नाचणी पुट्टू
साहित्य :
१. नाचणी पीठ एक वाटी
२. बारीक कापलेला कांदा
३. बारीक चिरलेला टोम्याटो
४. लाल / हिरव्या मिरच्या
५. तेल व फोडणी साहित्य
६. मीठ
७. फुटाण्याची डाळ
--------------
१. नाचणी पीठात थोडे पाणी शिंपडून दमट करावे . नंतर कुकरच्या एका भांड्यात ठेवून कुकरमधून १०-१५ मिनिटे वाफवून घ्यावे. ( फडक्यात घालून वाफवणे , पुट्टु पात्र , इडली पात्रात वाफवणे असे इतर पर्याय आहेत. )
२. नंतर तेलाची फोडणी करुन त्यात कांदा, टोम्याटो, मिरच्या घालून परतावे. फुटाण्याची डाळ, ओली मूग डाळ , मटार , नारळाचा कीस , गाजर कीस, बीट कीस इ इ घालता येईल.
३. नंतर वाफवलेले पीठ घालून भरपूर परतावे.
गोड पुट्टू
भारी दिसतंय
हा प्रकार पहिल्यांदाच बघतोय.
In reply to हा प्रकार पहिल्यांदाच बघतोय. by एस
यु ट्युब सर्च करा.
छान...!
पौष्टिक पाकॄ... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rasputin... [ with Lyrics ] :- Boney Mहटके पाकृ!!
मकेच्या पिठाचे असेच आई करते.