Skip to main content

(गजल?)

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 13/02/2008 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
माणुस १ यांच्या 'गजल' या गजलेच्या विडंबनाचा हा अजून एक प्रयत्न. केशवसुमारांचे (गजल) हे विडंबन वाचून मलाहि त्या सुंदर गजलेचा विडंबन पाडण्याचा मोह झाला.

(गज़ल)

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 13/02/2008 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा माणूस१ यांची सुरेख गज़ल मंदसा अन, निर्विकारी , बाज होता पण तरी ही जाहला आवाज होता पादला तो शांतपणे बघ दोन वेळा काय हा खाऊन आला आज होता? पाडले मीही प्रयत्ने काव्य थोडे पण विडंबन हाच माझा बाज़ होता आग शब्दांतील कसली डोंबलाची खानदानी आमचा तो माज होता तोंडदेखी वाहवा केली न माझी येव्हढा का तो कवी नाराज होता? लाथ थप्पड ह्या अशा आभूषणांनी सजवला नेहमीच अमुचा साज होता मी कशाला रोज त्या जातोय वाटे ? हेच उत्तर, "माल गर्रेबाज होता" !

"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 12/02/2008 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
"अभिजीत" ने छेडलेल्या "तसल्या नजरा" व त्याला पडलेले अनेक प्रतिसाद याच्या अनुषंगाने हा लेख. मला आलेल्या " विरोपाचे " स्वैर मराठी भाषांतर ......... [ हे मी लिहलेले नाही ..] [ वेळ सकाळी ६ च्या दरम्यान ....] तो : वाढदिवसाच्या शूभेच्छा ... ती : ओह .. हो . थँक यू सो मच . मी अजून झोपेतून उठत आहे ... तो : ओह, म्हणजे तुला सगळ्यात पहिल्यांदा मी फोन केला ... ती : नाही ना ! "त्या" ने मला रात्री १२ वाजताच 'विश' केले. तो : हा 'तो' कोण ? ती : कमॉन यार , अजून कोण ?

काय होणार आपले??

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 12/02/2008 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमूळे पाकिस्तान हा एक वादग्रस्त विषय झाला होता. त्यात पाकिस्तानाने निर्माण केलेल्या विध्वंसक अणूऊर्जा-निर्मित शस्त्रांबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो, की भविष्यात नेमके काय होईल? अ) भारत- पाकिस्तान युध्दात पाकिस्तानाचा सर्वनाश होईल.

आज़ जाने की जि़द ना करो...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 12/02/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज़ जा़ने की जि़द ना करो.. हे गाणं आपल्याला इथे ऐकता येईल आणि इथेही ऐकता येईल! फ़रिदा खा़नुमने गायलेलं एक अतिशय सुरेख गाणं!

आता पुढे काय?

लेखक रम्या यांनी मंगळवार, 12/02/2008 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
ओर्कुटवर आलेली कविता!! आत्ता पुढे काय ? आर्य आले द्रविड़ गेले ....द्रविड़ गेले मुग़ल आले मुग़ल गेले इन्ग्रज़ आले .....इन्ग्रज़ गेले कांग्रेस आले कांग्रेस गेले NDA आले ....NDA गेले UPA आले आत्ता पुढे काय .....? सरबत गेला चहा आला .......चहा गेला beer आली beer गेली rum आली .......rum गेली whisky आली whisky गेली scotch आली.....scotch गेली champagne आली आत्ता पुढे काय .... ? नौवारि गेले सहावारी आले .......सहावारी गेले mandakini वारी आले mandakini वारी गेले midi आला.......midi गेला mini आला mini गेला micro mini आला आत्ता पुढे काय .......? (पुढचा विचार करणारा) रम्या

फिरनी

लेखक प्रभाकर पेठकर यांनी मंगळवार, 12/02/2008 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः दूध (म्हशीचे अथवा फुल्-क्रिम) - २ लिटर तांदूळाचा रवा (इडली रवा) - १५० ग्रॅम (चहाचा एक कप किंवा एक मोठी वाटी) खवा - १२५ ग्रॅम (पाऊण वाटी) साखर - १ कप वेलची पावडर - १/२ टी स्पून गुलाब एसेन्स अथवा गुलाब जल - अंदाजाने बदाम-पिस्ता काप - थोडेसे चांदीचा वर्ख - सुशोभीकरणासाठी (वैकल्पिक -[Optional]) कृती: खवा कुस्करून मोकळा करून ठेवा. तांदूळाचा रवा पाण्यात एक तास भिजवून ठेवा (पाणी रव्याच्या पातळीच्या वर राहिले पाहिजे.) २ लिटर दूध उकळण्यास ठेवा.
Taxonomy upgrade extras

प्रेम करायला जागा नसलेली मुंबई

लेखक हैदर अली यांनी मंगळवार, 12/02/2008 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज पेपरात बातमी वाचली, 'भरतीच्या वेळी पाण्यात बुडून प्रेमी युगुलाचा मृत्यू', 'प्रेम उद्यानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..', म्हटलं... बघुया तर हा प्रश्न खरोखर ऐरणीवर आणून.... म्हणूनच हा काथ्याकूट प्रपंच... मुंबईतल्या तरुणाईसाठी खरोखरच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या दांभिक मुजोरपणापुढे नमून मुंबईचे पोलीसखाते जणु काय मुंबईतली सगळी गुन्हेगारी नष्ट झाल्यामुळे, आता दुसरे काहीच काम नसल्याच्या थाटात संस्कृतीरक्षणाचा विडा उचलल्याप्रमाणे प्रेम करणा-यांवर उठले आहे. भारतासारख्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरणा-या प्रेमी युगुलांवर पोलीसी कारवाई केली जाते.

काही सुभाषिते

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 12/02/2008 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत सुभाषितांपासून प्रेरणा घेऊन मीदेखील काही सुभाषिते तयार केली आहेत, ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. चूका मनावर घेऊ नका. अजून मी संस्कृत शिकत आहे.