
एखाद्या संततीइच्छुक जोडप्याला मूल होणे ही त्यांच्या आयुष्यातील अत्यानंदाची घटना असते. जन्मलेले मूल वरकरणी निरोगी आणि निर्व्यंग असणे ही निसर्गाने मानवाला दिलेली अमूल्य भेट असते. दुर्दैवाने काही नवजात बालके जन्मताच एखादे
शारीरिक व्यंग(birth defect) घेऊन येतात. यांपैकी काही सामान्य स्वरूपाची असतात तर काही गंभीर. सामान्य व्यंगामुळे संबंधित बालकाच्या पुढील आयुष्यात विशेष अडचण येत नाही; अर्थात काही तडजोडी कराव्या लागतात. परंतु काही गंभीर स्वरूपाच्या व्यंगांमुळे आयुष्याच्या पहिल्या तीन-चार आठवड्यातच मृत्यू होऊ शकतो. जगात एकूण जन्मणाऱ्या बालकांमध्ये व्यंग असणाऱ्या बालकांचे प्रमाण तुलनेने बरेच कमी आहे. परंतु ज्याच्यावर अशी वेळ येते त्याच्या दृष्टीने मात्र तो मनस्ताप देणारा विषय ठरतो. अशा काही जन्मजात शारीरिक व्यंगांची वाचकांना या लेखमालेद्वारे सचित्र ओळख करून देण्याचा विचार आहे.

या विषयाची व्याप्ती समजण्यासाठी हा अल्पसा
विदा :
• दरवर्षी जगात जन्मणारी बालके 14 कोटी
त्यापैकी 6% बालकांना जन्मजात दोष
• भारतात दरवर्षी जन्मजात दोष असलेली सुमारे
4,75,000 बालके जन्मास येतात.
• जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार वास्तवातील आकडेवारी याहून जास्त असण्याचा संभव आहे, कारण सर्वच देशांमध्ये अशा सर्व घटनांची पुरेशी नोंद होत नाही.
जन्मजात शारीरिक व्यंगांचे
वर्गीकरण साधारणपणे असे करता येईल :
1. बाह्यता दिसणारी व्यंगे
2. वरून न दिसणारे परंतु शरीरांतर्गत बिघाड
3. गुणसूत्रांच्या पातळीवरील बिघाड
शरीराच्या डोक्यापासून ते थेट पायापर्यंत अनेक अवयवांची दृश्य व्यंगे वैद्यकाच्या इतिहासात नोंदलेली आहेत. त्यापैकी काही सामान्य तर काही गंभीर स्वरूपाची आहेत. अशा काही महत्त्वाच्या व्यंगांची ही यादी :
सामान्य:
• बोटांच्या नखांचा अभाव
• जखडलेली जीभ
• दुभंगलेली पडजीभ
• विविध नेत्रदोष
• नाक व कानाचे विचित्र आकार
• संख्येने अधिक स्तनाग्रे
• संख्येने अधिक हातापायाची बोटे/ जोडलेली बोटे
• सरकलेले गुदद्वार
• छोटेसे शिस्न; पोटात अडकून राहिलेले वृषण
गंभीर:
A. बाह्यता दिसणारी :
• मेंदूची प्रचंड खुरटलेली वाढ: पाठीच्या मणक्यातील तीव्र दोष
• दुभंगलेले ओठ
• संपूर्ण हात किंवा पायाचा अभाव/ खुरटणे
• डाऊन सिंड्रोम
B. अंतर्गत बिघाड:
• हृदयरचनेचे विविध दोष
• अन्ननलिकेचे व आतड्यांचे दोष
• मूत्रपिंडाचा अभाव/ खुरटलेली वाढ
जन्मजात दोषांची कारणे
• 63% दोषांमध्ये कारण समजलेले नाही.
• 27% दोष जनुकीय किंवा गुणसूत्रांमधील बिघाडामुळे होतात
• 10% दोष गर्भवतीची जीवनशैली/आजार आणि पर्यावरणीय घटकांमुळे होतात. यामध्ये खालील मुद्दे येतात:
A . कुपोषण
B . गंभीर जंतुसंसर्ग (उदा. रूबेला)
C . किरणोत्सर्ग/रसायनांचा मारा
D . दीर्घकालीन आजार : मधुमेह
E . गरोदरपणात गर्भावर विपरित परिणाम करणाऱ्या औषधांचे किंवा अंमली पदार्थांचे सेवन
जन्मपूर्व दोषनिदान
वरीलपैकी काही गंभीर दोष आता चाचण्यांमुळे गर्भावस्थेत लक्षात येतात. त्यासाठी वैद्यकीय मुद्द्यांवर गर्भपात करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी गर्भावस्थेची कमाल मुदत प्रत्येक केसनुसार ठरवण्याची कायद्यात तरतूद आहे.
व्यंगांचे परिणाम व समस्या
1. संबंधित व्यक्तीच्या शरीरसौंदर्यावरील परिणाम हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. त्यातून संबंधिताच्या मानसिक पातळीवरही परिणाम होतात.
2. विविध व्यंगांचे वैद्यकीय उपचार हे शल्यचिकित्सकांसमोरचे एक मोठे आव्हान असते. विज्ञानातील प्रगतीमुळे काही दोषांचे पूर्ण निराकरण शक्य झालेले आहे. परंतु काहींच्या बाबतीत मात्र अद्यापही संशोधन चालू आहे.
3. सामाजिक समस्या : व्यंग असलेल्या व्यक्तीना समूहात सांभाळून घेणे आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी विविध सोयीसवलतींच्या योजना आखाव्या लागतात.
वरील यादीतील काही महत्त्वाच्या जन्मजात शारीरिक दोषांचा आढावा पुढील भागांमध्ये घेईन. वाचकांना तो माहितीपूर्ण वाटेल अशी आशा आहे.
****************************************************************
क्रमशः
हा अतीशय संवेदनशील विषय आहे.
In reply to हा अतीशय संवेदनशील विषय आहे. by श्वेता२४
श्वेता
मुलाला आणि पालकांनाही दु:खात टाकणारा योग.
हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद!!
In reply to हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद!! by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद !
In reply to हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद!! by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद !
दिव्यांगांसाठी खरोखरच खूप कमी
दिव्यांगांसाठी खरोखरच खूप कमी
त्यात आधी नॉर्मल असून पुढे
फारच संवेदनशील विषयाची निवड केली आहेत
In reply to फारच संवेदनशील विषयाची निवड केली आहेत by टर्मीनेटर
फोटो मुद्दा
कौतुकास्पद !
दुवा
नैतिक प्रश्न
जोडलेल्या जुळ्यांचा मृत्यू