...बरसात
बस स्टॉपवर येऊन थांबली, आणि घाईघाईनं रांगेतली गर्दी पुढंपुढं सरकू लागली. रांगेबाहेरच्या त्या काहीश्या वयस्कर इसमाशी बोलणार्या तिला बहुधा गर्दीची ही घाई कळलीच नव्हती. मागून दोनचार जणांनी आवाज दिल्यावर तिची पावलं जडपणे पुढं सरकली. तो इसमही तिच्याइतक्याच जडपणानं बाजूनं पुढेपुढे सरकत चालत होता. रांगेबरोबर तीदेखील एखाद्या यंत्रासारखी बसमध्ये चढली आणि रिकाम्या राहिलेल्या एकमेव बाकावर चक्क विंडो मिळाल्यानं तिचा चेहेरा खुलला. तो इसमही मग बसबाहेर विंडोजवळ येऊन उभा राहिला. आता बस जवळपास भरली होती. पुढचा सिग्नल बंद होता म्हणून ती स्टॉपवर उभी होती.
मिसळपाव