राजांचे मावळे (ई.स.२२२२) - १
पंढरपूर
इसवी सन २२२२ , महिना आषाढ, दिवस एकादशीचा.
दोनशे वर्षांपूर्वी पंढरपूर कसं होत काय माहित, आज विठ्ठल मंदिराचे भग्नावशेष राहिले होते. विठ्ठल अजून गाभाऱ्यात होता पण रखुमाई नव्हती. विठ्ठल जणू काळाच्या माऱ्याने दमून मागे टेकला होता. वरच्या छताला तात्पुरता आधार दिला होता. त्यात एक फट राहिली होती जिच्यातून वाऱ्याची झुळूक खाली येत होती. बलदंडाने हात जोडले आणि त्या टेकलेल्या विठ्ठलाला झुकून नमस्कार केला. याच माऊली समोर हजारो लाखो वारकरी नतमस्तक व्हायचे आणि वाट चुकलेले योग्य दिशेला लागायचे.
मिसळपाव