स्पर्श ...तसाही आणि असाही ..
स्पर्श ...तसाही आणि असाही ..
मी परत एकदा बँकेच्या पासबुकात निरखून बघितलं . फाईल मधल्या सगळ्या ठेवींच्या नोंदी बघितल्या.परत एकदा कागदावर केलेली आकडेमोड तपासून बघितली. पुढच्या तीन महिन्यांचे होणारे खर्च आईकडून तपासून घेतले. मला आपला रक्तदाब एकदम वाढलाय कि काय असे वाटायला लागले. हृदयातील धडधड एकदम मला स्वतःलाच एकू यायला लागली आहे ,असे वाटायला लागले. .... गेले २/३ तास माझा आणि माझ्या आईचा प्रयत्न चालला होता कि महिन्याचा खर्च कमी कसा करता येईल?दुधाचे बिल,वाण्याचे सामान,वीज ,बस चा खर्च,मोबाईल चे बिल,सोसायटी चार्जेस , पेट्रोल चा खर्च सगळे विचारात घेतले होते.
मिसळपाव