Skip to main content

(गोट्या)

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/06/2023 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा वाट्या सगळंच कसं मिळमिळीत, उदास आणि बुळबुळीत सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही छाप चाललेले असताना कधीमधी आठवतात आयुष्याच्या वळणांवर भेटणार्‍या गोट्या दोन मिटींगांच्या मध्येच स्मोकिंग झोन् पकडुन निवांत सुट्टा मारताना लहानपणी शाळा बुडवुन, मैदानात मित्रांना जमवुन हिरीरीने जिंकुन आणि अधाशीपणे खिशात भरुन घरी नेलेल्या आईचे धपाटे ,बाबांची नजर आणि भावाची चापलुसी चुकवत प्लास्टिकच्या डालडाच्या डब्यात, कपाटात दडवुन ठेवलेल्या मग पुढे कधीतरी शाळा सुटली पाटी फुटली होती नव्हती ईज्जत लुटली सोडवताना ईंजिनीयरिंगच्या केट्या
काव्यरस

सिनेमाच्या गोष्टी भाग ६

लेखक साहना यांनी शुक्रवार, 23/06/2023 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा चित्रपट एक भारतीय चित्रपट आहे आणि तो सुद्धा मिथुनदाचा. मिथुन म्हणजे गरिबांचा अमिताभ अशीच इमेज आहे. गुंडा, लोहा, आणखीन अनेक बी ग्रेड सिनेमांचा सम्राट मिथुन ह्याला मुख्य चित्रपट क्षेत्रांत सुद्धा चांगले यश लाभले. मिथुन मध्ये अभिनय क्षमता होती ह्यांत शंकाच नाही. गुरु मधील रामनाथ गोयंका ह्यांची भूमिका माझी विशेष प्रिय मिथुन भूमिका आहे. मिथुन ह्यांचा गुडिया हा चित्रपट जास्त लोकांनी पहिला असेल असे मला वाटत नाही. हा १००% आर्ट सिनेमा होता. ह्याचा प्रीमिअर सुद्धा १९९७ मध्ये टीव्ही वर झाला. तेंव्हा सहारा नावाचा चॅनल होता त्याच्यावर.

(पाट्या) :/

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 23/06/2023 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं. आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या. अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या फ़्रीज झालेल्या, दमलेल्या, दोस्त-लोकांच्या तारखा, अन, गझलेत गुंतून 'बसल्यावर' कंठभरल्या पाट्या

छाट्या

लेखक अहिरावण यांनी गुरुवार, 22/06/2023 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : ओळखा पाहू गावोगाव हिंडून दारोदार भिक्षा मागतांना कुणी दान दिलेल्या कुणी फेकून दिलेल्या कुठून कुठून मिळवलेल्या गोळा केलेल्या सुती, टेरीलीन, टेरीकोट, खादी अन् रेशमी छाट्या आज वाटून मोकळे होऊ उद्या मोकळे होऊ म्हणता म्हणता दिवस सरता सरता अजुन एक भर पडून नीट घडी करुन, जपून ट्रंकेत ठेवलेल्या याने दिलेली त्याने दिलेली अन ती छाटी तर...

बरणी..

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 22/06/2023 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
गुढ वाट्याहून प्रेरित होऊन.. मोठ्या हौशीने बरणी आणली आधी पत्र्याचं झाकण होतं लोणचं घातलं सतत तेलं खारं संपर्कामुळे ते झाकण गंजल... मग खुप शोधा शोध केली बोरं आळी,गंज बाजार त्याच मापाचं प्लास्टिक झाकण शोधून मिळवलं .. आता लोणचं नाही टाकलं मुरांबा केलाय आंबट गोड वेलदोडे ,लवंग स्वादाने भरलेला बरणीत मुरांबा आता चांगला मुरलाय बरणी आहे 'काचेची' कर् करून नावं कोरता येत नाही मलमलच्या कपडा तिच्या तोंडाशी बांधते ओळख म्हणून...

कुटचलनाची बाराखडी----ब्लॉक-चेन

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 21/06/2023 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी माझ्या मागच्या एका लेखात कुटचलनाबद्दल थोडी माहिती दिली होती. पण कुटचलन हे ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे आले किंवा ज्यावर ते आधारित आहे , त्या ब्लॉकचेन बद्दल काही लिहायचे राहून गेले होते. ते आपण इथे पाहूया. जसे आपल्याला झेरॉक्स म्हटले की समजते पण खरेतर "फोटो कॉपियर" हे त्या तंत्राचे मूळ नाव आहे आणि झेरॉक्स ते बनवणारी एका कंपनी. तसे ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आहे आणि बीटकॉइन हे ब्लॉकचेनवर आधारलेले एक कुटचलन. मागच्या लेखाचा दुवा कुटचलनाची बाराखडी तर मुळात ब्लॉकचेन काय आहे ?

वाट्या..

लेखक गवि यांनी बुधवार, 21/06/2023 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं कसं थोडं थोडंसंच उरून बसलेलं.. गिळवतही नसलेलं अन फेकवतही नसलेलं.. बळंच सात आठ घास जास्त खाऊन संपवायला हवं.. नाहीतर मग वाट्यांमधे भरून फ्रीजमध्ये ठेवायला हवं.. फ्रीजमध्ये खूप वाट्या आहेत पूर्वीच उरून बसलेल्या.. उद्या फोडणी देऊ म्हणत परवा तेरवाच नासलेल्या.. पोटातलं फेकून सुटकेची ओशट वाट बघणाऱ्या.. आतल्या शिळवड्याला दाबून डिस्पोजेबल वड्या बनवणाऱ्या.. मोकळ्या होऊन क्षणभरच दवबिंदूनी डवरणाऱ्या.. पुन्हा स्वतःत जळकी ताजी उरलेली अर्धी कच्ची स्वप्नं कोंबून.. त्यांना बायोडिग्रेडेबल शिळी निर्माल्यं करणाऱ्या.. पुन्हा पुन्हा फ्रीजमध्ये ठासलेल्या ठरीव आकाराच्या थंड वाट्या.. कर्कश आवाजात ओरखडून तारख

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग - १.५

लेखक भागो यांनी बुधवार, 21/06/2023 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पण आत्ता इथे. आकाशगंगेच्या उत्तर दिशेला असलेले केंस वेनाटीकी (Canes Venatici) नक्षत्र समूहात टीओएन ६१८ अतिविशाल कृष्ण विवर. वेळ? ज्याने “काळा”ला गती दिली त्याच्याच उपस्थितीत तुम्ही वेळ विचारत आहात! कृष्ण विवरात कालप्रवाह थबकलेला असतो. पुढे जायचं विसरलेला असेल किंवा वहायची इच्छाशक्ति हरवली असेल. अनंत कोटी ब्रह्मांडनायका समोर काळ नतमस्तक झाला होता. Time saw The Mastar and froze! अशा ह्या एकलतेमध्ये अशरिणी विश्वशक्तींची विचारसभा भरली आहे.

हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं....

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 21/06/2023 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/pune-rajgad-fo… हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं.... कशी पडलीस आकर्षणा गं ? गाजवून एमपीएससी चमत्कारा ग, आली पुण्यात स्विकारा सत्कारा ग जरी जाहलीस वनाधिकारी ग, नाही जाणले श्वापद विकारी ग सावध हरिणी सावध ग, करील कुणीतरी पारध ग तुझी बुद्धी गेली वाया ग, गेली कूजून सुंदर काया ग राहीली महाराष्ट्र सेवा ग ! राहीली महाराष्ट्र सेवा ग ।।