Skip to main content

व्हाॅट्स अॅप संन्यास

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 28/07/2018 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो" "तुझे posts फार होताहेत, ते गाणं ग्रुपवरुन delit कर" "बर,लगेच करतो" आम्ही तात्काळ ग्रुप्स exit व WA forced stop केले" मौनातच संयमीत उद्रेक झाला... व्हाॅट्स अॅप संन्यास बरे झाले देवा, WA सोडविला, पाश तोडविला, आंतर्जाल । अपुलेच सांगती पोस्ट तुझे फार, त्यांना होतो भार, नेटपॅक। कसे हे आले, आम्हावरी बंधन म्हणे करा लंघन, थोडा वेळ। आम्हावरी सेंसाॅर, इतकेच खोकणे, तितकेच पादणे ते नै होणे आम्हा चिये। आम्हा घरी आहे, शब्दांचेच धन, त्यावरी राशन? नामंजूर । आम्हा ठावे करावे सदा प्रेम बेदम, असो बातों मे दम, सर्वकाळ। अजून नाही काही, दिल का फूल मूर्झा, वळवू ही उर्जा, दूसरी कडे सध्या तरी घेतला,
काव्यरस

अंभईचे वाडेश्वर मंदिर आणि घटोत्कच लेणी ( Wadeshwar Temple, Ghatotkach Cave )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 27/07/2018 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
खानदेशाच्या भटकंतीनंतर या भागापासून आपल्याला मराठवाड्याची सफर करायची आहे. अपवाद सोडला तर माझे मराठवाड्यातील बहुतेक भुईकोट पाहून झालेले आहेत, त्यामुळे पुढचे काही महिने तरी या संतांच्या भुमीचीच ओळख करुन घ्यायची आहे. कमी पावसाचा भाग असल्याने आणि कडाक्याच्या उन्हामुळे सरत्या पावसाळ्यात आणि मुख्यतः थंडीमधे इथली भ्रमंती सुसह्य ठरते. औरंगाबाद ( संभाजीनगर ) जिल्ह्यातील लेणी, तीन ज्योर्तिलिंगा, दोन शक्तिपीठांसहित बरीच मंदिरे आणि देवगिरी, माहुरसारखे तुरळक डोंगरी किल्ले सोड्ले तर उत्तमोत्तम भुईकोट असलेल्या मराठवाड्याची भटकंती खुप काही नवीन देउन जाते.

पीसीओडी

लेखक Shantanu Abhyankar यांनी शुक्रवार, 27/07/2018 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
पीसीओडी पीसीओडी (PCOD) ही भानगड काय आहे? आजकाल हे पीसीओडी, पीसीओडी फार ऐकू येते. पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डीसीज. शब्दशः अर्थ, स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजेच बीजे दिसणे. संप्रेरकातील घोटाळ्यामुळे उदभवणारा हा एक आजार आहे. यात स्त्रियांच्या शरीरात पुरुषरसांचे (Androgens) प्रमाण वाढते. परिणामी स्त्रीबीजनिर्मिती महिन्याच्या महिन्याला होण्याऐवजी, अधून मधून व्हायला लागते. सोनोग्राफी केली, तर स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजांची रेलचेल दिसू लागते. खूप बायकांना असतो हा विकार. दर विसात एखाददुसरीला. प्रत्येकीला त्रास होतोच, असेही नाही. बरेचदा काही सुद्धा होत नाही.

तामीळनाडू आणि गूगल ट्रेंड

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 27/07/2018 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
करुणानिधींच्या तब्ब्येती बद्दलची बातमी पहात होतो. त्यांच्या लोकप्रीयतेची सद्य स्थिती पहावी म्हणून गूगल ट्रेंड उघडले. तमीळनाडू मधील सध्याचे (गेल्या १२ महिन्यातले) गूगल ट्रेंड्स तपासले तर काही निकाल जरा अनपेक्षीत वाटले. * तामीळ भाषा आणि त्या खालोखाल तामीळ नाडू हे शब्द सर्वाधीक शोधले जातात हे ओघाने आले. * तामीळनाडूच्या नेते मंडळीत सध्या हयात मध्ये केवळ रजनीकांत ही रजनीकांत आहे. डिएमके चे करुणानिधी त्यांचे सुपूत्र स्टालीन ,ए आय ए डिएम के चे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, राहुल गांधी, पि.

