हेंडगूळ
*हेंडगूळ*
पावसाळ्यातली गोष्ट. गाडी मित्राकडे होती, ती आणायला पायीच चाललो होतो. उड्डाणपूलाच्या बाजूने सर्विस रोडवर पूर्ण चिखल झालेला. एकच माणूस जाईल, इतकीच पायवाट शिल्लक, बाकी सगळा चिखल. जवळपास अर्ध अंतर गेल्यावर एके ठिकाणी पाच सहा कुत्र्यांचा घोळका एका कुत्री साठी जोरजोरात भांडत होता. ते बघून पलीकडून येणारे दोघं तिघं आणि इकडून जाणारे आम्ही दोघं तिघं, जागेवर थांबलो. चुकून जरी भांडत आमच्या अंगावर आले, तरी आम्हाला पळायला जागासुद्धा शिल्लक नव्हती. मिनीटभराने ती कुत्री तिथून हलली आणि तिच्या मागे सगळा घोळका. मनातल्या मनात शिव्या घातल्या "भाद्रपदाला अजून दोन महिने अवकाश असताना मधेच काय?".
एक तरी शिवी अनुभवावी..
धर्मेंद्रचे दोन्ही हात वरती लोखंडी चौकटीला बांधलेले. त्याच्या मानेला,ओठाला रक्त. त्याच्यावर गन रोखलेली. गब्बर बसंतीला म्हणतो,"नाचो,जबतक तेरे पाॅंव चलेंगे ,इसकी साॅंस चलेगी!" आणि विरु ऊर्फ धरमिंदर ओरडतो,"बसंती,इन कुत्तोंके सामने मत नाचना!"तरी बसंती त्याचे प्राण वाचवायसाठी नाचते.
शोले मधला हा सीन सर्वांना तोंडपाठ आहे. (शोले न पाहिलेला माणूस भारतात नाही. अशी वदंता आहे.) असा एकही सिनेमा
नसेल ज्यात धर्मेंद्रने "कुत्ते,कमीने" ही शिवी दिली नसेल.
सिनेमातला प्रत्येक हिरो,हिराॅईन,व्हिलन शिव्या देतोच. एवढंच काय, जगात कुठेही असा माणूसच सापडणार नाही,ज्यानं आयुष्यात कधी कुणाला शिवीच दिली नाही.
पुन्हा एकदा म्युचुअल फंड्स
नमस्कार मंडळी
हापिसात चहापाण्याच्या वेळी आम्ही नेहमी जागतिक स्तरावरच्या गप्पा मारत असतो. म्हणजे पुतीनला हार्ट अॅटॅक आला, आता युक्रेन वॉरची पुढची स्टेप काय असेल? किवा बिबीने (आपले नेतान्याहु हो) गाझा मध्ये सैन्य घुसवले, आता पुढे काय? अशा गप्पांचा मोठा फायदा म्हणजे आगामी काळात गाडी बदलायची असेल तर पेट्रोल घ्यावी, सी एन जी की हायब्रिड? सेकंड होम बूक करावे की सरळ प्लॉट मध्ये गुंतवणुक करावी? ईथपासुन ते घरात खाण्याचे तेल कितपत साठवुन ठेवावे? गव्हाचे पोतेच आणावे की नेहमीसारखे ५-५- किलो पुरे?
शूर्पणखा
परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो.
भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. .
सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय.
मशिनचं पायटं हलवत भाऊ एकदम तल्लिनतेनं ही कविता गायचे.
'झंटी मॉल प्रॉब्लेम'- समस्या, समाधान कि अमूल्य भेट? (कथा - भाग दुसरा)
'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या गेम शोच्या दशकपूर्तीनिमित्त असलेल्या विशेष भागासाठी दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागाचे चार स्पर्धक 'विशेष अतिथी' म्हणून मंचावर सपत्नीक स्थानापन्न झाले होते.
दसरा की शिमगा
दसरा की शिमगा?
ते विचारांचे सोने
की टोमणे व रोने
काही दखल नेक?
नुसती चिखलफेक
जाळणार खोकेसूराची लंका
अपात्रतेचा निर्णय कधी, शंका
शिवाजी पार्क वि.आझाद मैदान
कुठे पडणार पुढचं मतांच दान?
मी काम करतो, जातो थेट साईटवर
ते असतात लाईव्ह फेसबुक साईटवर
गर्दी जमा ची रोजगार-हमी
नाहीतर आहेच जंगली रमी
मानसशास्त्र झूंडीचं
मिडीया बाईट धूंडीत
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण,
शिंदे सरकार देणार म्हणजे देणार
चिन्ह गेले, पक्ष गेला,आता कोर्टबाजी
अपात्रतेचा निर्णय तो कधी येणार?
जालना लाठीचार्जचा डायर कोण?
षडयंत्राचा तो सुत्रधार कायर कोण?
एकंदरीत होतोय समाज खुजा
गल्लीत पोस्टर माझा कि तुझा.
घरी जातांना काय टेक अ
प्रारब्ध भाग ३
गोविंदाने हळूहळू खटारा ओढत पूल सुद्धा पार केला. तो जुनाट लाकडी पूल इतका आवाज करत होता कि दोन्ही मुलांना भीती वाटली आणि त्यांनी आपल्या वडिलांना घट्ट पकडले. तो वाटसरू सुद्धा थोडा घाबरून चालत होता. पण एकदाचा पूल पार झाला. दोन्ही मुलांनी पहिल्यांदाच पूल पहिला होता त्यामुळे त्यांना थोडी मजा सुद्धा वाटली. पुलाच्या दुसर्या बाजूचा रस्ता विस्तीर्ण होता. त्याला राजमार्ग असे संबोधायचे ह्या रस्त्यावर वर्दळ थोडी जास्त असे. आता उतरंड असल्याने सगळीच मंडळी खटार्यावर बसली होती आणि गोंविदाच्या पायांत थोडी गती आली होती.
मार्गक्रमण करता करता दूरवरून थोडी धूळ दिसू लागली. हयग्रीव सावध झाला.
मिसळपाव