द टाईमब्रिज अर्थात कालसेतू –३
पूर्वसूत्र :
…. तीन दिवसांनी आग विझली तेव्हा धीरावतीचे भाऊ आत शिरले आणि त्यांनी वाडा पिंजून काढला. पण काळ्याठिक्कर पडलेल्या भिंतीमध्ये क्रियाकर्म करण्यासाठी एकही हाड सापडले नाही की धीरावतीच्या अंगावरच्या दोनशे तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी गुंजसुद्धा मिळाली नाही. मधल्या बंदिस्त देवघराचे दार अर्धवट जळलेल्या अवस्थेत उघडे होते. थोरल्याने तिथून आत नजर टाकली तेव्हा त्याला जे दृश्य दिसले ते पाहून त्याची वाचाच बंद झाली ! …
भाग ३
...देवखोलीत खाली जमीनच नव्हती ! खोलवर नजर जाईल तिथपर्यंत साकळलेला अंधार ! खाली नजर टाकली तरी भोवऱ्यात फसावे तशी भावना होत होती. खोलवर मध्येच प्रकाशाचा ठिपका दिसे.
मिसळपाव