Skip to main content

मी काढलेली काही निसर्गाची छायाचित्रे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 29/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नाखव्याचा ह्रदयभंग........ शहरी उदास पाऊस....... ही वाट दूर जाते..............कोकणातील गावा... क्षितिज आणि मी... तग धरून असलेले गवत.. नभ मेघांनी आक्रमले....... समूद्र किनार्‍यावर मला नेहमीच स्वतंत्र वाटते.... केंव्हा पडणार हा ..... शांत आणि अंतर्मूख........ मालवण-तार्कर्ली........लिलावात मासे घेऊन झाल्यावर........ उद्या परत हेच................? आसमापे है खूदा... जी मे आता है यही मर जाइये....... अशी एक किंवा निसर्गात एखादी साधी खोली असावी, लॅपटॉप असावा...आणि डोक्यात विचार असावेत........... जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8891
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

सर्वच फोटो छान परंतु, 'शांत आणि अंतर्मूख........' आणि 'उद्या परत हेच................?' ही शीर्षके आणि फोटो फार आवडले. आभारी आहे. -- कॉमॅ.

एकाहून एक सरस छायाचित्रे. तुमच्याकडे अद्भुत चित्रांचा खजिनाच आहे की. क्षण गोठवून ठेवले आहेत तुम्ही... गोठवून तरी कसे म्हणू, ताजेच आहेत ते..

अप्रतिम चित्रं आहेत!

अतिशय वेगळे आणि उत्तम क्षण असे काही पकडले आहेत की बस्स! शहरी उदास पाऊस विशेष आवडला त्याच्या सुरेख छाया प्रकाशा साठी... अजून खूप येऊ द्या... फोटोग्राफरचा 'डोळा' खरंच विशेष आहे!

In reply to by मैत्र

>>फोटोग्राफरचा 'डोळा' खरंच विशेष आहे! +११११११ अजून छायाचित्रं... थोड्या चांगल्या प्रतीची (रेझोल्यूशनच्या हिशेबी) बघायला नक्की आवडतील. ही सुद्धा अप्रतीमच! त्यांना दिलेल्या कॅप्शन्स विशेष आवडल्या. जे पी

अप्रतिम १० छायाचित्रांचा खजीना. अभिनंदन. अजून दोन निसर्गचित्रे मिळवून २०१२ ची एक सुंदर दिनदर्शिका बनविता येईल.

जयंत जी, एकही फोटो दिसत नसल्याने निराशा झाली, तरीही रात्री घरी हे फोटो पाहता येइल का हे पाहतो.. तरी तुम्ही पिकासा वरुन का लिंक देत नाही.. ?

सगळी चित्रे आवडली. नभ मेघांनी.. विशेष आवडले.

सर्वच छायाचित्रे आवडली. खूप सुरेख आहेत. चित्रे थोडी मोठ्या आकारात देता येतील का? जरा लहान वाटत आहेत.

In reply to by स्मिता.

चित्रे थोडी मोठ्या आकारात देता येतील का? जरा लहान वाटत आहेत.

सगळीच चित्रं आवडली. नभ मेघांनी आक्रमिले आणि समुद्रकिनार्‍याची विशेष आवडली.

सर्व छायाचित्रे अतिशय कल्पकतेनी टिपलेली आहेत..पण शेवटचं मात्र फार बोलकं आहे...

फोटो आवडले.. आकाराने मोठे असले तर अधिक उत्तम होईल.

त्यांची शीर्षकेही खूप बोलकी. सगळ्या चित्रातून एक समान शांत उदासीची भावना आली आहे. त्यातही किनार्‍यावरची अर्धवर्तुळाकार लाट खूप आवडली. (फक्त आकार जरा मोठा असता तर अजून मजा आली असती. )

In reply to by जयंत कुलकर्णी

धन्यवाद श्री. जयंत कुलकर्णी. आता १३ छायाचित्रे झाली आहेत. हरकत नाही. मराठी कालगणनेतील, अधिक मास येणार्‍या, वर्षासाठी कॅलेंडर बनविता येईल.

तुमचा pov मला आवडला. आणखी येऊ द्यात.

खरोखर अप्रतिम आहेत सर्व चित्रे..