Skip to main content

परिवर्तनाचे वारे...

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 30/01/2008 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
"कुत्र्यासारखा मारीन बघ...!' आमचा मालक अण्णा जोशानं हे वाक्‍य उच्चारलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. असे "प्राणि'वाचक उल्लेख मला अजिबात खपत नाहीत. वाटलं, एक कडकडून चावा घ्यावा आणि या जोशाला अज्ञातवासाच्या कोशात घालवावं. पण हल्लीच मला "अँटीरॅबीज' इंजेक्‍शन देऊन आणलंय मुडद्यानं ! वर स्वतःही घेतलंय. (फुकट होतं.) त्यामुळं चावणं म्हणजे नुसतंच "दात दाखवून अवलक्षण' झालं असतं. गप्प राहिलो. आमच्या जातीचा असा उद्धार केलेला मला अजिबात खपत नाही. काही लोक तर अक्षरशः कुत्र्यासारखी वागणूक देतात.

"मैञीण"

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 30/01/2008 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक तरी मैञीण अशी हवी जरी न बघता पुढे गेलो तरी मागुन आवाज देणारी आपल्या साठी हसणारी वेळ आलीयतर अशॄही पुसणारी स्वताःच्या घासातला घास आठवणीने काढून ठेवणारी वेळप्रसंगी आपल्या वेड्या मिञाची समजूत काढणारी वाकड पाऊल पडताणा माञ मुस्काडात मारणारी यशाच्या शिखरांवर आपली पाठ थोपटणारी सगळ्य़ाच्या घोळकात आपणांस सैरभैर शोधणारी आपल्या आठवणीनं आपण नसतांना व्याकूळ होणारी खरच!अशी एक तरी जीवा भावाची "मैञीण" हवी जी आपणास मिञ म्हणणारी ........

मैत्रीण माझी.

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 30/01/2008 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी मनातील वादळांना मनातच थोपवणारी भासते कधी आकाशातील चांदणीसारखी तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर तरीही अंतःरात रुतलेली खोलवर तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे हरलो जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे माझा अनुभव मी मान्ड्त आहे. वाचावा हि विनती.

जिवन

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 30/01/2008 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम हे होत नसत प्रेम हे कराव लागत आपल अस कुणीच नसत आपलस कराव लागत...! एकदा तरी स्वाताहून वादळात झोकयच असत नाहीच हाती आल तर त्याच वादळात मानोसक्त मारायला शीकायच असत म्हनूनच.......! प्रेम हे होत नसत प्रेम गे कराव लागत आपल अस कुनीच नसत आपलस कराव लागत.......... कस वाट्ल प्रतिक्रिया पाठ्वा.

कविता.

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 30/01/2008 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.... मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे, आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे.... मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.... तुझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा ....................... माझी स्वताची कविता.

उत्तम मिसळ मिळण्याचे ठिकाण

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 30/01/2008 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी आत्तापर्य॑त चापलेल्या बेष्ट मिसळी॑ची लिस्ट देत आहे, कृपया ऍडिशन करावी. १) अण्णा बेडेकर, पुणे २) मनशक्ती के॑द्र, लोणावळा ३) मामलेदार, ठाणे ४) मूनमून मिसळ, डो॑बिवली

नर्मदे हर हर

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 30/01/2008 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
जगन्नाथ कु॑टे या॑चे हे बरेच गाजलेले पुस्तक मी दोन्-तीन वेळा वाचले. नर्मदा परिक्रमेबद्दल माझ्या मनात पुष्कळ दिवस कुतुहल होते. नर्मदा तीरावर अनेका॑ना अदभुत आणि गूढ अनुभव येतात. कु॑टे या॑चे अनुभव तर केवळ अच॑बित करणारे आहेत. शूलपाणीच्या ज॑गलात लुटण्याबद्दल त्या॑नी लिहीले आहे, पर॑तु नुकतीच माझ्या परिचयाच्या एका भूगोल तज्ञ गृहस्था॑नी त्या॑च्या काही मित्रा॑सोबत नर्मदा परीक्रमा केली, त्या॑ना शूलपाणीत लुटले नाही. अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. अशा प्रकारचे गूढ अनुभव वाचायला मला फार आवडतात, कुणाला अशी काही पुस्तके माहीती आहेत का?

टाळण्याची कला

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 29/01/2008 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या "सुपरफास्ट' जगात सर्वांना भेडसावणारी प्रमुख समस्या कुठली असेल...? नको असलेल्या लोकांना टाळायचं कसं, याची. व्यक्तिमत्त्व विकास, बुद्धिमत्ता वर्ग वगैरे घेतले जातात, तसा टाळण्याच्या कलेचा वर्गही घेण्याची नितांत गरज आहे...ही कला अवगत असलेल्या आणि नसलेल्यांविषयी एक "स्वैर' चिंतन... ----------- एका सहकाऱ्यानं टाळण्याच्या कलेवर लेख लिहायला सुचवलं, तेव्हा प्रथम टाळण्याचाच प्रयत्न केला; पण नंतर टाळण्याची कला अवगत आहे की नाही, असा विचार केला, तेव्हा अंतरात्म्याचं (या अंतरात्म्याचा भाव हल्ली फारच वाढलाय) नकारार्थी उत्तर आलं.

चर्चिलची "शापवाणी"

लेखक तळेकर यांनी मंगळवार, 29/01/2008 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपले चर्चील युद्ध जिंकला पण निवडणुक हरला, अटलीच्या मजुर मंत्रीमंडळाने भारताला स्वातंत्र्य देऊ केले. त्यावेळी चर्चिलने विरोधी बाकावरून पुढील समज नोंदवली होती . "स्वातंत्र्य हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, परंतू या क्षणी सुत्रे कॊंग्रेसच्या हवाली करणे याचा अर्थ भारतातील लक्षावधी भुकेल्या प्रजेच्या हितसंबंधाना बदमाषांच्या, दरोडेखोरांच्या आणि चांडाळ लुटारूंच्या स्वाधिन करणे आहे, यांच्या कारकिर्दीत साधी पाण्याची बाटली किंवा पावाचा तुकडाही करमुक्त असणार नाही. फक्त हवा तेव्हडी विनामुल्य उपलब्ध असेल या भुकेकंगाल आत्म्याचे तळतळाट अटलीच्या माथी बसतील.

शुद्ध मराठी, वापरण्याजोगे मराठी!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 29/01/2008 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आमचे दोन मित्रवर्य अभय नातू आणि केदार सोमण यांची मराठी विकिपिडियाकरता मोलाची कामगिरी आहे. हे दोघेही मराठी विकिकरता खूप काम करत असतात. मराठी विकिशी निगडीत एक याहू समुहही आहे, जिथे मराठी विकिसंदर्भात रस असलेली माणसं एकत्र येऊन चर्चा करू शकतात, आपापले विचार एकमेकात वाटू शकतात. नुकतीच अभय नातू आणि केदर बोडस या दोघांची, शुद्ध मराठी (प्युअर मराठी), व वापरण्याजोगी मराठी (युजेबल मराठी) या संदर्भातील विकिच्या याहू समुहावरीलएक चर्चा आमच्या वाचनात आली. आम्हाला ही चर्चा खूप मोलाची वाटली व दोघांचेही विचार महत्वाचे वाटले.