Skip to main content

उडदाच्या डाळीचे वडे / भजे अन सांबार

लेखक पियुशा यांनी रविवार, 08/01/2012 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
उडदाच्या डाळीचे वडे / भजे अन सांबार सांबर साहित्य : तुरीची डाळ १ वाटी. २ छोटी वांगी .( काप ) १ बटाटा ( काप ) १ शेवग्याची शेंग .( तुकडे करून ) २ कांदे चिरून २ टोमॅटो चिरून चिंचेचा कोळ १ चमचा.

(चितळेबंधू सांगतायत बाकरवडीच्या युक्त्या )

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 08/01/2012 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या मित्र हो, चितळेबंधू मिठाईवाले आपणास माहीतच आहेत. त्यांच्याबद्दल आपण अनेकदा वाचले आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक पैलू सादर करत आहे. दरवर्षी अनेकवेळा तुम्ही चितळेबंधूंकडे मिठाई आणायला जाता, अर्थात दुपारी १ ते ४ ही वेळ टाळून कारण ही वेळ त्यांच्या झोपेची असते. सणांच्या दिवशी तुम्ही तर अधिकच गर्दी करता, २०११ च्या दिवाळीत मात्र चितळ्यांकडे लांबच लांब रांग लागली होती. पार पंचक्रोशीतून लोक गर्दी करत होते.

ईज मोनोगॅमी अ मिथ?

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 08/01/2012 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मराठी शिर्षक सुचले नाही म्हणून ईंग्रजीमधेच लिहिले त्याबद्दल माफी असावी. काल एका क्लिष्ट विषयावर चर्चा पाहिली आणि त्याबददल इथे लिहावसं, चर्चा करावीशी वाटली. सध्या हा एक ज्वलंत प्रश्न आहे आणि केवळ उच्चभ्रू/अतिश्रिमंत समाजाशी निगडीत न रहाता सर्वसामान्यांच्या घरात देखील घुसू पाह्तो आहे. हा मुद्दा विवाहित, अविवाहित लग्नाळू मुला-मुलींचे पालक या सर्वांनाच लागू होतो. आजकाल घटस्फोटांचे वाढते प्रमाण आपण पहातोच आहे. त्याचप्रमाणे लग्न न करणार्‍यांची संख्या देखील झपाट्याने वाढते आहे.

चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 07/01/2012 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, पुज्य चितळेबाबांच्या गिरनारची यात्रा आपण वाचलीत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू सादर करत आहे. दरवर्षी चितळेबाबा आमच्याकडे गणेशोत्सवात आरास व मुर्तीच्या दर्शनाला येतात. २०११ मधील उत्सवात, त्यावेळी आमच्या सुनबाईंनी नुकत्याच सजवलेल्या हॉलची पहाणी करायला बाबा आवर्जून आले होते.

बाई माझी, ही तंगडी मोडली

लेखक विदेश यांनी शनिवार, 07/01/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: बाई माझी, करंगळी मोडली) ऐन दुपारी, नमुना फेरी, गाडी नवी काढली - काढली बाई माझी, ही तंगडी मोडली || धृ || झणी मारून मी कट वळताना कुठून अचानक आला श्वान हा गुपचुप येऊन, पाठीमागून माझी साडी ओढली || बाई माझी ... समोर भुंके कसा आडवा पायच धरला, (-अंगाला घाम फुटायचं ते कारण होतं का?) माझा उजवा मी ओरडले, तिथेच पडले, उठताना मोडली || बाई माझी ...

नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन

लेखक गणपा यांनी शनिवार, 07/01/2012 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या नायजेरिया(नायज्जा)मधील एक पाककृती तुमच्यासाठी घेउन आलोय. हा नायजेरियचा राष्ट्रीय पदार्थच आहे म्हणा ना. अगदी लग्ना,बारश्या पासुन ते 'दिवसा'पर्यंत कुठलाही समारंभ असुद्यात मग जेलोफ राईस हवाच हवा. त्याशिवाय पंगत पुर्ण होणे नाहीच. या भाताच्या जोडीला येते ती पेप्पे चिकनची तंगडी नाही तर मग चिकन स्ट्यु किंवा कॅरमलाईज्ड प्लँटीन (राजेळी केळी). थोडक्यात सांगायच तर जेलोफ राईस म्हणजे आपला टॉमेटो राईसच पण किंचीत बदल.

facebook सारख्या social netwarking site office मध्ये कश्या उघडाव्या ?

लेखक kunal.deshpande@gmx.com यांनी शनिवार, 07/01/2012 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रत्तेक जण facebook/twitter/orkut वापरतो. बर्याच ऑफिसमध्ये हि site block करण्यात आली आहे. त्यामुळे हि अधिकृत मार्गाने वापरता येत नाही. तसे अनधिकृत मार्ग अनेक आहेत. माझ्या office मध्ये पण हि बंद आहे. हि website अधिकृतपणे कोणालाही संशय नयेता उघडायची कशी ह्यासाठी मी बराच काळ आंतरजाला वर शोध घेत होतो. शेवटी ह्याचा उपाय सापडला आहे. ती इथे देत आहे. त्यचा तुम्हालाही बराच उपयोग होईल. मला एक website सापडली आहे ज्या वर आपण आपले facebook/twitter/orkut connect करू शकतो. एकदा connect झाले कि आपल्याला ह्या site चे उप्डते इथे दिसतील. तर अश्या बर्याच website आहेत. पण मला hootsuite हि site जास्त आवडली.