Skip to main content

चुलीवरचे जेवन...

लेखक मुकेश चौधरी मेळघाट यांनी सोमवार, 16/07/2018 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीवरील जेवणाचा घरगुती आस्वाद.... धकाधकीच्या दैनंदिन जीवनातला आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय खास राहिला. सकाळीच दिपकदादांचा (आमचे पुणे येथील मोठे बंधु) फोन आला. माईंना खास वैदर्भीय खणखणीत डाळभाजी आणि पोळी चुलीवरचं जेवण करायचे आहे म्हणुन. आमच्या माई सौ. सिंधुताई सपकाळ यांना आज अमरावती आल्यावर खास वर्हाडी जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता. मग लागलो तयारीला. सरोज चौकातील रुक्मिणी वल्लभ झुणका भाकर केंद्रात ऑर्डर दिली. माई, दिपकदादा, शामराव दादा, विनय दादा, मी, अधिक्षिका मॅडम, पांडा भाऊ, चालक नितीन दादा, असे आम्ही सर्व एकसाथ जेवायला बसलो.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ६

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 16/07/2018 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

शेती

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/07/2018 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बाजरी, गहू, हरभरा, ऊस, कामोड्या (कापूस), मका, दादर, कांदे आणि काही प्रमाणात भाजीपाला अशी आमची उत्तर महाराष्ट्र वासियांची पारंपरिक शेतातली पिकं होती. जळगाव भागात केळी, नाशिकच्या जवळपास (निफाड, पिंपळगाव बसवंत आदी भागात) द्राक्ष, अशीही त्यातल्यात्यात विभागणी असायची. आमच्या गावात शेताच्या कडेला उभं राहिलं की नजर जाईल तिकडे एकच एक पिक दिसे. खरिपात बाजरी आणि रब्बीत गहू. गावकर्‍यांनी केलेली सामुहीक शेती म्हणजे पाट थळ आणि ज्याची त्याची खाजगी शेती अशा पिकांनी बहरलेली दिसायची. या पिकांना सेंद्रिय खते (लेंडी खत, मेंढी खत, शेण खत, गाळ खत, पुंजं खत, सोन खत, राख आदी) दिली जायची.

४ गोष्टींच्या निमित्ताने!

लेखक लई भारी यांनी रविवार, 15/07/2018 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
'लस्ट स्टोरीज' च टायटल सार्थ असलं तरी मला त्यात मार्केटिंगचा भाग जास्त वाटतो. नेटफ्लिक्स आताशी भारतीय वेब-सेरीज घेऊन येतंय त्यामुळे कितीही आधुनिकतेचा आव आणला तरी ह्या माध्यमाची बलस्थानं(पक्षी: सेन्सॉरमुक्ती) वापरून चांगल्या मालिकांमध्ये सुद्धा 'बिनधास्त' माल भरपूर टाकला आहे. कथेची गरज आहेच म्हणा पण त्यानिमित्ताने प्रसिद्धी पण होतेच. खरतर या मालिकेतल्या छोटेखानी ४ कथा या रूढार्थाने 'कथा' म्हणण्यापेक्षा, त्या पात्रांच्या जीवनातले काही प्रसंग आहेत. सरधोपट शेवट-सुरुवात न करता त्यांच्या जीवनातला एक तुकडा दिग्दर्शकांनी आपल्या समोर मांडला आहे. किमान पहिल्या ३ कथांमध्ये तरी हे अगदी प्रकर्षानं जाणवत.

दोसतार - १४

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 15/07/2018 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा दोसतार -१३ https://www.misalpav.com/node/42919 पुढच्या तास इनमादार सरांचा. ते आल्या आल्या फळा पुसतात. त्यानी फळ्यावरचे चित्र आज तरी पुसू नये म्हणून, वैजयंती , माधुरी, सोनाली , अंजी ,यांनी फळ्या भोवती उभे रहायचे ठरवले. आम्ही पण सरांना फळा पुसू नका म्हणू विनंती करणार आहे. हे सगळं कुणीही न सांगता. न ठरवता. अर्थात इनामदार सरांनी फळा पुसला तरी फरक पाडणार नव्हता. ती कविता आणि फळ्यावराचे चित्र मनात इतके भरून आहे की कुणीच ते पुसू शकणार नाही इनमादार सर वर्गावर येवूच नयेत असे वाटत होते.

