किंमत प्रणाली - भाग १
अर्थशास्त्रातील किंमत प्रणालीचे (Price system) महत्व सांगणारी ही दोन लेखांची मालिका आहे. पहिल्या भागात किंमत येते कोठून आणि किंमत प्रणालीचे नेमके कार्य काय याची चर्चा केली आहे. दुसऱ्या भागात काही नेमक्या उदाहरणांची चर्चा केली आहे.
गेले जवळ जवळ वर्षभर मी रिक्षाने प्रवास करण्यासाठी रॅपीडो या ऍपचा वापर महाराष्ट्रातील एका शहरात करत आहे. त्यावरचा अनुभव असा आहे जवळच्या भाड्यासाठी रॅपीडोवरील भाडे हे मिटरने होण्यारे भाड्याच्या तुलनेत २०-३०% जास्ती असते. आणखी दूरचे भाडे मात्र काही त्यापटीत वाढत नाही आणि मीटरपेक्षा २-५ रुपये (टक्के नव्हे) कमीच असते.
मिसळपाव