Catharsis - 1 घालमेल
तर आडवी आली ती जात.
म्हणजे कसं, तो एक राजा नाही का जो जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरी असं सगळ्यांना वाटत असतं? तस्साच attitude . पण इथे झाला घात.
सोयी-सुविधांनी सज्ज असं समुद्रा - काठचं राज्य. त्यात गाई गुरं , कुत्रे मांजरं , असलेलं , हसतं खेळतं घर. अश्या घरावर स्वारी केली आंतरजातीय विवाहाने.
मग राजे लढले.
लढाईच्या गोष्टी तेवढ्याच मधुर असतात हं , बाकी सगळं कडू.
म्हणजे कल्पना करा , तुम्ही ज्या मुलांना कष्टाने वाढवलं , आपल्या पायावर उभं राहायला शिकवलं , ती मुलं चक्क त्या ज्ञानाचा वापर करू लागली ? काय ते संकट. निर्णय काय घेतात, तार्किक उत्तरं काय देतात ....
मिसळपाव