ईंडस्ट्रियल व्यवस्थापन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/07/2018 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
ईंडस्ट्रियल व्यवस्थापनाच्या वर्गात विद्यार्थी असताना ऐकलेली एक गोष्ट शेअर करत आहे. ............................ एकदा मानवाच्या सर्व अवयवांची सभा भरली व प्रत्येक जण आपापल्या कामाची यादी देत कौतुक करुन घेत होते... हात म्हणाले "माझे काम खुप महत्वाचे आहे मी नसेल तर माणुस काम करु शकणार नाहि स्वताचे रक्षण करु शकणार नाहि..माझ्या शिवाय मानवाचे जिवन त्याला असह्य होईल." पाय म्हणाले" मी म्हणजे वेग..मानवाला इच्छित स्थळी पोहोचवणे वेळप्रसंगी संघर्षात त्याला मदत करणे माझे काम..." . मेंदु म्हणाला मित्रानो माझे काम सर्वात महत्वाचे आहे..मी सुचना देतो...तुम्हा सर्वाना कसे काम व काय काम करावे याच्या सुचना देतो..

पहिले मी जेव्हा तुला ( भाग ५ )

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 26/07/2018 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
" अरे काय यार तुम्ही पण पब्लिकमधे किसिंग करता त्याने आमच्या bf ला चेव येतो . pic त्याने मला पाठवला होता अँड आस्किंग फॉर सेम फ्रॉम मी . यार तुम्ही लोक जाम ऑकवर्ड करता . " विशाखा त्याच्यावर चांगलीच चिडली होती . तो खरंतर तिच्याकडून काय माहिती मिळतेय का ते विचारण्यासाठी गेला होता . पण तिचा सगळा राग त्याच्यावर निघत होता . " सॉरी " त्याला आता पर्यायच नव्हता . " क्या सॉरी " ती काही शांत होत नव्हती . " बाय द वे तुझा bf कोण आहे ? " त्याने तशा परिस्थितीही विचारलं . आता मात्र तिला चांगलाच राग आला . आणि ती तो त्याच्यावर काढू लागली . " का त्याला तू किस करणार आहेस ?

दोन रुपक कविता

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 26/07/2018 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
छत्री ती रोज सोसते घोंघावनाऱ्या वाऱ्याचा मारा ती हसत झेलते बरसनाऱ्या पावसाच्या धारा कधीही, कुठेही, मी तिचीच मदत घेतो एका झटक्यात घरात मात्र माझ्या मी तिला ठेवतो दूर एका कोपऱ्यात माती तो गडगडतो, आवाज करतो म्हणून मग मी घाबरतो ती कडकडते, चमकते, म्हणून मी घरात लपून बसतो ती देते हिरवळ, ती देते गंध, ती घेते मला कुशीत पण साधा चिखल झाला म्हणून मी तिला लाथाडतो
काव्यरस

All You Need To Know About Online Piracy

लेखक Saketh4005 यांनी गुरुवार, 26/07/2018 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
Online piracy the name which is making a hell lot of money for some of those who are illegally publishing the movies on the sites. Online movie piracy is killing the film industry and is making money for them which they are earning in a huge amount. Earlier in those days when the usage of the internet is only limited to the top cities, they used to make the piracy in the form of CD's and DVD's it would be easy for the film production house to take the necessary actions.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ८

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 26/07/2018 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

‘इ’ जीवनसत्व : जरा ‘इ’कडेही लक्ष द्या !

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 26/07/2018 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
वैद्यकाच्या इतिहासात जीवनसत्वांचे शोध क्रमाने लागत असताना १९२२मध्ये ‘इ’चा क्रमांक लागला. सुरवातीस ते निरोगी प्रजोत्पादनास आवश्यक असावे असा तर्क होता. नंतर ‘इ’ हे एकच रसायन नसून ८ रसायनांचे एकत्र कुटुंब आहे असे लक्षात आले. तरीसुद्धा त्याचे शरीरातील नक्की कार्य समजत नव्हते. त्यावेळेपर्यंत अ, ब, क आणि ड या जीवनसत्वांचे कार्य व्यवस्थित समजले होते आणि त्यांच्या अभावाने होणारे विशिष्ट आजारही प्रस्थापित झाले होते. ‘इ’च्या अभावाचा विशिष्ट आजार मात्र संशोधकांना जंग जंग पछाडूनही सापडत नव्हता.