पिंपळपान
आधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू
मग फुलांनी केलेला अपमान शोधू
दाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची
अन्यथा रामायणात अज्ञान शोधू
सोसेना गलका सभोवती शांततेचा
दूर याहून एक स्थळ सुनसान शोधू
बोलण्या आधीच सुरू होती लढाया
ऐकूनी घेतील असले कान शोधू
प्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन
भंगल्यावर नफा कि नुकसान शोधू
आदेश हा कारागृहे खुली करण्याचा
पळूच ना शकेल तो बंदिवान शोधू
शब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा
थेट मनाला भिडणारे लिखाण शोधू
जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू
शिव्या शाप जरी रोजचेच ठरलेले
नशिबातील एखादे समाधान शोधू
खंत नको कालची वा तमा उद्याची
खुल्या बाहूंनी जगू..
स्वनातीत व्यापारी विमानप्रवास... पुन्हा सुरू होणार !
स्वनातीत (आवाजापेक्षा जास्त म्हणजे सुपर-सॉनिक वेगाने ) उडणारी विमाने ही काही नवीन गोष्ट अजिबात नाही. मात्र, लढाऊ विमानांच्या बाबतीत स्वनातीत वेग ही सामान्य गोष्ट असली तरी व्यापारी तत्त्वावर केल्या गेलेल्या स्वनातीत विमानसेवेच्या (commercial supersonic air-travel) मार्गात सतत मोठमोठे अडथळे येत राहिले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या मनात तर स्वनातीत प्रवास केवळ एक स्वप्न म्हणूनच राहिला आहे.
१९६९ ते २००३ या कालखंडात व्यापारी तत्त्वावर चाललेली पहिली वहिली स्वनातीत काँकॉर्ड विमानसेवा बंद पडून आता १५ वर्षे लोटली आहेत. त्या सेवेला सुरुवातीपासूनच अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासले होते.
नेदरलँड्सची सफर भाग -२
नेदरलँड्सची सफर भाग -२
मुळात युरोप पाहायचा तर सहा दिवसात पाच देश किंवा १० दिवसात दहा देश असे करणे मला पटत नाही. कारण सहा दिवसात महाराष्ट्रसुद्धा बघून होणे अशक्य आहे.
अर्थात बरेच लोक केसरी वीणा सारख्या ट्रॅव्हल सर्व्हीसने जाणे पसंत करतात आणि तसे करण्याची कारणे आहेत आणि आपल्या ठिकाणी ती बरोबरही असतील. एक तर जाण्यायेण्याचा खर्च आणि पासपोर्ट व्हिसा ची आणि लांब विमान प्रवासाची कटकट परत परत नको. दुसरे म्हणजे खाण्यापिण्याचे हाल होत नाहीत. विशेषतः शाकाहारी लोकांचे. शिवाय जिकडे तिकडे प्रेक्षणीय स्थळापर्यंत बसने नेले आणि आणले जाते. पण मला ते पटत नव्हते हे खरं.
सामान्य माणसाचा सिनेमा
सिनेमा म्हटलं की सगळं कसं वेगळ्याच दुनियेतलं दिसू लागतं आणि आपण त्यात रमून जातो.
काही निखळ मनोरंजन म्हणून तर काहीजण स्वतःला रिलेट करता आलं त्यातून म्हणून तर काहीजण सोशल रिऍकशन म्हणून या माध्यमाकडे आकर्षित होत असतात. पण मेड फॉर इच आदर, पराकोटीचा संघर्ष , कुणीतरी शोधलेली वेगळी वाट,शॉकिंग/ सुखासीन/दुःखदायक द एन्ड च्या संकल्पना या खरंतर फक्त सिनेमा साठीच योग्य आहेत अशी माझी ठाम समजूत होऊ लागली आहे.
दोन तासात ज्या गोष्टीचा उरक उरकायचा आहे त्यातल्या घटना कशा धारदार टोकदार आणि वेगवान असतात.
गणु अन गणूची मनू
गणु अन गणूची मनू
लय भारी
गणू गोत्यात येई
मनू जाता माहेरी
मनू जाता येई मंजिरी
गणूची मंजिरी
मनू सारी
गणू नाही पाहिला
गणू नाही राहिला
गणूची येगळीच दुनियादारी
कधी मनू तर कधी मंजिरी
असे हजर सदैव दारी
गणु मग्न तो
गणु भग्न तो
गणु हासतो
गणु नाचतो
मनातल्या मनात
गणु धावतो
गणु पडतो
गणु चालतो
कधी खेळतो
आतल्या आत
गणूची यातना
भेदे मना
खेळ रंगला
खेळ भंगला
गणू संपला
पंचतत्त्वात
सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस
राजयोग - ५
राजयोग - १
राजयोग - २
राजयोग - ३
राजयोग - ४
***
नक्षत्रराय निघून गेल्यानंतर जयसिंह म्हणाला, "गुरुदेव, इतकी भयानक गोष्ट मी आजवर कधी ऐकली नव्हती. तुम्ही मातेच्याच समोर, तिचेच नाव पुढे करून भावाने भावाची हत्या करावी असं षडयंत्र रचताय. इथं उभं राहून मला ते ऐकावं लागतंय."
रघुपती म्हणाले, "मग दुसरा काही उपाय आहे का तुझ्याकडे?
आंजा-टोळ
संवाद हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे मग तो संवाद शब्दाने, स्पर्शाने, लिखित व अन्य कोणत्या का स्वरूपात असेना. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे विचार जाणून घेण्यासाठी संवाद अतिशय महत्वाचा आहे. त्याची सुरवात बालपणापासून होते. बोबडे बोल शिकत हा प्रवास सुरु होतो आणि पुढे शाळेमध्ये अक्षर ओळख होऊन वेगवेगळ्या भाषा लिखित स्वरूपात शिकता येतात. आपला संवाद कुटुंबात, मित्रमंडळीत, समाजामध्ये मुख्यत्वेकरून तोंडी स्वरूपात होत असतो.
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर (६३ किमी)
३: जिंतूर- परतूर (६३ किमी)
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
१२ मे ला पहाटे साडेपाच ला जिंतूरवरून निघालो. रात्री चांगली झोप झाल्यामुळे फ्रेश वाटत आहे. आज ६२ किलोमीटर सायकल चालवायची आहे. माझ्यामुळे जिंतूरला डॉ. पारवेंना पहाटे लवकर उठावं लागलं व मला निरोप द्यायला ते रस्त्यापर्यंत आले. सकाळच्या प्रसन्न वेळेत सायकल चालवणं खूप मोठं सुख आहे! चांगली झोप झाल्यामुळे कालचा थकवा दूर झाला आहे.
मिसळपाव