तो आणि ती........ कुंती! (भाग ५)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 14/07/2018 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956 तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957 तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969 तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980 तो आणि ती ........ कुंती! "श्रीकृष्णा, तू जरी माझा भाचा असलास तरीही माझ्या आयुष्यातील तुझं स्थान वेगळ्या भावनेने व्यापलेलं आहे.

दोसतार - १४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 14/07/2018 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा दोसतार -१३ https://www.misalpav.com/node/42919
पुढच्या तास इनमादार सरांचा. ते आल्या आल्या फळा पुसतात. त्यानी फळ्यावरचे चित्र आज तरी पुसू नये म्हणून, वैजयंती , माधुरी, सोनाली , अंजी ,यांनी फळ्या भोवती उभे रहायचे ठरवले. आम्ही पण सरांना फळा पुसू नका म्हणू विनंती करणार आहे. हे सगळं कुणीही न सांगता. न ठरवता. अर्थात इनामदार सरांनी फळा पुसला तरी फरक पाडणार नव्हता. ती कविता आणि फळ्यावराचे चित्र मनात इतके भरून आहे की कुणीच ते पुसू शकणार नाही
इनमादार सर वर्गावर येवूच नयेत असे वाटत होते.

कल्पनेतील चव!

लेखक लई भारी यांनी शनिवार, 14/07/2018 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
'सेक्रेड गेम्स' खूप चर्चेत असली तरी मला खूप शिवराळ भाषा आणि विनाकारण असलेली काही दृश्ये यामुळे इतकी आवडली नाही. त्यात आपली जुनाट बॉलीवूडी विचारसरणी असल्यामुळे एका सीझन मध्ये सगळी गोष्ट संपली नाही की झेपत नाही! :) बाकी अभिनय, कथासूत्र, निर्मितीमूल्य वगैरे उत्तम आहेच. असो, तर लिहिण्याचा मुद्दा म्हणजे एक आवडलेला प्रसंग. एका प्रसंगात नवाजुद्दीन आपल्या बायको ला घेऊन बाहेर जेवायला जातो. महाराष्ट्रीयन थाळी असणारंच ठिकाण असत पण तिला ते सगळं नवीन असतं. जेवताना तिचा संकोच दिसतो. शेवटी 'खरवस' येतो स्वीट-डिश म्हणून. तिला आग्रह करतो आणि सांगतो कि छान असतं खा.

हिमा दास, फीलिंग प्राऊड आणि मनातले काही !!!!

लेखक रुस्तुम यांनी शनिवार, 14/07/2018 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
हिमा दास, फीलिंग प्राऊड आणि मनातले काही !!!! हिमा दासने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्ण पटकावलं आणि माझ्या बकेट लिस्ट मधील एका गोष्टीवर अर्धी टिक आली (अर्धीच म्हणतोय कारण पूर्ण ऑलिम्पिक सुवर्ण पदकानंतरच होईल. तसे अभिनव बिंद्राने सुवर्ण जिंकलेले पण ते पाहण्यात नव्हते आले फक्त वाचण्यात आले होते). तशी ही गोष्ट बुकेत लिस्ट वर अचानकच आली म्हणजे २०१६ मधील ऑलिम्पिक बघताना. बरेचसे इंग्लिश शब्द/वाक्य आपण अगदी सहजगत्या त्या शब्द/वाक्यांमागच्या भावनेचा विचार न करता फेकत (पक्षी:वापरत) असतो जसे की सॉरी, थँक यू आणि असेच.. त्याच पठडीतले एक वाक्य म्हणजे "U make us feel proud/feeling proud".

चवथी कथा - नर्गिस नजर..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/07/2018 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire कथा पहिली - "कुलसूम ज़मानी बेगम...." दुसरी कथा - गुलबानो कथा तिसरी - शहजादी

नर्गिस नजर

मिर्जा शाह रुख, बहादूर शाहच्या एका मुलाचे नाव होते.