हळूच बघून घेतात समोरचा तडफडणारा जीव अजून जिवंत आहे किंवा कसे? काळ्याभोर लटेचा तो हिसका बसताच खोलवर दडलेले कुठलेसे बीज तरारून थरथरते आणि वरवर यायला बघते ते धुमारे काळ्या डोहात कसलासा आकार घेत आहेत असे वाटू लागते तोच टिक टॉक सॅंडल्स उडवित तू निघून देखील जातेस समोरचा पाचोळा बेफिकीरीने उधळीत उडालेली धूळ काळ्या डोहात धुमार्‍यान्ना गुदमरून टाकीत पाण्यात विलीन होते अस्वस्थ तरंग देखील नि:शब्द होतात शब्दावाचून कुठली कविता? तू येते आणिक जाते...... येताना अबोल धुमारे आणतेस जाताना त्यां धुमार्‍याची होउ घातलेली शब्दफुले कुसकरून निघून जातेस तुला रोखण्याचे धैर्य नसतेच मग मी कवितेलाच दोष देतो..... ती येण्याआधीच गेलेली असते........... ********************
लेखनविषय:

वाचने 1401
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कविता म्हणून मस्तय. पण धाग्याच्या नावारून वाटलं की आमच्या रोज हुकणार्‍या लोकलबद्दल लिहिलत की काय. की कधीतरी सकाळी सकाळी पोटात कळ येउन जाते त्याबद्दल लिहिलत की काय. अप्रायजलच्या काळात अशीच चांगली हाइक मिळनार असल्याची बातमी येते आणिक जाते, आम्हाला वाटलं आम्हाला भेडसावणार्‍या अशा ज्वलंत मुद्द्यबद्द्ल लिहिलत की काय.

शेवटची ओळ जरा अर्धीशी वाटतेय. एखादा शब्द राहिलाय का?