अनवट किल्ले ३९ : सुतोंडा ,नायगावचा किल्ला (Sutonda, Naygaon Fort )
गड, किल्ले हि लष्करी ठाणी असल्याने, सहाजिकच इथे मोठ्या प्रमाणात शिबंदी असते. या सैनिकांना नित्यवापरासाठी पाणी असावे यासाठी पाण्याची टाकी, हौद बांधलेले असतात. साधारण किल्ल्याच्या आकारमानावर हा पाण्याचा साठा किती असावा ते ठरते. मात्र अतिशय छोटेखानी आकार असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असणारा अनोखा किल्ला म्हणजे, "सुतोंडा". याच गडाला साईतेंडा, वाडीसुतोंडा किल्ला, नायगांव किल्ला, वाडी किल्ला अशी विविध नावे आहेत.
मिसळपाव