Skip to main content

तीट

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 13/05/2025 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
ओथंबल्या नभाखाली भारलेली हवा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सैरभैर थवा गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा, "दृष्टावल्या भवताला काळी तीट लावा "

आजीच्या घरातली गंमत

लेखक लाल गेंडा यांनी मंगळवार, 13/05/2025 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक चिमणी, दोन चिमणी, तीन चिमण्या आल्या दारी, पटापटा चोचीमध्ये, धान्य घेऊन गेल्या घरी ।। आजी म्हणाली चिमणी बाई, आज का ग तुझी घाई ?, चिमणी म्हणाली टाकून दाणा, आज जायचयं एका लग्नाला ।। घरी जाते, नाश्ता करते, घालते पोरांना ही जेवायला, पोरांची नाटकं रोज नवी, कशी पुरवावी सांगा मजला? ।। आजी म्हणाली खरंए बाई, खाण्याची नाटकं नवी नाही, तुला उद्या देईन पोळी पोरांना दे करून गोळी ।। तिकडून आली आजीची नात, रोजचं नवं गाणं गात, आश्चर्याने आजीला म्हणते कशी, चिमणीची भाषा कळते कशी?
काव्यरस

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 13/05/2025 02:43 या दिवशी प्रकाशित केले.

वायुसेनेतील आठवणी – कॉपल पांडे

प्रस्तावना कॉर्पल पांडे — ह्या नावामागे केवळ एक वायुसैनिक नव्हे, तर एक सच्चा देशभक्त, एक कवी मनाचा चित्रकार, माणुसकीची जाण असलेला निष्ठावान कार्यकर्ता, अशी एकात एक व्यक्तिमत्त्वे लपलेला जीनियस आहे. माझ्या हवाई दलातील काळात मदतीचा हात मागितला. दिलेल्या मदतीचे त्याने सोने केले. त्यांच्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत.

मनी छंद गुलकंद

लेखक विअर्ड विक्स यांनी सोमवार, 12/05/2025 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट नुकताच १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ढवळे आणि माने या दोन्ही कुटुंबांच्या धमाल प्रेमकहाण्या रंगवण्यात आल्या आहेत. गोष्ट अशी आहे की, ढवळे घराण्यात सई ताम्हणकर (नीता) आणि समीर चौघुले (मकरंद) हे दांपत्य सुखात राहत असून त्यांची मुलगी मीनाक्षी (जुई भागवत) आहे. माने घराण्यात प्रसाद ओक (गिरीश) आणि ईशा डे (रागिणी) हे दुसरे जोडपं असून त्यांचा मुलगा ओंकार (तेजस राऊत) आहे. मीनाक्षी आणि ओंकार यांच्या प्रेमातून दोन्ही घरांची लग्न तयारी सजते; पण लग्नाच्या पहिल्या सोहळ्यात एक धक्का बसतो – प्रसाद आणि सई हे भूतकाळातले प्रेमी होते!

The Killers

लेखक भागो यांनी सोमवार, 12/05/2025 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
“The Killers” ही अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी १९२७ साली लिहिलेली एक गाजलेली प्रसिद्ध कथा आहे. हेमिंग्वेशी माझी पहिली मुठभेड झाली ती “फेअरवेल टू आर्म्स” च्या मराठी भाषांतराच्या वाचनाने. माझ्या आठवणीप्रमाणे हे USIS प्रणीत पुस्तक होते. ते वाचल्यावर अस्पष्टशी जाणीव झाली की अरे हे काहीतरी अपूर्व पुस्तक आहे. माझ्या तोडक्या मराठी वाचनात असे काही वाचले नव्हते. इंग्रजीची केवळ अक्षर ओळख झाली होती. इंग्रजी वाचन करणे खूप दूरची गोष्ट होती. पुढे कधीतरी महाराष्ट्राचा संबंध तुटला. सगळ्या देशात भटकंती सुरु झाली. वाचन केवळ टेक्निकल गोष्टीपुरते मर्यादित झाले. हेमिंग्वे विस्मरणात गेला.

(ढू आय डी)

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 11/05/2025 06:40 या दिवशी प्रकाशित केले.
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.

समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/05/2025 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते! नऊ दशकांचा प्रवास केलेली माझी आजी- सौ. स्नेहप्रभा नारायणराव वेलणकर. जिचे तीन भाऊ दुसर्‍या महायुद्धात युरोप व आफ्रिकेत लढले होते! जिने इंग्रजांपासून अँड्रॉईडपर्यंतचा काळ बघितला!

माध्यमांची आरडाओरड

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 09/05/2025 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग... एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे? त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला. आपात्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण भारतीय नागरिक कसा बेपर्वा किंवा मठ्ठपणे वागतो, हे सर्वांनी करोना काळात बघितले.

अलविदा हिट्मॅन

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 08/05/2025 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी, हातात चहाचा कप आणि समोर मोबाईल. नेहमीसारखं क्रिकबझ उघडलं आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना — “रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त.” hitman थांबा जरा. रोहित शर्मा? हिटमॅन? ज्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडायचा, तो आता कसोटीच्या पांढऱ्या जर्सीला रामराम करतोय? क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी ही कला आहे, आणि रोहित म्हणजे त्या कलेचा एक लाडका चित्रकार.

हा सूर्य आणि......

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 08/05/2025 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा अर्जुनाने जयद्रथाला मारायची प्रतिज्ञा केली तेव्हा कृष्णाला काय वाटले असेल?? --- कृष्णाने शिबीरात रथ आणला आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. काहीतरी विपरीत घडले होते. आज अर्जुनाला संशप्तकांनी फारच गुंतवून ठेवले होते. संख्येच्या बळावर आणि विवीध रथीच्या निपुणतेवर आजचा दिवस अर्जुनाला बांधून ठेवण्यात संशप्तक सफल झाले होते. युधिष्ठीराला फसवून चक्रव्युहात आणून, युद्ध संपवायचा डाव होता हे कृष्णाला कळले होते. तो डाव कळल्यावर लगेच दूत युधिष्ठीराकडे पाठवून त्याने सावधही केले होते. "मग आज कोण वीरगतीला प्राप्त झाला?" प्रश्न मोठा होत होता.