Skip to main content

घर एक बोध कथा

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 17/07/2018 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
(आस्था वाहिनी वर एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचा विस्तार) एका गावात एक घर होते. घरात आत शिरायला फक्त एक छोटासा दरवाजा होता. तो हि सदैव जाड काळ्या कपड्याने झाकलेला. त्या घरातील लोक रोज सूर्य उगवल्यावर छोट्याश्या दरवाज्यातून हातात एक बादली घेऊन बाहेर यायची. हाताने बादलीत काही तरी भरायचे नाटक करायची आणि घरात जायची. हा प्रकार कित्येक तास चालत असे. लोकांना त्यांच्या या वागण्याचे आश्चर्य वाटायचे. हळू हळू हि वार्ता त्या राज्याच्या राजाच्या कानावर पडली. सत्य पडताळण्यासाठी एक दिवस राजा मंत्री सोबत भल्या पहाटे त्या घरासोमोर येऊन ठाकला.

मैत्र..

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 17/07/2018 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी अचानक काहीच न कळवता आपण मित्राच्या घरी धडकावं. त्याने दरवाजा उघडताच त्याला बाजूला सारून आत शिरावं. चपला पर्स फेकून खिडकीजवळच्या मऊ गुबगुबीत माऊसारख्या खुर्चीवर धप्पकन बसावं. आपलं अगडबंब वाढलेलं वजन, परीटघडीच्या ड्रेसला पडणा-या चुन्या, खांद्यावरून डोकावत असलेला किंवा नसलेला चुकार पट्टा कसला कसला विचार मनात येऊ देऊ नये तेव्हा. "तुझीच आठवण काढली होती मी आज बघ डेविलिणबाई" म्हणत हसत त्यानं ग्लुकोज बिस्किटं आणि पाण्याचा ग्लास पुढे करावा. खरंतर मनात खुश होत पण वरवर "चल् काहीही खोटं" म्हणत त्याला उडवून लावावं. अगं हो, तुझ्या आवडीची शेवळाची भाजी केलेली हिने तेव्हा तुझी आठवण आलेली.

तथाकथीत पिंकारू पुरोगाम्यांचा नंबर पह्यला !

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 17/07/2018 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
Indian secularism is not only in danger because of those who attack it, but also because of some of those who claim that they are for it........... It matters to them only when it suits them - the contrary of value based politics or ideology. संदर्भ
मला एक जुनी घटना आठवतीए , ज्यात पाहुण्यांच्या मुलाची आणि घरातल्या मुलाची छोटीशी झटापट झाली, ज्यात पाहुण्यांच्या मुलाची बाजू चूक असूनही त्याला न समजावता मी घरातल्या मुलाची समजूत काढत होतो.

आज हलके वाटले तर

लेखक कहर यांनी मंगळवार, 17/07/2018 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज हलके वाटले तर चांदण्या तोलून धर बोल.. पण नयनातुनी उघडू नको देऊ अधर उजळुनी हे विश्व अवघे सावरिशी का पदर होऊ दे गलका उसासा मोकळे कर मूक स्वर जीव घे हासून हलके ओठ हेच धनु नि शर ने कुशीतून कालडोही गुदमरूदे रात्रभर बरस आता अंतरातुनी हो पुरी सारी कसर व्यापूनिया ये तमासम गात्र गात्र नि शांत कर चांदण्या तोलून धर

पुन्हा नव्याने..

लेखक उमेश मुरुमकार यांनी मंगळवार, 17/07/2018 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच रात्री जातात तुला आठवत आठवत.. आणि बसतो त्या बेहिशिबि अश्रूंना साठवत.. हिशोब करतो त्याच बेहिशिबि रात्रींचा ज्या तुला कधी तरी मिठीत घेतल्याची जाणीव ... करून देतात .. तू मांडलेल्या प्रस्तावाचा विचारदेखील केला कि पुन्हा नव्याने एक सुरुवात करू पण अजूनही हृदयाचे ठोके वाढत बसतात परत त्याच विचारात कि शेवट देखील पदरी येईलच पुन्हा नव्याने.. रुद्र (उमेश)

जफर पनाही : लव्ह लेटर टू द सिनेमा (उत्तरार्ध )

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 17/07/2018 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० मध्ये अचानक जफर पनाहीच्या अटकेची बातमी जगासमोर आली. जगातल्या जवळपास सगळ्या देशांमधून या अटकेच्या निषेधात सूर उमटला. पण इराणीयन सरकार ठाम होतं. जफरवर सरकारविरोधात जनमत भडकवण्याचा ठपका ठेवला गेला होता. एका अर्थाने तो देशद्रोहच होता. त्यांना ६ वर्षांची कैद झाली. कैदेवर भागलं नाहीच तर पुढची किमान वीस वर्ष त्यांच्यावर चित्रपट बनवण्यापासून, लिखाण करण्यापासून , आपली मतं-विचार सार्वजनिकरित्या व्यक्त करण्यापासून आणि देश सोडण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलं. जफरनी असं काय केलं होतं कि त्यांच्याच मातृभूमीतलं सरकार त्यांना अशी सजा देत होतं ?

एक होता भारतीय स्पायडर मॅन...

लेखक मुकेश चौधरी मेळघाट यांनी मंगळवार, 17/07/2018 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता भारतीय स्पायडर मॅन... अमरावती, दि. १४ - मध्य भारतातील सातपुडा पर्वत म्हटले की इथल्या वाघांची व व्याघ्र प्रकल्पांची चर्चा होते. परंतु सातपुडा पर्वतरांगेतील या व्याघ्र प्रकल्पांनी वाघांशिवाय रानपिंगळा, पिसोरी (माऊस डिअर), कॅरॅकल, चांदी अस्वल, महासीर मासा व कोळ्यांसारख्या दुर्मिळ प्रजातींचेही संवर्धन केले आहे.

राजस्थान भटकंतीत

लेखक मॅक यांनी मंगळवार, 17/07/2018 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
मला डिसेंबर 2018 मध्ये राजस्थान मध्ये 6 ये 7 दिवस पर्यटनासाठी जायचे आहे... मी कोणत्याही टूर पॅकेज मधून न जाता स्वतः नियोजन करून जायचं ठरवलं आहे. आम्ही 8 प्रौढ आणि 5 लहान मुले आहोत.... तरी राजस्थान बाबत माहिती आणि नियोजन बाबत जाणकारांकडून माहितीची अपेक्षा आहे.... कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.....

तो आणि ती...... द्रौपदी! (भाग ६)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 16/07/2018 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956 तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957 तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969 तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980 तो आणि ती........ कुंती!: https://www.misalpav.com/node/42995 तो आणि ती .......