Skip to main content

खरी मजा आली ती तोडल्यावर!

लेखक गुंडोपंत यांनी रविवार, 21/10/2007 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे, नियमांविषयी! त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले. मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम. कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच! मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे. मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली. मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम! १.

....जाऊ दे मला !

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 20/10/2007 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्या जाऊ दे मला या नितांत सुंदर गजलेचे विडंबन. श्री. प्रदीप कुलकर्णी हे अत्यंत प्रतिभावान गझलकार . आम्ही त्यांच्या गझलांचे चाहते. त्यांची जाऊ दे मला ! ही गझल वाचताच आमच्यातला दिड वर्ष सुस्तावलेला गझलकार खडबडून जागा झाला. आणि हे औधत्य आमच्या हातून घडले. सोड माझा हात... जाऊ दे मला ! मी जरी वाह्यात... जाऊ दे मला ! बायको रागावते हल्ली सखे फार झाली रात... जाऊ दे मला ! भेटण्याआधी तिला थुंकून द्या तोबरा तोंडात... जाऊ दे मला ! जेन्ट्स की लेडीज हे सांगू नका वाजताहे वात...
Taxonomy upgrade extras

लंपन, वानरांच्या फौजा आणि थोडं पाल्हाळ

लेखक नंदन यांनी शुक्रवार, 19/10/2007 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही फायदा होतो म्हणून वाचन करु नये, हे जरी खरं असलं तरी त्यातून वेगवेगळे अनुभव आपण लेखकाच्या दृष्टीतून घेऊ शकतो. नाहीतर एका आयुष्यात असे घेऊन घेऊन अनुभव तरी किती घेणार? बसल्याजागी वेगवेगळे अनुभव - व्हिकॅरियसली म्हणजे दुसऱ्याच्या उसन्या दृष्टीतून का होईना, आपण पुस्तकाच्या वाचनातून घेऊ शकतो. 'का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता', असं कमलिनीबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटलंय तसंच काहीसं. अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. त्या त्या व्यक्तीच्या पिंडावरती ते अवलंबून.

अखंड तेजीची नको करू कामना - चंद्रशेखर चितळे

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 19/10/2007 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
दैनिक सकाळ - १९ आक्टोबर २००७
अखंड तेजीची नको करू कामना ।।
(चंद्रशेखर चितळे) एक आटपाट नगर होते. तेथे प्रजा आनंदाने राहत होती. उद्योजक, व्यावसायिक, सेवा पुरवठादार, नोकरदार... अशी सर्व प्रकारची जनता तेथे होती. तेथे अन्य प्राणी देखील वास्तव्यास होते. गाई-म्हशी, कुत्रे-मांजर पोपट-चिमण्या... आदी सारे होते. डुकरांची जमातसुद्धा होती. संक्रांतीचा मुहूर्त साधून एका फिरंगी व्यावसायिकाने आटपाट नगरामध्ये टोप्या विकावयाचे दुकान टाकले. सुरवातीच्या कुतुहलामुळे दुकानामध्ये गर्दी जमली आणि हळूहळू साधारण व्यवसाय होऊ लागला.

उद्याच्या बाजाराबाबत

लेखक धोंडोपंत यांनी गुरुवार, 18/10/2007 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, अपेक्षेप्रमाणे शेअरबाजार खाली आला आहे. काल दुपारी झालेल्या पुलबॅक वर भाळून ज्या मूर्खांनी काल दुपारी खरेदी केली, त्यांनी स्वत:च्या मूर्खपणाला शिव्या द्याव्या. कारण मार्केट प्रचंड ओव्हरबॉट होतं आणि त्याला पडायला काहीतरी कारण पाहिजे होतं. ते सेबीने दिलं इतकचं. नाहितर चिदुच्या (चिदंबरमच्या) गोड गोड साखरपेरी आश्वासनानंतर आज फॉलोअप बाइंग दिसलं असतं, पण तसं झालं नाही, ते होणार नव्हतं. आज ते़जीमातेच्या महाआरत्या चालल्या नाहीत. कोणताही विधीनिषेध न बागळता एखाद्याने लुंगी सोडावी तस मार्केट आज "सुटलं". आम्ही मंदीतच होतो आणि आहोत. जे कोणी तेजीत असतील त्यांचे स्टॉपलॉस हिट झाले असतील.

खोडसाळपंतांची गझल - रुचिपालट! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 18/10/2007 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे मनोगतीय मित्र श्री खोडसाळपंत यांनी अलिकडेच एक सुरेख गझल लिहिली आहे. गझल फारच छान आहे. आम्ही खोडसाळरावांचे प्रथमपासूनच फ्यान आहोत.
Taxonomy upgrade extras

पुण्यातील जागांचे भाव

लेखक व्यंकट यांनी गुरुवार, 18/10/2007 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पुण्यातील जागांचे भाव आकाशाला भिडले आहेत. लोक पार तळेगाव, लोणावळा, पिरंगुट, सासवड, उंड्री, चाकण पर्यंत राहावयास गेले आहेत / जात आहेत. जागेच्या किमती २००० ते ६५०० च्याही वर गेलेल्या आहेत. आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. आय.टी. वाले सेकंड होम घेत आहेत तर इतरांस घरभाडेही परवडेनासे आहेत. विशेषतः स्थानिक लोकांस जागा घेणे अवघड झाले आहे. पुणे आता मुंबई होऊ लागले आहे काय? इतर शहरांतील लोकांचे काय अनुभव आहेत? मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असतांनाच दारिद्र्य रेषाही वर जात आहे का? आपण एखाद्या गृहयुद्धाकडे जात आहोत काय?