Skip to main content

आताशा मी ग्लास रिकामे मदिरेचे करतो

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 23/09/2007 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर हे विडंबन आधी प्रकाशित झालेआहे. आमची प्रेरणा संदीप खरे यांची अप्रतिम कविता आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो. जाग नको मज कसलीही अन् ताप नको आहे जाणीव कुठली?

या तुम नहीं या हम नहीं

लेखक पंकज यांनी रविवार, 23/09/2007 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
यारो सितम अब ना सहो खोलो जुबाँ चूप ना रहो फिरकापरस्तों से कहो करते रहो मश्के-सितम हम ने भी खायी है कसम या तुम नहीं या हम नहीं माना फुजूं है हौसला ये जंग का है मरहल्ला आसाँ नही है फैसला इतना तो होगा कम से कम या तुम नहीं या हम नहीं रुत अश्क बारी की गयी अब शोला बारी चाहिये हर हमला भारी चाहिये हर जर्ब कारी चाहिये सर हो के तलवार खम या तुम नहीं या हम नहीं तुम हो हिसार अंदर हिसार और अपनी सफ में इतशाद है खेल अभी जीत-हार हम को भी होने दो बहम या तुम नहीं या हम नहीं -कैफ़ी आज़मी सदर कविता ही उर्दू असून तिचा आस्वाद येथील वाचकांनादेखील घेता यावा या हेतूने इथे देत आहे.
Taxonomy upgrade extras

इ गप्पा

लेखक कौटील्य यांनी रविवार, 23/09/2007 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी ओरकुठ सारखे मराठी संकेतस्थळ बनवायचे या उद्देशाने egappa.com हे डोमेन नाव संरक्षित केले होते. काही अपरिहार्य कारणामुळे किंवा कार्यबाहुल्यामुळे मी ते विकसित करु शकत नाही. हे डोमेन नाव वापरुन कुणास काही करावयाचे असल्यास संपर्क साधावा.

प्रार्थना.

लेखक अशोक गोडबोले यांनी रविवार, 23/09/2007 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत भाषेत या चार ओळी सुचल्या त्या इथे देत आहे.
-- प्रार्थना -- द्वंद्वातीतं त्रिगुणातीतम् प्रतिपाषाणे महेशरूपम् II धृ II नाहं जाने माया भेदम् हरे मुंचमाम् भवजलमीनम् II १ II मतिमंदोऽहं अघपथगामी मुक्तिवरं मे देहि स्वामी II २ II विगतवारिजं मानसविमलम् मुनिजनमानसहंसविहीनम् II ३ II शिवपदारविन्दे मनशरणम् प्रभो प्रभोदय चंचलभृंगम् II ४ II -- अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

पुनश्च ह्या गंगेमधि - भाग ०

लेखक जगन्नाथ यांनी रविवार, 23/09/2007 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्या गंगेमधि" ही कविता थोडीफार बुचकळ्यात पाडणारी आहे असा अनुभव आहे. म्हणजे तिचा शेवट जो केला आहे तो पटत नाही. मग कोणकोण "एक सौंदर्यानुभव" म्हणून पुढे चौकशी करूच नये असे म्हणतात. तेही पटत नाही. आळशी असल्यामुळे मी ती सोडूनच दिली होती. पण अनेक वर्षांनी एक वेगळा विचार मनात आला. तो असा की बुद्धाचा स्पष्ट उल्लेख असून आपण "त्या" दृष्टीने कधी वाचलीच नाही. तसे कोणी केलेही असेल, पण मला ते माहीत नाही. जमेल तितपत स्वतःच करायला काय हरकत आहे? म्हणून इथे सुरुवात केली आहे. मर्ढेकरांच्या जीवनाबद्दलही मला विशेष अशी माहिती नाही.

एकमेकांसाठी (दुसरी आवृत्ती)

लेखक धनंजय यांनी रविवार, 23/09/2007 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
(दुसरे संस्करण ) आज माझ्या कडेवर तुला सांभाळतो, बाळ राजा... उद्या तुझ्या कडेशी तुला साथ देतो, बाळा माझ्या... कधी येईन कडेला, मला टेकू देतोस? माझ्या राजा... ****************** (पहिले संस्करण मुद्दामून इथेच ठेवतो आहे. पुढे पुन्हा संपादन करून काढून टाकीन.) धरितो तुज माझ्या बाहूंत बाळ राजा रक्षितो, जगी पीडा बहूत बाळ राजा झुंजतोस तू भवजलौघे बाळा माझ्या कडेला ये तू विसावा घे बाळा माझ्या क्लांत जधी मी शांत तू करी माझ्या राजा शक्ती दे तू, धीर मी धरी माझ्या राजा *******************

एक रात्र..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 22/09/2007 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. एक धुंद रात्र सख्या मी होते बावरी सय तुझी ही दाटलेली या माझ्या अंतरी मूक भावनांचा खेळ किती खेळावा परी काळजातली हुरहूर तुझ्या दाटली माझिया उरी आतुरलेले क्षण सारे साद घालिती तुझे नेत्र प्रणयातूर जाहले मी सर्वत्र तुझेच गात्र धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... - प्राजु.
Taxonomy upgrade extras

भटकंती व खादाडी २

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 22/09/2007 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ वरून पुढे सुरू... मंडळी, ही पाहा आमच्या जाफरभाईच्या फॉकलंड रोडवरील (सध्याचे नांव पठ्ठे बापुराव मार्ग) हॉटेल दिल्ली दरबारमधली मटण बिर्याणी! चवीला खूप छान असते. सोबत सायीच्या दह्यातली कांद्याची कोशिंबीरपण मिळते. दिल्लीदरबारची ही बिर्याणी मुंबईत खूपच प्रसिद्ध आहे. आवडत्या स्त्री सोबत दोन छानसे ग्लेन फिडिचचे पेग मारावेत आणि त्यानंतर ही बिर्याणी खावी असं मला बर्‍याचदा वाटतं आणि काही काही वेळा माझी ही इच्छा पूर्ण होते!

मला आवडणारे आंतरजालावरील असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखक

लेखक सहज यांनी शुक्रवार, 21/09/2007 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपट किबोर्ड, उठू दे अक्षरे, दाब बटणे, दीपव डोळे, कीटव कान, जाळ ती बॅन्डवीड्थ अश्या अतीप्रगत आंतरजालाच्या ऋतूमधे प्रतिभेच्या अगणीत छत्र्या (पावसाळ्यात नाही का ते एका प्रकारचे मश्रूम) न उघडतील तर नवलच. कोणी काहीही लिहले तरी ते कूठल्या न कूठल्या एका तरी साहीत्यप्रकारात फीट होतेच नाही का.