Skip to main content

हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा परिसर :भाग २: अप्पर धर्मशाळा -मॅक्लिओडगंज परिसर

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 05/12/2022 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागाचा दुवा सुरवातीला सहलीसाठी आलेली अडथळ्यांची शर्यत पार करून आम्ही अखेर सकाळी ९ वाजता पठाणकोट छावणी रेल्वे स्टेशनला पोहचलोच.  पुढच्या भटकंतीसाठी ठरविलेली गाडी रेल्वे स्थानकाबाहेर येऊन थांबल्याचा तासाभरापूर्वीच फोन आला होता. स्थानकाबाहेर येऊन गाडीचा मालक, चालक यांची भेट झाली.

उडून गंध चालल्या...

लेखक Deepak Pawar यांनी सोमवार, 05/12/2022 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
उडून गंध चालल्या फुलास वाटते तसे कसे सुने - सुने उदास वाटते. कधी वसंत येईल, बहरेन मी पुन्हा झडून पान चालल्या तरुस वाटते. पवन तुला करीत स्पर्श जातसे अता दरवळला चहूकडे सुवास वाटते. कशास जन्म हा जगून काढला इथे उगाच का असे - तसे मनास वाटते. निघून चाललीस तू इथून ज्या क्षणी तिथेच संपला असे प्रवास वाटते. दीपक पवार.

जन्मजात दुखणे येता...(१)

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 05/12/2022 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
ok एखाद्या संततीइच्छुक जोडप्याला मूल होणे ही त्यांच्या आयुष्यातील अत्यानंदाची घटना असते. जन्मलेले मूल वरकरणी निरोगी आणि निर्व्यंग असणे ही निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य भेट असते. दुर्दैवाने काही नवजात बालके जन्मताच एखादे शारीरिक व्यंग(birth defect) घेऊन येतात. यांपैकी काही सामान्य स्वरूपाची असतात तर काही गंभीर. सामान्य व्यंगामुळे संबंधित बालकाच्या पुढील आयुष्यात विशेष अडचण येत नाही; अर्थात काही तडजोडी कराव्या लागतात.

काळभैरव -आगडगाव

लेखक Bhakti यांनी रविवार, 04/12/2022 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारी नगरच्या महिलांना स्वयंपाकाचा कंटाळा आला,आणि होटेलात जायचा कंटाळा आला , झणझणीत खावं वाटलं की आगडगावाचे प्लॅन केला जातो. आगडगावाला शंकराचा अवतार/सेवक काळभैरव याचे जुने मंदिर आहे.रतनमल,देवमल ,आगडमल या तीन राक्षसांनी हे दगडाने बनलेले मंदिर बांधले आहे अशी आख्यायिका आहे. Q मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांची शिरं आहेत.कदाचित हे किर्तीमुख असावेत पण आता मंदिरावर इतके आधुनिक रंगरंगोटी इतर थर आहेत की ओळखता येणे अवघड आहे.आतील , बाहेरील बांधकामही हेमाडपंथी दिसत आहे परंतु कोणताही शिलालेख

झटपट लिहीण्याचा सराव असावा म्हणून नेट-प्रॅक्सीस

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 03/12/2022 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.loksatta.com/explained/sidhu-moosewala-murder-case-know-who… कानून का शिकंजा हत्यारावर टाकला पंजा तो गोल्डी बरार कॅनडात फरार पंजाब पोलीस भटक कॅलीफोर्नियात अटक सिद्धू मूसेवाल ची हत्या सत्येंद्रसिंग धरला सत्या होते तसे काल गायक आज कसे खलनायक

चालचलाऊ गीता -अध्याय २ (विडंबन)

लेखक दमामि यांनी शनिवार, 03/12/2022 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे मग कृष्ण त्याला| काय अलिबागेहुनि आला? डोस्क्यावरि तुझ्या मेल्या| वशाड शिरा पडो||   उगा रडसी मुर्दयासाठी |वरी ज्ञान पाजळसी| काय जास्त घेतलीसी| रात्रीची नवटाक|| अरे हे राजे लोक| टेम्परावरी आणि फेक | जन्माचे घेति रिटेक| परमनंट नाही || नवी रूपे घेतॊ रोज| कधी बाळ्या कधी आज्जा | आत्मुच्या भारी गमजा| पण तो बंधमुक्त || तोच जाण खरा कुल| कधी न हो दांडी गुल | केले कुणी जरी फुल|तयासि येताजाता || तू म्हणे टपकवशील , जे मी निर्मियेल? फुका काय बोलशील| काहीही हं अर्जुना|| सुप्रसिद्ध चालचलाऊ गीता लिहिणा-या श्री जे के उपाध्ये यांची क्षमा मागूनहा दुसरा अध्याय लिहिण्याचा प

Kooman The Night Rider (कुमान द‌ नाईट रायडर)

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 03/12/2022 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष: मल्याळम इंग्रजी उपनामांसाहित २ तास ३३ मिनिटे गुन्हा, थरार, रहस्य अमेझॉन प्राईम . ओळख- ही गोष्ट आहे गिरीशंकर या केरळ पोलीस दलातील CPO (सिविल पोलीस ऑफिसर) ची. एका विशिष्ट कारणामुळे गिरीशंकर प्रचंड स्वाभिमानी, अहंकारी आणि अत्यंत चालाख पोलीस अधिकारी असतो.

Döstädning उर्फ Death Cleaning उर्फ मोकळे हात !

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 02/12/2022 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर लिहावे का नको असा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. निमित्त झाले एका जेष्ठ मैत्रिणीच्या भेटीचे. आमच्या वयात साधारण ३५ वर्षाचे अंतर आहे. तिला आंटी / काकू / मावशी / आजी म्हटलेले आवडत नाही म्हणून मैत्रीणच आहे ती माझी, फ्रेंड-सखी. जोडीदार वैतारिणीपार. स्वतः सेवानिवृत्त. अपत्ये तीन. एक मुलगा तरुणपणीच निवर्तला, दुसरा दूरदेशी संपन्न-सुखी आयुष्य जगतो आहे. मुलगी स्वतःच्या शहरातच थोडे दूरवर सासरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात राहते. मैत्रीण आनंदी आणि प्रेमळ स्वभावाची आहे. मुलगा-मुलगी-सून-जावई-नातवंडे-व्याही सर्वांशी उत्तम संबंध आहेत, सगळीकडे येणे-जाणे आहे.

Thought Experiment No 2

लेखक भागो यांनी गुरुवार, 01/12/2022 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची सकाळ. साहेब आणि बाईसाहेब नाष्टा करत होते. रोबोटिक वॅक्युम क्लीनर बेडरूम झाडत होता. रात्रीची उष्टी भांडी डिशवॉशर ने रात्रीच स्वच्छ करून ठेवली होती. टोस्टरने ब्रेड भाजून ठेवले होते. कॉफी मेकरने कॉफी तयार केली होती. बाईसाहेबांनी नाश्ता मांडला होता. पण मला वाटतं दोघांचेही खाण्यात लक्ष नव्हते. एक अनामिक ताण होता दोघांच्या मनावर. शेवटी साहेबांनी शांततेचा भंग करत तो पर्यंत म्हटलं, “अनु, आता तू काय करणार?” “काय करू? तूच सांग. आज पहिलाच दिवस होता. आणि हे अस.” “तू एचआरला फोन करून रिक्वेस्ट करून बघ. अजून चार पाच दिवसांची सवड मिळाली तर. तसे चांगले आहेत ते लोक. मी करू का फोन?